खेळ

October 19, 2024 11:00 AM

views 27

न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी क्रिकेटमध्ये भारताच्या दुसऱ्या डावात 3 बाद 231 धावा

न्यूझीलंडविरुद्धच्या बंगळुरू क्रिकेट कसोटीच्या कालच्या तिसऱ्या दिवशी भारतानं दुसऱ्या डावात 3 बाद 231 धावा केल्या. न्यूझीलंडकडे सध्या 125 धावांची आघाडी आहे. भारताकडून विराट कोहली आणि सरफराज खान यांनी प्रत्येकी 70 धावा तर रोहित शर्माने 52 धावा करत भारताचा डाव सावरला. तत्पूर्वी न्यूझीलंडने पहिल्या डावा...

October 18, 2024 10:30 AM

views 28

महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेची अंतिम फेरीत धडक

महिलांच्या 20 षटकांच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेनं अंतिम फेरीत धडक मारली आहे.पहिल्या उपांत्य सामन्यात काल दक्षिण अफ्रिकेनं ऑस्ट्रेलियाचा आठ गडी राखून पराभव केला. दुसरा उपांत्य सामना वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंड यांच्यात आज शारजाह येथे खेळला जाणार आहे.

October 18, 2024 9:11 AM

views 28

बंगळुरु कसोटीत दुसऱ्या दिवसअखेर न्यूझीलंडकडे १३४ धावांची आघाडी

बंगळुरु कसोटीत भारतीय संघाचा पहिला डाव अवघ्या ४६ धावांत आटोपला. भारतीय संघाची ही मायदेशातली सर्वात कमी आणि एकूण तिसऱ्या क्रमांकाची किमान धावसंख्या आहे. विराट कोहलीसह भारताचे पाच खेळाडू शून्यावर बाद झाले. ऋषभ पंतनं २० आणि यशस्वी जयस्वालनं १३ धावा केल्या. मॅट हेन्रीनं १५ धावात ५ तर विल्यम ओरूक यानं १२...

October 18, 2024 8:46 AM

views 44

राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत मुलांच्या गटात छत्रपती संभाजीनगर तर मुलींमधून मुंबईच्या संघाला विजेतेपद

धाराशिव शहरातील छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या मैदानावर सुरू असलेल्या राज्यस्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेतील अंतिम सामन्यात मुलांच्या गटात छत्रपती संभाजीनगर संघानं तर मुलींच्या गटात मुंबई संघानं विजेतेपद पटकावलं आहे. यजमान लातूर विभागाच्या दोन्ही संघास उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. जिल्हा क्रीडा ...

October 17, 2024 8:34 PM

views 23

सॅफ महिला फुटबॉल स्पर्धेत भारताची पाकिस्तानवर मात

नेपाळमधे काठमांडू इथं सुरु झालेल्या सॅफ महिला फुटबॉल स्पर्धेत भारतानं आज पाकिस्तानवर ५-२ नं मात करत, विजयी सलामी दिली. ‘अ’ गटात भारताचा दुसरा सामना येत्या २३ तारखेला बांगलादेशाबरोबर होईल. स्पर्धेतला अंतिम सामना येत्या ३० तारखेला होणार आहे.

October 17, 2024 7:44 PM

views 27

न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतीय संघ पहिल्या डावात ४६ धावात गारद

न्यूझीलंड विरुद्ध भारत कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात आजच्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा न्यूझीलंडच्या ३ बाद १८० धावा झाल्या. आता न्यूझीलंडकडे १३४ धावांची आघाडी आहे. भारताच्या कुलदीप यादव, आर. अश्विन आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक गडी टिपला. बेंगळुरूच्या चिन्नास्वामी मैदानावर आज झालेल...

October 17, 2024 3:15 PM

views 47

SAFF महिला फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा सामना आज पाकिस्तान बरोबर

नेपाळमध्ये सुरू असलेल्या SAFF महिलांच्या फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धांमध्ये भारताचा सलामीचा सामना आज पाकिस्तान बरोबर होत आहे. संध्याकाळी सव्वा पाच वाजता सामना सुरू होईल. स्पर्धांच्या अ गटात भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश असून ब गटात नेपाळ, भूतान, मालदिव आणि श्रीलंकेचा समावेश आहे. अंतिम सामना ३० तारखेला ख...

October 17, 2024 2:48 PM

views 50

जागतिक ISSF नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत अनंतजीत सिंग याला स्कीट फायनल शॉटगन स्पर्धेत कास्यपदक

नवी दिल्ली इथं सुरु असलेल्या जागतिक ISSF नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत आज भारताच्या अनंतजीत सिंग याने स्कीट फायनल शॉटगन स्पर्धेत कास्यपदक पटकावलं. तर मैराज खान याला सहाव्या स्थानावर समाधान मानावं लागलं.तत्पूर्वी आज महिलांच्या स्कीट फायनलमध्ये गनेमत सेखॉन सहाव्या स्थानापर्यंतच पोहोचू शकली. कालच्या पात्रत...

October 17, 2024 12:42 PM

views 26

डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पी व्ही सिंधूची चीनच्या हान यू हिच्याशी लढत

डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरी प्रकारात भारताच्या पी व्ही सिंधूची गाठ आज उप-उपांत्यपूर्व फेरीत चीनच्या हान यू हिच्याशी पडणार आहे. स्पर्धांच्या पहिल्या सामन्यात प्रतिस्पर्ध्याने सामना अर्ध्यावर सोडून दिल्यामुळे सिंधूला पुढे चाल मिळाली होती. आज दुपारी १ वाजून ५० मिनिटांनी हा सामना स...

October 16, 2024 2:51 PM

views 27

स्टॉकहोम खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत विजय सुंदर प्रशांत आणि जीवन नेदुनचेझियानचा उपांत्य पूर्व फेरीत प्रवेश

स्टॉकहोम खुल्या टेनिस स्पर्धेत भारताचा विजय सुंदर प्रशांत आणि जीवन नेदुनचेझियान यांनी पुरुष दुहेरीच्या उपांत्य पूर्व फेरी गाठली. या जोडीची लढत पेट्र नौजा आणि पॅट्रिक रिकल यांच्याशी होणार आहे. दरम्यान, पुरुष एकेरीच्या पहिली फेरीत भारताचा सुमित नागल याची गाठ फ्रान्सच्या क्वेंटिन हेलीज याच्याशी होईल. ह...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.