खेळ

April 5, 2025 2:26 PM

views 35

आय एस एस एफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत ५० मिटर रायफल स्पर्धेच्या महिला गटात भारताच्या सिफ्ट कौर साम्रा ने पटकावलं सुवर्णपदक

अर्जेंटिना इथं सुरु असलेल्या आय एस एस एफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत ५० मिटर रायफल स्पर्धेच्या महिला गटात काल भारताच्या सिफ्ट कौर साम्रा ने सुवर्णपदक पटकावलं तर पुरुष गटात आशियाई स्पर्धा विजेत्या चैन सिंग ने कांस्य पदक पटकावून भारताचं खात उघडलं आहे. भारताचा ऐश्वर्य प्रताप सिंग चौथ्या क्रमांकावर फेकला ...

April 5, 2025 1:58 PM

views 17

मुष्ठियुद्ध विश्वचषक स्पर्धेत भारताच्या अभिनाश जामवालचा पुरुषांच्या ६५ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश

ब्राझीलमध्ये सुरु मुष्ठियुद्ध विश्वचषक स्पर्धेत भारताच्या अभिनाश जामवालनं पुरुषांच्या ६५ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्यानं काल इटलीच्या जियानलुइगी मलंगाचा ५-० असा पराभव केला. जामवालचा अंतिम फेरीचा सामना आज ब्राझीलच्या युरी रीसशी होणार आहे. तर, ७० किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात ...

April 5, 2025 1:48 PM

views 25

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात चेन्नईमध्ये दुपारी साडेतीन वाजता सामना होणार आहे. तर चंदीगढमध्ये राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्स यांच्यात संध्याकाळी ७ वाजता सामना होईल. दरम्यान काल लखनौ सुपर जायंट्सनं मुंबई इंडियन्सचा १२ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजीसा...

April 5, 2025 8:44 AM

views 35

आयपीएल – लखनऊ सुपर जायंटस् संघाचा मुंबई इंडियन्स संघावर 12 धावांनी विजय

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल लखनऊ सुपर जायंटस् संघानं मुंबई इंडियन्स संघावर 12 धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना लखनऊच्या संघानं 20 षटकांत 8 गडी बाद 203 धावा केल्या. त्याला प्रत्युत्तर देताना मुंबईच्या संघाला 5 गडी बाद 191 धावा करता आल्या.

April 4, 2025 7:29 PM

views 49

५७व्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला संघाला विजेतेपद

ओडिशातल्या पुरी इथं झालेल्या ५७ व्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला संघानं विजेतेपद पटकावलं, तर पुरुष संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. अंतिम सामन्यात दिमाखदार खेळी करत आज महाराष्ट्राच्या महिला संघानं यजमान ओडिशावर २५-२१ असा विजय मिळवला. मध्यंतरापर्यंत दोन्ही संघ १०-१० असे बर...

April 4, 2025 1:45 PM

views 25

मुष्टियुद्ध विश्वचषक स्पर्धेत भारताच्या हितेश अंतिम फेरीत दाखल

ब्राझीलमधे फोज दो इगुआचू इथे झालेल्या मुष्टियुद्ध विश्वचषक स्पर्धेत भारताच्या हितेश या खेळाडूने अंतिम फेरी गाठली आहे. पुरुषांच्या ७९ किलो वजनी गटात त्याने फ्रान्सच्या माकन त्राओरचा ५-० असा पराभव करत अंतिम फेरी गाठली आहे.   या स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. दरम्यान...

April 4, 2025 1:37 PM

views 31

ILP: Cricket सामन्यात आज मुंबई इंडीयन्सचा सामना लखनौ सुपर जायंट्स सोबत

इंडियन प्रीमियर लीग अर्थात आय पी एल क्रिकेट स्पर्धेत आज मुंबई इंडीयन्सचा सामना   लखनौ सुपर जायंट्स बरोबर  लखनौ मधे होणार आहे. संध्याकाळी साडे सातवाजता सामना सुरु होईल. काल झालेल्या साखळी सामन्यात कोलकाता नाइट रायडर्स  संघाने, सनरायझर्स हैदराबाद संघाचा ८० धावांनी पराभव केला.

April 4, 2025 1:30 PM

views 30

१५ व्या वरिष्ठ राष्ट्रीय हॉकी अजिंक्यपद स्पर्धेला आजपासून सुरुवात

१५ वी  राष्ट्रीय हॉकी अजिंक्यपद पुरुष गटाची स्पर्धा आजपासून उत्तरप्रदेशात झाशी इथल्या मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर सुरु होत आहे. मार्चमध्ये झालेल्या महिला वरिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेप्रमाणेच नवीन विभाग आधारित स्वरुपात ही स्पर्धा होईल.    यामध्ये अ, ब आणि क अशा तीन विभागांत  मिळून ३० संघ सहभागी हो...

April 4, 2025 10:58 AM

views 34

खो खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष आणि महिला संघाचा उपांत्य फेरीत प्रवेश

जगन्नाथ पुरी इथं सुरू असलेल्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष आणि महिला संघानं उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्यपूर्व फेरीत पुरुष संघानं पश्चिम बंगालवर मात केली.   तर महिला गटात महाराष्ट्र संघानं कोल्हापूरचा पराभव केला. आज उपांत्य फेरीचे सामने होणार असून राज्याच्य...

April 3, 2025 3:43 PM

views 30

IPL: T20 स्पर्धेत KKR आणि SRH आमने सामने

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्सचा सामना आज सनरायजर्स हैदराबादशी होणार आहे. हा सामना कोलकात्याच्या इडन गार्डन्स स्टेडियमवर संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होईल.  बेंगळुरु इथं काल रात्री झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु संघाचा आठ गडी राखून पराभव केला. गुजरात टायटन्...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.