खेळ

November 25, 2025 2:59 PM

views 42

सुलतान अझलान शाह चषक हॉकी सामन्यात भारताचा पराभव

मलेशियात इपोह मध्ये सुरु असलेल्या सुलतान अझलान शाह चषक हॉकी सामन्यात बेल्जीयमच्या संघाने भारताचा २ -३ असा पराभव केला. भारताने गेल्या रविवारी तिबार विजेत्या दक्षिण कोरियाचा पराभव केल्यामुळे प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. भारताचा पुढला सामना उद्या मलेशियाच्या संघाबरोबर होईल.

November 25, 2025 9:17 AM

views 58

भारताच्या महिला कबड्डी संघाची सलग दुसऱ्यांदा विश्वचषकाला गवसणी

भारताच्या महिला कबड्डी संघानं सलग दुसऱ्यांदा कबड्डी विश्वचषकाला गवसणी घातली आहे. ढाका इथं झालेल्या सामन्यात त्यांनी काल चायनीज तैपेईच्या संघावर 35- 28 अशी मात केली. या स्पर्धेतल्या सर्व सामन्यात भारतीय संघ अजिंक्य राहिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कामगिरीबद्दल भारतीय संघाचं अभिनंदन केलं आह...

November 24, 2025 8:37 PM

views 54

कबड्डीच्या विश्वचषकाला सलग दुसऱ्यांदा भारतीय महिला संघाची गवसणी

भारताच्या महिला कबड्डी संघानं सलग दुसऱ्यांदा कबड्डी विश्वचषकाला गवसणी घातली आहे. ढाका इथं झालेल्या सामन्यात त्यांनी आज चायनीज तैपेईच्या संघावर ३५-२८ अशी मात केली. या स्पर्धेतल्या सर्व सामन्यात भारतीय संघ अजिंक्य राहिला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या कामगिरीबद्दल या संघाचं अभिनंदन केलं आहे.

November 24, 2025 7:32 PM

views 29

डीफॉलिंपिक क्रीडा स्पर्धेत वेगवेगळ्या प्रकारात भारताला दोन सुवर्ण, एक रौप्य पदक

जपानमध्ये टोकिओ इथं सुरू असलेल्या, डीफॉलिंपिक क्रीडा स्पर्धेत भारताच्या प्रांजली प्रशांत धुमाळनं महिलांच्या २५ मीटर पिस्टल नेमबाजीत सुवर्ण पदक पटकावलं. या स्पर्धेतलं तिचं हे तिसरं पदक आहे. याआधी तिनं मिश्र पिस्टल नेमबाजीत अभिनव देश्वाल सोबत सुवर्ण पदक, तर महिलांच्या एअर पिस्टल प्रकारात रौप्य पदक पटक...

November 23, 2025 7:01 PM

views 80

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात गुवाहाटी इथं सुरु

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात गुवाहाटी इथं सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर पहिल्या डावात भारत अजुनही ४८० धावांनी पिछाडीवर आहे. त्याआधी आज दक्षिण आफ्रिकेनं आपल्या पहिल्या डावात ४८९ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेच्या अखेरच्या ४ गड्यांनी आज धावसंख्येत २५२ धावांची भर घात...

November 23, 2025 6:56 PM

views 64

महिलांच्या कबड्डी विश्वचषक स्पर्धेत भारताचा संघ अंतिम फेरीत दाखल

महिलांच्या कबड्डी विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत इराणला नमवून भारत अंतिम फेरीत दाखल झाला आहे. आज झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने इराणचा ३३-२१ अशा गुणफरकाने पराभव केला. भारताकडून पूजा, संजू आणि सोनाली शिंगटे यांनी दिमाखदार चढाया करून गुण मिळवले तर साक्षी आणि रितू नेगी यांनी पकड करून इर...

November 23, 2025 6:51 PM

views 40

दृष्टीहीन महिलांच्या टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताला जेतेपद

भारतानं आज श्रीलंकेत कोलंबो इथं झालेल्या पहिल्या दृष्टीहीन महिला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचं जेतेपद पटकावलं. भारतानं नेपाळचा ७ खेळाडू राखून पराभव केला आणि विश्वजेतेपदाला गवसणी घातली. या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.   त्यानंतर भारतानं केवळ ३...

November 23, 2025 10:44 AM

views 27

ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत लक्ष्य सेनचा अंतिम फेरीत प्रवेश

भारताचा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत लक्ष्यने चायनीज तैपेईच्या चाऊ टिएन-चेन याचा १७-२१, २४-२२, २१-१६ असा पराभव केला.    उत्कृष्ट नेट ड्रॉप्स, अचूक स्मॅश आणि आत्मविश्वासपूर्ण फटक्यांच्या बळावर लक्ष्यनं अंत...

November 22, 2025 8:02 PM

views 61

दृष्टीहीन महिलांच्या टी ट्वेंटी क्रिकेट विश्व चषक स्पर्धेच्या विजेतेपदासाठी उद्या भारत आणि नेपाळ यांच्यात अंतिम लंढत

दृष्टीहीन महिलांच्या टी ट्वेंटी क्रिकेट विश्व चषक स्पर्धेच्या विजेतेपदासाठी भारत आणि नेपाळ यांच्यात अंतिम सामना होणार आहे.  स्पर्धेत आज कोलंबो इथं उपांत्य फेरीत झालेल्या पहिल्या सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियावर ९ खेळाडू राखून विजय मिळवला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. नाणेफेक जिंकून भारतानं ऑस्ट्रेल...

November 22, 2025 6:39 PM

views 205

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातला दुसरा कसोटीत पहिल्या दिवसअखेर दक्षिण आफ्रिकेच्या ६ बाद २४७ धावा

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातला दुसरा कसोटी क्रिकेट सामना आजपासून गुवाहाटी इथं सुरु झाला. हा मालिकेतला अखेरचा सामना आहे. सामन्याच्या आज पहिल्या दिवस अखेर दक्षिण आफ्रिकेनं आपल्या पहिल्या डावात ६ बाद २४७ धावा केल्या आहेत. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. &nb...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.