खेळ

November 22, 2025 3:25 PM

views 45

ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत लक्ष्य सेनची अंतिम फेरीत धडक

ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या लक्ष्य सेननं पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. सिडनी इथं आज झालेल्या उपांत्य सामन्यात त्यानं तैवानच्या चाऊ तिएन-चेन ला १७-२१, २४-२२, २१-१६ असं हरवलं. जागतिक क्रमवारीत चाऊ तिएन चेन दुसऱ्या तर लक्ष्य सेन सातव्या स्थानावर आहे.

November 22, 2025 1:14 PM

views 190

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातला दुसरा कसोटी क्रिकेट सामना सुरु

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातला दुसरा कसोटी क्रिकेट सामना आजपासून गुवाहटी इथं सुरु झाला. हा मालिकेतला अखेरचा सामना आहे.   या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर ८२ धावांची दमदार सलामी दिल्यानंतर मार्करम आणि रिकल्टन, एकामागोमाग एक बाद झाले. त्यानंतर...

November 21, 2025 3:32 PM

views 42

बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपान्त्य फेरीत दाखल

भारतीय बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या  पुरुष एकेरी गटात  उपान्त्य  फेरीत पोहोचला आहे. उपान्त्यपूर्व फेरीत त्याने भारताच्याच आयुष शेट्टीचा २३-२१, २१-११ असा पराभव केला. उपान्त्य फेरीत लक्ष्यचा सामना चिनी तैपेईचा चाऊ-तिएन-चेन बरोबर होईल. जागतिक क्रमवारीत चाऊ दुसऱ्या तर ल...

November 20, 2025 8:08 PM

views 30

ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आयुष शेट्टी, लक्ष्य सेनची उपांत्यपूर्व फेरीत धडक

ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे आयुष शेट्टी आणि लक्ष्य सेन यांनी उपांत्यपूर्व धडक मारली आहे. भारताच्याच सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनेही चायनीज तैपईच्या सु-चींग हेंग आणि वू-गुआन शून यांचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवलं आहे. उपांत्यपूर्व फेरीत सात्विक आण...

November 20, 2025 9:02 PM

views 37

विश्वचषक मुष्टियुद्ध स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय महिलांना सुवर्ण पदक

उत्तर प्रदेशातल्या नॉयडा इथं विश्वचषक मुष्टियुद्ध स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आज अरूंधती चौधरी, प्रीति पवार, मीनाक्षी हुदा आणि नुपुर शेरॉन या भारतीय महिला मुष्टियोद्ध्यांनी सुवर्ण कामगिरी केली. ७० किलो वजनी गटात अरूंधतीनं उझबेकिस्तानच्या अझिजा झोकिरोवाचा ५-० असा सपशेल पराभव केला. प्रीतिनं ५४ किलो वजन...

November 20, 2025 5:43 PM

views 42

कर्णबधिरांच्या ऑलिंपिक स्पर्धेत भारतीय गोल्फपटू दीक्षा डागरनं पटकावलं सुवर्णपदक

जपानमध्ये टोक्यो इथं सुरू असलेल्या कर्णबधिरांच्या ऑलिंपिक स्पर्धेत भारतीय गोल्फपटू दीक्षा डागर हिने सुवर्णपदक मिळवलं आहे. तिने उर्वरित २१ खेळाडूंपेक्षा अधिक गुण मिळवत ही सुवर्णपदकाची कमाई केली. नेमबाजी स्पर्धेत भारताच्य ५० मीटर प्रोन प्रकारात भारताच्या महित संधू याने रौप्यपदक जिंकलं आहे. नेमबाजीत भा...

November 20, 2025 11:30 AM

views 41

एकोणीस वर्षांखालील मुलांच्या विश्वचषक क्रिकेट सामन्यांचे वेळापत्रक जाहीर

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं एकोणीस वर्षांखालील मुलांच्या विश्वचषक क्रिकेट सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. ही स्पर्धा पुढील वर्षी 15 जानेवारी ते 6 फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. झिम्बाब्वे आणि नामिबिया यांनी संयुक्तरित्या याचे आयोजन केलं आहे.   चार गटांमध्ये 16 संघ या स्पर्धेत सहभागी असून...

November 20, 2025 11:25 AM

views 44

ऑस्ट्रेलियन बॅडमिंटन स्पर्धेत लक्ष्य सेन आणि एचएस प्रणॉय यांचा दुसऱ्या फेरीत प्रवेश

ऑस्ट्रेलियन खुल्या सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धेत लक्ष्य सेन आणि एचएस प्रणॉय यांनी पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे.   सिडनी इथं काल झालेल्या सामन्यात लक्ष्य सेननं चिनी तैपेईच्या सु ली-यांगचा पराभव केला, तर एचएस प्रणॉयनं इंडोनेशियाच्या मार्सेलीनोचा पराभव केला.  

November 20, 2025 10:11 AM

views 47

मुकबधिरांच्या ऑलिंपिक स्पर्धेत नेमबाजीत अभिनव देश्वाल आणि प्रांजली धुमाळ या जोडीला सुवर्णपदक

जपानमध्ये टोकिओ इथं सुरू असलेल्या मूकबधीरांच्या 25 व्या ऑलिंपिक स्पर्धेत अभिनव देश्वाल आणि प्रांजली धुमाळ या भारतीय नेमबाज जोडीनं 10 मीटर एअर पिस्तुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं.   अंतिम लढतीत त्यांनी चिनी तैपाईच्या जोडीला 16-6 असं पराभूत केलं. तर, कुशाग्र सिंग राजावतनं 50 मीटर रायफल प्रोन स्पर्...

November 19, 2025 2:56 PM

views 39

जागतिक मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताची उत्तम कामगिरी

ग्रेटर नोएडा इथे शहीद विजय सिंह पाठक क्रीडा संकुलात सुरू असलेल्या जागतिक मुष्टीयुद्ध स्पर्धा २०२५ मध्ये महिलांच्या गटात भारताच्या अरुंधती चौधरी हिनं जर्मनीच्या लिओनी मुलर हिला पराभूत केलं. तर मिनाक्षी, अंकुश फांगळ, प्रवीण आणि नुपूर यांनी त्यांच्या गटात उत्तम कामगिरीची नोंदवत अंतिम फेरीत प्रवेश केला.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.