खेळ

March 23, 2025 1:01 PM March 23, 2025 1:01 PM

views 10

IPL 2025 : आजच्या सामन्यांचं वेळापत्रक !

इंडियन प्रिमियर लीग क्रिकेटमध्ये आज दुपारी साडेतीन वाजल्यापासून सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना रंगणार आहे. हैदराबाद इथं हा सामना होईल. आजचा दुसरा सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होईल. चेन्नई इथं सायंकाळी साडे सात वाजता हा सामना सुरू होईल.    कालपासून ...

March 23, 2025 1:01 PM March 23, 2025 1:01 PM

views 59

Basketball : भारतीय संघ फिबा पुरुष एशिया चषक स्पर्धेसाठी पात्र

भारतीय बास्केटबॉल संघ फिबा पुरुष एशिया चषक स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. संघानं काल रात्री मनामा इथं झालेल्या सामन्यात यजमान बहारिनचा ८१ - ७७ असा पराभव केला. भारताकडून हर्ष डागर, गुरबाज संधू, कंवर संधू, प्रणव प्रिंस आणि हाफिज यांनी शानदार खेळ केला. आता, भारतीय संघ ५ ते १७ ऑगस्टदरम्यान सौदी अरेबियात जे...

March 23, 2025 9:08 AM March 23, 2025 9:08 AM

views 8

IPL 2025 : RCB विरुद्धच्या सामन्यात KKR चा ७ गडी राखून पराभव

इंडियन प्रीमियर लीग - आएपीएल क्रिकेटच्या १८व्या हंगामात काल सलामीच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं कोलकाता नाईट रायडर्सचा सात गडी राखून पराभव केला. कोलकाता इथं झालेल्या या सामन्यात, कोलकाताच्या संघाने प्रथम फलंदाजी करत निर्धारित २० षटकात आठ बाद १७४ धावा केल्या. प्रत्यूत्तरात बंगळुरुच्या संघाने ...

March 22, 2025 6:01 PM March 22, 2025 6:01 PM

views 2

खेलो इंडिया पॅरा गेम्समधे भालाफेकीत महाराष्ट्राच्या भाग्यश्री जाधवला सुवर्णपदक

नवी दिल्लीत जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर सुरू असलेल्या खेलो इंडिया पॅरा गेम्समधे आजच्या तिसऱ्या दिवशी महिला भालाफेकीत महाराष्ट्राच्या भाग्यश्री जाधवला सुवर्णपदक मिळालं. त्यामुळे महाराष्ट्राच्या पदकांची संख्या आता सात झाली आहे.  हरयाणा ९ सुवर्णपदकांसह पदकतालिकेत अव्वल स्थानी असून महाराष्ट्र पाच सुवर्णपद...

March 22, 2025 2:41 PM March 22, 2025 2:41 PM

views 10

१८व्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेला आजपासून प्रारंभ

क्रिकेट रसिकांचं लक्ष लागून  असलेल्या आय पी एल अर्थात इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेला आजपासून कोलकात्यात सुरुवात होत आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात आज सलामीचा सामना होणार असून एकूण १० संघ या स्पर्धेत सहभागी होत आहेत. आयपीएलचा हा १८वा हंगाम आहे.

March 22, 2025 1:35 PM March 22, 2025 1:35 PM

views 4

स्विस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय जोडीचा सामना चीन सोबत

स्वित्झर्लंडमध्ये बासेल इथं सुरु असलेल्या स्विस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत, महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत आज भारताच्या ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीचा सामना चीनच्या शेंग शु लिऊ आणि टॅन निंग या अव्वल मानांकित जोडीशी होईल. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ५ वाजून १० मिनिटांनी सामना सुरु होईल. &nbs...

March 22, 2025 11:02 AM March 22, 2025 11:02 AM

views 3

सेपाक तक्रो या क्रीडाप्रकारात भारतीय पुरुष आणि महिला संघाला कास्यपदक

बिहारच्या पाटणामध्ये झालेल्या विश्वचषक 2025 स्पर्धेत झालेल्या सेपाक तक्रो या क्रीडाप्रकारात पुरुष आणि महिला संघांनी क्वाड स्पर्धेत कास्यपदक पटकावले.   भारतीय पुरुष संघाला व्हिएतनामकडून 1-2 असा पराभव पत्करावा लागला. भारतीय महिला संघाला पहिल्या क्रमांकाच्या थायलंडविरुद्ध पराभव पत्करावा लागला.

March 22, 2025 10:02 AM March 22, 2025 10:02 AM

views 5

चेन्नईतल्या स्क्वॅश स्पर्धेत भारतीय खेळाडूंना विजेतेपद

चेन्नईत सुरू असलेल्या पीएसए चॅलेंजर स्क्वॅश स्पर्धेत भारताच्या अनाहत सिंह हिने महिला गटात तर वीर चोत्राणी याने पुरूष गटात विजेतेपद पटकावले.   तिसऱ्या मानांकित अनाहत सिंगने अंतिम सामन्यात अव्वल मानांकित आकांक्षा साळुंखेचा पराभव केला. तर दुसऱ्या मानांकित वीर चोत्राणीने अंतिम सामन्यात फ्रेंच खेळाड...

March 22, 2025 9:34 AM March 22, 2025 9:34 AM

views 4

दिव्यांगांसाठीच्या खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राला 3 सुवर्णपदक

नवी दिल्ली इथं सुरू असलेल्या खेलो इंडिया पॅरा स्पर्धेत काल महाराष्ट्राच्या खेळाडूंनी 3 सुवर्ण पदकं आणि 1 रौप्य पदक मिळवलं.   अकोल्याच्या चैतन्य पाठकनं 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत, तर कराडच्या साहिल सय्यद आणि पुण्याच्या सिध्दी क्षीरसागरनं गोळाफेकीत सुवर्णपदक पटकावलं.   मीनाक्षी जाधव हिनं ग...

March 21, 2025 1:43 PM March 21, 2025 1:43 PM

views 32

भारताकडे ११व्या आशियाई जलतरण स्पर्धेचं यजमानपद

११व्या आशियाई जलतरण स्पर्धेचे यजमानपद भारताकडे असणार आहे. अहमदाबादमधे नारनपुरा क्रीडा संकुलात १ ते १५ ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेत पोहणे, डायव्हिंग, आणि वॉटर पोलो यासारख्या विविध जलतरण स्पर्धांचा समावेश असेल.