खेळ

October 10, 2024 8:33 PM

views 23

यंदाचा साहित्यातला नोबेल पुरस्कार दक्षिण कोरियाच्या प्रसिद्ध लेखिका हान कांग यांना जाहीर

यंदाचा साहित्यातला नोबेल पुरस्कार दक्षिण कोरियाच्या प्रसिद्ध लेखिका हान कांग यांना जाहीर झाला आहे. कांग यांच्या काव्यात्मक गद्यसाहित्य प्रकारातल्या लेखनासाठी त्यांना हा पुरस्कार देत असल्याचं स्विडीश पुरस्कार समितीनं जाहीर केलं आहे. मानवी जीवन, त्यातली असुरक्षितता, वेदना, आयुष्यावर होणारे आघात यांचं ...

October 10, 2024 7:21 PM

views 6

सुप्रसिद्ध टेनिस खेळाडू राफेल नदालची व्यावसायिक टेनिस मधून निवृत्तीची घोषणा

स्पेनचा सुप्रसिद्ध टेनिस खेळाडू आणि २२ ग्रँड स्लॅम्सचा विजेता राफेल नदाल याने आज व्यावसायिक टेनिस मधून आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे. समाजमाध्यमांवर पोस्ट केलेल्या एका चित्रफितीत त्याने ही घोषणा केली असून आपल्या कारकिर्दीत क्रीडा रसिकांकडून मिळालेल्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. माला...

October 10, 2024 3:05 PM

views 16

आर्क्टिक खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किरण जॉर्जचा पुरुष एकेरीच्या उपउपांत्य पूर्व फेरीत प्रवेश

फिनलँड इथं सुरू असलेल्या आर्क्टिक खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत काल भारताच्या किरण जॉर्ज याने पुरुष एकेरीच्या उपउपांत्य पूर्व फेरीत प्रवेश केला. त्याने जागतिक क्रमवारीत २५व्या स्थानावर असलेल्या तैवानच्या वांग त्झू वेई याचा २३-२१, २१-१८ अशा सरळ गेममध्ये पराभव केला. आज किरण याचा सामना इंडोनेशियाच्या जोनाथन...

October 10, 2024 9:52 AM

views 17

अडतिसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा उत्तराखंडमध्ये पुढच्या वर्षी 28 जानेवारी ते 14 फेब्रुवारी या काळात होणार

अडतिसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा उत्तराखंडमध्ये पुढच्या वर्षी 28 जानेवारी ते 14 फेब्रुवारी या काळात आयोजित करण्यात आल्या आहेत. भारतीय ऑलिंपिक संघटनेची बैठक येत्या पंचवीस तारखेला होणार आहे. त्यात या स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक जाहीर केलं जाणार आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी नुक...

October 10, 2024 9:00 AM

views 20

पुरुषांच्या टी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये बांग्लादेशविरुद्धचा सामना भारतानं 86 धावांनी जिंकला

पुरुषांच्या टी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये बांग्लादेशविरुद्ध दिल्ली इथं दुसरा सामना भारतानं 86 धावांनी जिंकून तीन सामन्यांच्या मालिकेत विजयी आघाडी घेतली. भारतानं दिलेलं 222 धावांचं उद्दिष्ट गाठताना पाहुणा संघ वीस षटकांत 9 बाद 135 धावा करु शकला. उभय संघांचा तिसरा सामना शनिवारी हैदराबाद इथं होणार आहे.

October 10, 2024 8:55 AM

views 29

महिलांच्या टी-ट्वेंटी विश्व करंडक क्रिकेट स्पर्धेत भारताचा श्रीलंकेवर विजय

महिलांच्या टी-ट्वेंटी विश्व करंडक क्रिकेट स्पर्धेत भारतानं श्रीलंकेवर काल दुबई इथं 82 धावांनी विजय मिळवून एक विक्रम केला. त्यामुळं अ गटात भारत क्रमवारी आणि धावसंख्येच्या प्रमाणात वरचढ ठरला आहे. हरमनप्रीत कौर आणि स्मृती मन्धना यांच्या अर्धशतकांच्या बळावर भारतानं केलेल्या 172 धावांचा पाठलाग करताना श्र...

October 9, 2024 3:32 PM

views 26

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत अजिंक्य राहणे असेल मुंबई संघाचा कर्णधार

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेसाठीचा मुंबई संघ जाहीर झाला असून, इराणी चषक स्पर्धेत उत्तम कामगिरी करणाऱ्या क्रिकेटपटू तनुष कोटियन याला मुंबई संघात समाविष्ट करण्यात आलं आहे. २०२४-२५ च्या या स्पर्धेच्या पहिल्या दोन फेऱ्यांसाठी १६ सदस्यीय मुंबई संघातून तनुष आपलं कसब दाखवेल. स्पर्धेच्या ‘एलिट ग्रुप ए’ चा साम...

October 9, 2024 2:45 PM

views 31

आर्क्टिक खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आज भारताच्या लक्ष्य सेनचा सामना डेन्मार्कच्या रासमस गेमके याच्याशी होणार

आर्क्टिक खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आज भारताच्या लक्ष्य सेनचा सामना डेन्मार्कच्या रासमस गेमके याच्याशी होईल. तर किरण जॉर्ज आज पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत चिनी तैपेईच्या वांग त्झू वेईशी लढत देईल. महिला एकेरीत भारताच्या पी. व्ही. सिंधू पहिल्याच फेरीत कॅनडाच्या मिशेल लीक कडून पराभूत झाली. दरम्यन, भारता...

October 9, 2024 1:41 PM

views 26

आशियाई टेबल टेनिस विजेतेपद स्पर्धेच्या महिला सांघिक प्रकारात आज भारताचा सामना जपानबरोबर होणार

आशियाई टेबल टेनिस विजेतेपद स्पर्धेच्या महिला सांघिक प्रकारात आज भारताचा सामना जपानबरोबर होणार आहे. कझाकस्तानात सुरु असलेल्या या स्पर्धेत भारतीय संघाने काल उपान्त्यपूर्व फेरीत दक्षिण कोरियाचा ३विरुद्ध २ अशा गुणफरकाने पराभव केला. पुरुष गटाच्या उपान्त्यपूर्व फेरीत आज भारताची लढत कझाकस्तानशी होईल.

October 9, 2024 11:35 AM

views 15

भारत-बांगलादेश दरम्यान आज नवी दिल्ली इथं वीस षटकांचा दुसरा सामना

भारत आणि बांग्लादेश यांच्या पुरुष संघांमध्ये आज नवी दिल्लीत 20 षटकांचा दुसरा सामना खेळला जाणार आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघानं तीन सामन्यांच्या या मालिकेतला पहिला सामना जिंकून 1-0 अशी आघाडी घेतली आहे.  

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.