खेळ

April 3, 2025 3:43 PM April 3, 2025 3:43 PM

views 9

IPL: T20 स्पर्धेत KKR आणि SRH आमने सामने

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्सचा सामना आज सनरायजर्स हैदराबादशी होणार आहे. हा सामना कोलकात्याच्या इडन गार्डन्स स्टेडियमवर संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होईल.  बेंगळुरु इथं काल रात्री झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु संघाचा आठ गडी राखून पराभव केला. गुजरात टायटन्...

April 3, 2025 3:40 PM April 3, 2025 3:40 PM

views 6

खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राचे पुरुष आणि महिला संघ उपांत्य फेरीत

५७व्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत  महाराष्ट्राचे  पुरुष आणि महिला संघ उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. ओदिशात पुरी इथं आयोजित या स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष संघाने उपान्त्यपूर्व फेरीत पश्चिम बंगालचा पराभव केला तर महिला संघाने कोल्हापूर संघाचा पराभव केला. उपान्त्य फेरीत पुरुष संघाचा सामना ओडिशा...

April 3, 2025 1:32 PM April 3, 2025 1:32 PM

views 15

ISSF करंडक नेमबाजी स्पर्धा आजपासून अर्जेटिंनात सुरू होणार

आंतरराष्ट्रीय नेमबाजी महासंघ म्हणजे आयएसएसएफ करंडक आजपासून अर्जेटिंनातील ब्युनॉस आयर्स इथं सुरू होत आहे. भारताची ऑलिंपिक विजेती नेमबाज मनू भाकर भारताच्या संघाचं नेतृत्व करणार आहे. स्पर्धेत ४५ देशांमधील चारशे नेमबाज सहभागी होत आहेत. भारताचे सौरभ चौधरी, अनिश भंवाला यांच्यासह ४३ नेमबाज स्पर्धेत सहभागी ...

April 2, 2025 1:39 PM April 2, 2025 1:39 PM

views 70

ISSF नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताचे ४३ खेळाडू सहभागी

अर्जेंटिना इथं उद्यापासून सुरू होणाऱ्या ISSF नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताचे ४३ खेळाडू सहभागी होत आहेत. या पथकाचं नेतृत्व ऑलिंपिक पदक विजेती मनु भाकर करणार आहे. या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आज होणार आहे. या स्पर्धेत एअर रायफल, एअर पिस्तुल आणि शॉटगन प्रकार असून त्या ४५ देशांमधले ४०० हून अधिक नेमबाज ...

April 2, 2025 1:09 PM April 2, 2025 1:09 PM

views 14

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत बेंगळुरूचा सामना आज गुजरातशी

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा सामना आज गुजरात टायटन्सशी होणार आहे. हा सामना बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होईल.    काल रात्री लखनौ इथं झालेल्या सामन्यात पंजाब किंग्सनं लखनौ सुपर जायंट्स संघाचा ८ गडी राखून पराभव केला. लखनौ सुपर जायंट्स सं...

April 2, 2025 9:26 AM April 2, 2025 9:26 AM

views 3

बेल्जियममधील अश्वारोहण स्पर्धेत निहारिका सिंघानियाला सुवर्ण पदक

तरुण भारतीय महिला घोडेस्वार निहारिका सिंघानिया हिने बेल्जियम मध्ये झालेल्या अझेल हॉफ सीएसआय लायर अश्वारोहण स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाला. कौशल्य आणि समर्पणाचं उत्कृष्ट प्रदर्शन करत नीहरीकानं भारताला या आंतरराष्ट्रीय क्रीडा प्रकारात सुवर्णपदक मिळवून दिल आहे.

April 1, 2025 2:12 PM April 1, 2025 2:12 PM

views 7

भारतीय महिला हॉकीपटू वंदना कटारिया आंतरराष्ट्रीय हॉकी सामन्यांमधून निवृत्त

भारतीय महिला हॉकी खेळाडू वंदना कटारिया हिनं आंतरराष्ट्रीय हॉकी सामन्यांमधून अधिकृतरीत्या निवृत्ती जाहीर केली आहे. वंदनाने आपल्या हॉकी कारकिर्दीची सुरुवात २००९ मध्ये केली होती. तेव्हापासून तिने ३२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमधून १५८ गोल नोंदवले तसंच टोकियो ऑलिम्पिक मध्ये हॅट्ट्रिक करणारी ती पहिली भारतीय ...

April 1, 2025 2:09 PM April 1, 2025 2:09 PM

views 2

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज लखनौ सुपर जायंट्सचा सामना पंजाब किंग्ज बरोबर होणार

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज लखनौ सुपर जायंट्सचा सामना पंजाब किंग्जबरोबर लखनौ इथं होणार आहे. काल मुंबईच्या वानखेडे मैदानावर झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघानं कोलकाता नाईट रायडर्स संघावर आठ गडी राखून विजय मिळवला. कोलकाता नाइट रायडर्स संघानं १७ षटकात ११६ धावा केल्या. विजयासाठीचं ११७ धावांच हे लक्ष...

April 1, 2025 2:06 PM April 1, 2025 2:06 PM

views 8

हिरो आशिया चषक हॉकी स्पर्धा यावर्षी बिहारमधे राजगीर इथं होणार

हिरो आशिया चषक हॉकी स्पर्धा यावर्षी ऑगस्ट मध्ये बिहारमधे राजगीर इथं होणार आहे. या संदर्भात हॉकी इंडिया आणि बिहार राज्य क्रीडा प्राधिकरण यांच्यात पाटणा इथं सामंजस्य करार करण्यात आला. अलीकडेच बांधण्यात आलेल्या राजगीर हॉकी स्टेडियममध्ये २९ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर या कालावधीत ही स्पर्धा होईल. राजगीर इथं आयो...

April 1, 2025 9:05 AM April 1, 2025 9:05 AM

views 8

मुंबई इंडियन्स संघाचा कोलकाता नाइट रायडर्सवर दणदणीत विजय

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल मुंबईच्या वानखेडे मैदानावर झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघानं कोलकाता नाइट रायडर्सवर 8 गडी आणि 43 चेंडू राखून दणदणीत विजय मिळवला. त्यापूर्वी मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. आणि कोलकाता नाइट रायडर्स संघाला 17 व्या षटकात ११६ धावांवर सर्वबा...