खेळ

November 9, 2025 7:50 PM

views 35

कोग्नीवेरा आंतरराष्ट्रीय पोलो विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने केला अर्जेंटिनाचा पराभव

जयपूरच्या पोलो ग्राउंडवर झालेल्या २०२५च्या कोग्नीवेरा आंतरराष्ट्रीय पोलो विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतानं जगात अव्वल स्थानी असलेल्या अर्जेंटिनाचा १०-९ असा पराभव केला. या ऐतिहासिक विजयानं पोलोची जन्मभूमी असलेल्या भारतात, या क्रीडाप्रकाराच्या विकासाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. सवाई पद्मनाभ...

November 9, 2025 2:08 PM

views 50

टेनिसपटू नोव्हाक जोकोविचनं एटीपी अंतिम फेरीतून घेतली माघार

सर्बियाचा टेनिसपटू नोव्हाक जोकोविच यानं एटीपी २५० अथेन्स गटाचं विजेतेपद पटकावल्यानंतर तासाभरातच खांद्याच्या दुखापतीमुळे एटीपी अंतिम फेरीतून माघार घेतली आहे. हंगामातली ही शेवटची फेरी असून ती चुकण्याचं त्याचं हे सलग दुसरं वर्ष आहे. जोकोविचनं अथेन्स स्पर्धेत लॉरेन्झो मुसेटी याच्यावर ४-६, ६-३, ७-५ अशी म...

November 9, 2025 9:58 AM

views 43

भारतानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-ट्वेंटी मालिका २-१ नं जिंकली

ऑस्ट्रेलियाविरुद्ध वीस षटकांच्या सामन्यांची क्रिकेट मालिका भारतानं 2-1 अशी जिंकली आहे. मालिकेतला निर्णायक पाचवा सामना काल पावसामुळं रद्द करावा लागला. त्यामुळं चौथा सामना जिंकून मालिकेत आघाडी घेतलेल्या भारतीय संघानं मालिका जिंकल्याचं घोषित करण्यात आलं. भारतीय फलंदाज अभिषेक शर्मा मालिकावीर ठरला. या वि...

November 8, 2025 8:18 PM

views 49

आशिया चषक स्पर्धेच्या चषकासंबंधीचा वाद संपवण्याची दोन्ही बाजूंची तयारी

नुकत्याच झालेल्या आशिया चषक स्पर्धेच्या चषकासंबंधीचा वाद संपवण्याची तयारी दोन्ही बाजूंनी दाखवली आहे, अशी माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव देवजीत सैकिया यांनी दिली आहे. दुबई इथं झालेल्या आयसीसी मंडळाच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्याशी याबाबत...

November 8, 2025 6:37 PM

views 33

ISSF World Championship : भारताचा रविंदर सिंह याची सुवर्णपदकाला गवसणी

इजिप्तमध्ये सुरू असलेल्या आयएसएसएफ जागतिक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा रविंदर सिंह यानं सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. त्यानं पुरुषांच्या ५० मीटर पिस्तूल प्रकारात ५६९ गुणांची कमाई करत पहिलं स्थान पटकावलं. तसंच, रविंदर सिंह, कमलजीत आणि योगेश कुमार यांच्या संघानं पुरुषांच्या ५० मीटर पिस्तूल प्रका...

November 8, 2025 1:59 PM

views 324

बुद्धिबळपटू राहुल व्ही एस याला भारताचा ९१ वा ग्रँडमास्टर होण्याचा मान

बुद्धिबळपटू राहुल व्ही एस याला भारताचा ९१ वा ग्रँडमास्टर होण्याचा मान मिळाला आहे. सहावी आसियान वैयक्तिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धा जिंकल्यानं फिडे अर्थात जागतिक बुद्धिबळ महासंघानं राहुलला ग्रँडमास्टर हा किताब दिला आहे.   आठवड्यापूर्वीच चेन्नई मधला इलमपथी ए आर भारताचा ९० वा ग्रँडमास्टर बनला तर त...

November 8, 2025 12:16 PM

views 52

2028 लॉस एंजेलिस स्पर्धेत टी-20 स्वरूपात पुरुष व महिला सामने

लॉस एंजेलिसमध्ये होणाऱ्या 2028 च्या ऑलिंपिक खेळांमध्ये पुरुष आणि महिला टी-20 क्रिकेटचे सामने सहा संघांसोबत खेळले जाणार असून यामध्ये एकत्रित 28सामने होणार असल्याची माहिती आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने दिली आहे.   वर्ष 1900 मध्ये पॅरिसमध्ये पदार्पण केल्यानंतर ग्रेट ब्रिटनने फ्रान्सविरुद्धच्या एक...

November 8, 2025 2:48 PM

views 83

भारत-ऑस्ट्रेलिया टी २० क्रिकेट शेवटचा सामना ब्रिस्बेनमधे रंगणार

भारत-ऑस्ट्रेलिया टी २० क्रिकेट मालिकेतला पाचवा आणि शेवटचा सामना आज ब्रिस्बेनमधे होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी पावणे दोन वाजता हा सामना सुरू होईल. नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाच्या संघानं प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.  भारत या मालिकेत २-१ अशा गुणफरकाने आघाडीवर आहे.

November 7, 2025 8:56 PM

views 143

महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या महाराष्ट्रातल्या खेळाडूंचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

ICC महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ चं विजेतेपद पटकावणाऱ्या भारतीय संघातल्या स्मृती मंधाना, जेमिमा रॉड्रिग्ज आणि राधा यादव, या महाराष्ट्रातल्या तीन खेळाडूंचा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या वर्षा निवासस्थानी सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी या तिघींना शाल, पुष्पगुच्छ, तसंच प्रत्येकी सव्वा दोन...

November 7, 2025 2:00 PM

views 38

एनएसडब्ल्यू खुल्या स्क्वॉश स्पर्धेत भारताच्या रतिका सुथंतिरा सीलन हिचा उपांत्य फेरीत प्रवेश

सिडनी इथं सुरू असलेल्या एनएसडब्ल्यु खुल्या स्क्वॉश स्पर्धेत भारताच्या रथिका सुथंतिरा सीलन हिने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. तिने उपांत्यपूर्व फेरीत ऑस्ट्रेलियाच्या कॅरन ब्लूम हिच्यावर ११-८, ११-७, ११-४ असा सरळ गेम्समध्ये विजय मिळवला.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.