खेळ

October 16, 2024 9:38 AM

views 37

आयएसएसएफ नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या सोनम मसकरला रौप्य पदक

नवी दिल्ली इथं काल झालेल्या आयएसएसएफ नेमबाजी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताच्या सोनम मसकर हिने 10 मीटर एअर रायफल प्रकारात रौप्य पदक जिंकलं. तिने 252 पूर्णांक 9 गुण मिळवले. या स्पर्धेत चीनच्या युतिंग हुआंगनं सुवर्ण, तर फ्रान्सच्या ओसियन मुलरनं कास्य पदक पटकावलं.

October 16, 2024 3:52 PM

views 21

भारत-न्यूझीलंड यांच्यातला आजच्या दिवसाचा सामना पावसामुळे रद्द

भारत आणि न्यूझीलंडमध्ये सुरू झालेल्या कसोटी क्रिकेट मालिकेच्या पहिल्या सामन्यातला पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे रद्द झाला आहे. सकाळी बेंगळुरूच्या चिन्नास्वामी मैदान परिसरात पाऊस असल्याने सामना सुरू व्हायला उशिर झाला होता. दुपारी चहाच्या विश्रांतीपर्यंत पाऊस कायम राहिल्याने आजच्या दिवसाचा खेळ रद्द झा...

October 15, 2024 2:26 PM

views 21

भारताच्या सोनम उत्तम मस्करनं महिलांच्या १० मीटर एअर रायफलमध्ये पटकावलं रौप्य पदक

नवी दिल्ली इथं झालेल्या I S S F नेमबाजी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताच्या सोनम म्हसकर हिने १० मीटर एअर रायफल प्रकारात आज रौप्य पदक जिंकलं. बावीस वर्षांच्या सोनमने २५२ पूर्णांक ९ गुण मिळवत आपलं पदक निश्चित केलं. या स्पर्धेत चीनच्या युतिंग हुआंग हिने सुवर्ण तर फ्रान्सच्या ओसियन मुलर हिने कांस...

October 15, 2024 2:23 PM

views 15

डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पी. व्ही. सिंधूचा सामना आज चिनी तैपेईच्या पै यू पो हिच्याशी होणार

डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची पी. व्ही. सिंधू आज संध्याकाळी महिला एकेरी प्रकाराच्या पहिल्या फेरीत चिनी तैपेईच्या पै यू पो हिच्याशी लढत देईल. तर पुरुष दुहेरी प्रकारात भारताचा लक्ष्य सेन याची लढत चीनच्या लू गुआंग झू विरुद्ध होईल. महिला दुहेरी प्रकारात रुतपर्णा आणि श्वेतपर्णा पांडा या दोघी...

October 15, 2024 10:08 AM

views 22

महिलांच्या टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताचं आव्हान संपुष्टात

महिलांच्या टी - ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताचं आव्हान संपुष्टात आलं आहे. अ गटात काल झालेल्या सामन्यात न्यूझीलंडच्या संघाने पाकिस्तानचा पराभव करत उपान्त्य फेरीत प्रवेश केल्यानंतर भारतीय संघ चार गुणांसह तिसऱ्या स्थानावर राहीला. ऑस्ट्रेलिया पहिल्या तर पाकिस्तान चौथ्या स्थानावर आहे.

October 14, 2024 3:31 PM

views 18

पॅरिस ऑलिम्पिक, पॅरा ऑलिम्पिक आणि बुद्धीबळ ऑलिम्पियाड स्पर्धेतले विजेते खेळाडू आणि प्रशिक्षकांचा सन्मान

पॅरिस ऑलिम्पिक आणि पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा तसंच बुडापेस्ट इथं झालेल्या बुद्धीबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत गौरवास्पद कामगिरी करणाऱ्या राज्यातील खेळाडूंचा आणि त्यांच्या प्रशिक्षकांचा आज सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या कार्यक्रमात सन्मान करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्...

October 14, 2024 2:26 PM

views 5

महिलांच्या टी २० विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात आज सामना

महिलांच्या टी २० विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात आज संध्याकाळी साडे ७ वाजता सामना होणार आहे.   पाकिस्तान हा सामना जिंकला तर भारताला उपांत्य फेरीत प्रवेश करायची संधी मिळेल. अ गटात ऑस्ट्रेलियानं काल भारतीय संघाला पराभूत केलं. त्यामुळं उपांत्य फेरीतली त्यांची जागा निश्चित झाली आ...

October 14, 2024 11:27 AM

views 14

आशियाई टेबल टेनिस स्पर्धेत भारतीय गटाला कास्य पदक

कझाकस्तानमधील अस्ताना इथे झालेल्या आशियाई टेबल टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरी गटात, उपांत्य फेरीत दाखल झालेल्या भारताच्या अह्यीका मुखर्जी आणि सुतीर्था मुखर्जी या जोडीने कास्य पदक जिंकत, इतिहास रचला आहे. या स्पर्धेत महिला दुहेरीत भारताने पहिल्यांदाच पदक पटकावलं आहे. उपांत्य फेरीत, या जोडीला जपानच्या ...

October 14, 2024 9:27 AM

views 9

महिला टी -20 विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलिया संघाची भारतीय संघावर मात

महिला T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत, शारजाह इथं काल रात्री झालेल्या अ गटाच्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा नऊ धावांनी पराभव केला. 152 धावांचा पाठलाग करताना भारतानं वीस षटकांत नऊ बाद 142 धावा केल्या. कर्णधार हरमनप्रीत कौरनं नाबाद 54 तर दीप्ती शर्मानं 29 धावा केल्या. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलिया...

October 13, 2024 7:07 PM

views 26

चौथी हाॅकी इंडिया वरिष्ठ महिला आंतरविभागीय राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा उद्यापासून सुरू

चौथी हाॅकी इंडिया वरिष्ठ महिला आंतर विभागीय राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा उद्यापासून नवी दिल्लीतल्या मेजर ध्यानचंद क्रीडांगणावर सुरु होणार असून ती २१ तारखेपर्यंत चालणार आहे. या स्पर्धेत चार गटांमध्ये एकूण१२ संघ सहभागी होणार आहेत. साखळी सामन्यांमध्ये प्रत्येक संघ आपल्या गटातल्या सर्व संघांबरोबर खेळेल.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.