खेळ

December 29, 2024 6:58 PM

views 6

जागतिक रॅपिड आणि ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या कोनेरु हंपीनं पटकावलं अजिंक्यपद

  भारताची आघाडीची बुद्धिबळपटू कोनेरू हंपी हिनं न्यूयॉर्क इथं झालेल्या जागतिक रॅपिड आणि ब्लिट्झ अजिंक्यपद स्पर्धेत महिला गटाचं जेतेपद पटकावलं आहे. इंडोनेशियाच्या प्रतिस्पर्ध्याचा पराभव करून हंपीनं या स्पर्धेतलं आपलं दुसरं जेतेपद पटकावलं. ११ फेऱ्यांमध्ये तिनं साडेआठ गुणांची कमाई केली. ३७ वर्षांची हंपी...

December 29, 2024 3:26 PM

views 16

ड्रेस कोडच्या वादामुळे मॅग्नस कार्लसनची बुद्धिबळ स्पर्धेतून माघार

जागतिक बुद्धिबळ क्रमवारीतला अव्वल खेळाडू मॅग्नस कार्लसन याला फिडे वर्ल्ड रॅपिड आणि ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं. ड्रेसकोडचं उल्लंघन केल्याबद्दल त्याला दंड ठोठावण्यात आला आणि अपात्र ठरवण्यात आलं या निर्णयावर आपण दाद मागणार नसल्याचं गतविजेता कार्लसन याने म्हटलं आहे.

December 29, 2024 3:18 PM

views 25

हॉकी इंडिया लीगच्या सलामीच्या सामन्यात दिल्ली एसजी पाईपर्स संघ विजयी

हॉकी इंडिया लीगच्या सलामीच्या सामन्यात दिल्ली एसजी पाईपर्स या संघाने गोनसिका संघाला हरवलं. ओदिशातल्या राऊरकेला इथं काल झालेला हा सामना संपला तेव्हा दोन्ही संघांनी दोन - दोन गोल करुन बरोबरी साधली होती. मात्र शूटआऊटवरुन झालेल्या अंतिम निकालानुसार दिल्ली एसजी पाईपर्सने गोसनिकाला ४-२ अशी मात दिली. या मा...

December 29, 2024 3:59 PM

views 29

मेलबर्न कसोटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाच्या आपल्या दुसऱ्या डावात, ९ बाद २२८ धावा

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या बॉर्डर गावस्कर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या मेलबर्न इथं सुरू असलेल्या चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात, चौथ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियानं आपल्या दुसऱ्या डावात, ९ बाद २२८ धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात भारतावर १०५ धावांची आघाडी मिळवली होती, त्यामुळे त्यांची एकूण...

December 28, 2024 3:22 PM

views 28

भारतीय हॉकी संघाच्या साखळी सामन्यांना ओडिशामध्ये आज सुरुवात होणार

भारतीय हॉकी संघाच्या साखळी सामन्यांना ओडिशामध्ये आज सुरुवात होणार आहे. आरंभिक सामन्यांमध्ये आज दिल्ली एसजी पायपर्सचा सामना गोनासिका संघाशी होईल. या स्पर्धा दोन टप्प्यात होणार आहे. साखळी फेरीतला अंतिम सामना येत्या १ फेब्रुवारी रोजी होणार आहे.

December 28, 2024 8:02 PM

views 30

बॅडमिंटन खुल्या स्पर्धेत उपांत्य फेरीत लक्ष्य सेनचा पराभव

किंग्ज कप आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन खुल्या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनचा पराभव झाला. उपांत्य फेरीच्या आज झालेल्या सामन्यात चीनच्या हू झेन ॲन यानं त्याला १९-२१,१९-२१ असं पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला.

December 28, 2024 2:53 PM

views 14

बॉर्डर गावस्कर कसोटी क्रिकेट मालिकेत भारत ११६ धावांनी पिछाडीवर

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या बॉर्डर गावस्कर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या मेलबर्न इथं सुरू असलेल्या चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात, तिसऱ्या दिवसअखेर भारतानं आपल्या पहिल्या डावात, ९ बाद ३५८ धावा केल्या आहेत. पहिल्या डावात भारत अजूनही ११६ धावांनी पिछाडीवर आहे.   सामन्याच्या आज तिसऱ्या द...

December 27, 2024 3:59 PM

views 7

राष्ट्रीय नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत विजयवीर सिद्धूला विजेतेपद

तुलघकाबाद इथं झालेल्या ६७व्या राष्ट्रीय नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत विजयवीर सिद्धूने पुरुषांच्या २५ मीटर रॅपिड फायर पिस्तुल प्रकारात विजेतेपद पटकावलं. तसंत नेमबाज गुरप्रीत सिंगने रौप्यपदक तर शिवम शुक्लाने कास्यपदक जिंकलं आहे.

December 27, 2024 7:13 PM

views 31

महिला क्रिकेटमधे भारताचा ३-० असा मालिका विजय

भारतीय महिला क्रिकेट संघानं वेस्ट इंडिजविरुद्धची एकदिवसीय मालिका ३-० अशी जिंकली.  वडोदरा इथं आज झालेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात भारतानं वेस्ट इंडिजवर पाच गडी राखून विजय मिळवला. वेस्ट इंडिजनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ३८ षटकात सर्वबाद १६२ धावा केल्या. भारतानं अवघ्या २८ षटकां...

December 27, 2024 3:15 PM

views 13

बॉर्डर-गावस्कर करंडक कसोटी क्रिकेट मालिकेत भारताच्या पाच बाद १६४ धावा

ऑस्ट्रेलियात मेलबर्न इथं सुरू असलेल्या बॉर्डर-गावस्कर करंडक कसोटी क्रिकेट मालिकेतल्या चौथ्या सामन्याच्या आज दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात सर्व बाद ४७४ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजी गडगडली. विराट कोहली आणि के एल राहुल हे दोघं अनुक्रमे ३६ आणि २४ धावांवर बाद झाले....

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.