खेळ

October 23, 2025 2:35 PM October 23, 2025 2:35 PM

views 62

Cricket 2nd ODI: भारताचं ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी २६५ धावांचं आव्हान

भारत आणि ऑस्ट्रेलियातल्या तीन एकदिवसीय क्रिकेट मालिकतेल्या, ॲडलेड इथं सुरू असलेल्या दुसऱ्या सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी २६५ धावांचं आव्हान ठेवलं आहे.   या सामन्यात ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या भारताची सुरुवात खराब झाल...

October 23, 2025 1:43 PM October 23, 2025 1:43 PM

views 187

महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना

महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या साखळी फेरीत, आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सामना होणार आहे. नवी मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील क्रीडा अकादमीच्या मैदानावर दुपारी ३ वाजता हा सामना सुरु होईल.  गुणतालिकेत दोन्ही संघांनी प्रत्येकी ५ सामन्यांमधून ४ गुणांची कमाई केली आहे. त्यामुळे स्पर्धेच्या उपांत्य फेर...

October 22, 2025 8:15 PM October 22, 2025 8:15 PM

views 43

महिलांच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत उद्या भारत – न्यूझीलंड सामना

महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या साखळी फेरीत, उद्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सामना होणार आहे. नवी मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील क्रीडा अकादमीच्या मैदानावर दुपारी ३ वाजता हा सामना सुरु होईल.    गुणतालिकेत दोन्ही संघांनी प्रत्येकी ५ सामन्यांमधून ४ गुणांची कमाई केली आहे. त्यामुळे स्पर्धेच्या उ...

October 22, 2025 3:25 PM October 22, 2025 3:25 PM

views 98

भालाफेकपटू नीरज चोप्रा याला भारतीय सैन्यात पदोन्नती

 ऑलिंपिक स्पर्धेत दोन वेळा पदक जिंकणारा भालाफेकपटू नीरज चोप्रा याला भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नल म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांच्या उपस्थितीत आज नवी दिल्ली इथे हा समारंभ झाला. त्यांनी नीरज चोप्रा याच्या लष्करी गणवेशावर नवीन पदाचं चिन...

October 21, 2025 12:47 PM October 21, 2025 12:47 PM

views 79

महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत श्रीलंकेचा बांगलादेशवर विजय

आयसीसी महिला एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत, नवी मुंबईच्या डॉक्टर डीवाय पाटील क्रीडा अकादमीच्या मैदानावर काल झालेल्या उत्कंठावर्धक सामन्यात श्रीलंकेनं बांगलादेशचा 7 धावांनी पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेनं हसिनी परेराच्या 85 धावांच्या जोरावर सर्व बाद 202 धावा केल्या. प्...

October 20, 2025 1:32 PM October 20, 2025 1:32 PM

views 16

आशियाई रोईंग अजिंक्यपद स्पर्धेत भारताला १० पदकांची कमाई

व्हिएतनाम इथं झालेल्या आशियाई रोईंग म्हणजे नौका वल्हवण्याच्या अजिंक्यपद स्पर्धेत भारतानं १० पदकांची कमाई केली. यात ३ सुवर्ण, ५ रौप्य आणि दोन कांस्यपदकांचा समावेश आहे. पुरुष गटात दुहेरी स्कल, चौघांच्या स्कल आणि एकेरी स्कल या प्रकारात भारताच्या खेळाडूंनी सुवर्णपदकं पटकावली.

October 20, 2025 12:55 PM October 20, 2025 12:55 PM

views 52

ऑस्ट्रेलियाची भारतावर ७ गडी राखून मात

क्रिकेटमध्ये, पर्थ इथं भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतल्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं काल भारतावर ७ गडी राखून मात केली. पावसाच्या व्यत्ययामुळं सामना चार वेळा थांबवण्यात आला. वेळ कमी पडल्यामुळे सामना २६ षटकांपर्यंत मर्यादित करण्यात आला. प्रथम फलंदाजी करताना भार...

October 19, 2025 2:52 PM October 19, 2025 2:52 PM

views 77

भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान, तीन सामन्यांची एक दिवसीय क्रिकेट मालिका सुरू

भारत आणि ऑस्ट्रेलियातल्या तीन सामन्यांच्या एक दिवसीय क्रिकेट मालिकेला आजपासून पर्थ इथं सुरुवात झाली. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी पाचारण केलं. पण भारतीय फलंदाज पारशी चमक दाखवू शकले नाही. सलामीवर रोहित शर्मा ८ तर कर्णधार शुभमन गिल दहा धावा करून झटपट बाद झाले. तर व...

October 18, 2025 8:10 PM October 18, 2025 8:10 PM

views 20

ISSF जागतिक शॉटगन २०२५ स्पर्धेत भारताच्या झोरावर सिंहला कांस्यपदक

ग्रीसमध्ये अथेन्स इथं सुरु असलेल्या आय एस एस एफ (ISSF) जागतिक शॉटगन २०२५ स्पर्धेत भारतीय नेमबाज झोरावर सिंह यानं पुरुष गटात कांस्यपदकाला गवसणी घातली. अंतिम फेरीत खराब हवामान आणि अंधुक प्रकाश यावर मात करून त्यानं ५०पैकी ३१ गुण मिळवले आणि तिसरं स्थान मिळवलं.

October 18, 2025 5:34 PM October 18, 2025 5:34 PM

views 51

BWF जागतिक बॅडमिंटन कनिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेत भारताची तन्वी शर्मा अंतिम फेरीत

गुवाहाटी इथं सुरू असलेल्या बीडब्ल्यूएफ जागतिक बॅडमिंटन कनिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या तन्वी शर्मा हिनं आज अंतिम फेरीत धडक मारली. तिनं चीनच्या लिऊ सी या हिच्यावर १५-११, १५-९ अशी सहज मात केली. जागतिक कनिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारी ती अवघी पाचवी भारतीय बॅडमिंटनपटू आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.