खेळ

October 21, 2024 8:50 AM

views 32

बंगळुरू क्रिकेट कसोटीमध्ये न्यूझीलंडचा भारतावर ८ गडी राखून विजय

बंगळुरू क्रिकेट कसोटीमध्ये न्यूझीलंडनं काल भारताचा आठ गडी राखून पराभव केला आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. भारतानं विजयासाठी दिलेलं १०७ धावांचं लक्ष्य न्यूझीलंडनं दोन गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं. उभय संघातील तीन सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना 24 तारखेपासून पुण्यात महाराष्ट्र क्रिकेट असोसिएश...

October 20, 2024 1:48 PM

views 34

टेनिस : स्विझ इनडोअर टूर्नामेंटमध्ये भारताच्या सुमित नागलकडून अर्जेंटिनाच्या फाकुंदो डियाझचा पराभव

टेनिसमध्ये स्विझ इनडोअर टूर्नामेंटच्या पुरुष एकेरीच्या पहिल्या पात्रता फेरीत काल झालेल्या सामन्यात भारताच्या सुमित नागल याने अर्जेंटिनाच्या फाकुंदो डियाझ अकॉस्टा याचा ५-७, ७-६, ७-७ असा पराभव केला. दुसऱ्या पात्रता फेरीत सुमितचा सामना ऑस्ट्रेलियाच्या जेम्स डकवर्थ याच्याशी होणार आहे.    दरम्यान, प...

October 20, 2024 10:24 AM

views 25

कसोटी क्रिकेट मालिकेत आज न्यूझिलंड आणि भारत यांच्यात दुसऱ्या डावाचा सामना

बंगळुरु इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात न्यूझिलंड आज दुसऱ्या डावाची सुरुवात करणार आहे. एमए चिदंबरम मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात न्यूझिलंडला जिंकण्यासाठी केवळ 107 धावांची गरज आहे. कसोटीच्या कालच्या चौथ्या दिवशी भारतानं दुसऱ्या डावात 462 धावा केल्या. सरफराज खानची शतकी खेळी आणि ऋषभ पंतच्...

October 20, 2024 10:23 AM

views 26

महिलांच्या T20 क्रिकेट स्पर्धेत न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका दरम्यान जेतेपदासाठी लढत

महिलांच्या T20 क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेत आज दुबई इथं न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका विजेतेपदासाठी लढणार आहेत. 2016 नंतर प्रथमच या स्पर्धेचा नवीन विजेता असेल. संध्याकाळी साडेसात वाजता हा सामना सुरू होणार आहे.

October 20, 2024 1:44 PM

views 37

हॉकी : जोहोर सुलतान विश्वकरंडक स्पर्धेत भारताचा जपानवर ४-२ असा विजय

हॉकीमध्ये भारताच्या कनिष्ठ पुरुष संघानं जोहोर सुलतान २०२४ विश्वकरंडक स्पर्धेत जपानच्या संघाचा ४-२ असा पराभव केला. मलेशियातील तमन दाया हॉकी मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे. आमीर अली, गुरज्योतसिंग, आनंद सौरभ कुशवाहा आणि अंकित पाल यांनी भारतासाठी गोल केले. हॉकीपटू पी. आर. श्रीजेश या संघाचा प्रशिक्षक आहे. ...

October 19, 2024 8:36 PM

views 31

न्यूझिलंड विरुद्धच्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात भारतीय संघ ४६२ धावांवर तंबूत

भारत आणि न्यूझीलंड दरम्यान बंगळुरूच्या चिन्नास्वामी मैदानावर सुरु असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटीच्या आजच्या दिवसअखेर भारताचा संघ ४६२ धावांवर सर्वबाद झाला. सध्या भारताकडे १०६ धावांची आघाडी आहे. भारताच्या सरफराज खाननं दीडशे धावा झळकवल्या, तर रिषभ पंतचं शतक थोडक्यात हुकलं. सध्या भारताचा संघ कसोटी क्रिक...

October 19, 2024 2:11 PM

views 60

सुल्तान जोहोर चषक स्पर्धेत भारतीय ज्युनिअर पुरुष हॉकी संघाचा पहिला सामना आज जपानशी होणार

मलेशिया इथं होणाऱ्या सुल्तान जोहोर चषक स्पर्धेत भारतीय ज्युनिअर पुरुष हॉकी संघाचा पहिला सामना आज जपानशी होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी १ वाजून ३५ मिनिटांपासून हा सामना सुरू होत आहे. भारताची लढत २० ऑक्टोबरला ग्रेट ब्रिटनशी, २२ ऑक्टोबरला मलेशियाशी आणि २३ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. सांघिक ल...

October 19, 2024 3:45 PM

views 52

बंगलोर क्रिकेट कसोटी सामन्यात भारताच्या दुसऱ्या डावात फलंदाजांना सूर गवसला

भारत आणि न्यूझीलंड दरम्यान बेंगळुरूच्या चिन्नास्वामी मैदानावर सुरु असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटीत अखेर भारतीय फलंदाजांना सूर गवसला.  काल तिसऱ्या दिवशी रोहित शर्मा, विराट कोहली आणि सर्फराझ खान यांनी अर्धशतकं झळकावली आणि दिवसअखेर ३ बाद २३१ धावांचा पल्ला गाठला. आज सकाळी खेळ सुरु झाल्यावर सर्फराज खाननं...

October 18, 2024 8:21 PM

views 42

डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूचं आव्हान संपूष्टात

डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आज भारताची बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूला महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत इंडोनेशियाच्या ग्रेगोरिया मारिस्का तुनजुंगकडून पराभव पत्करावा लागला. मारिस्का तुनजुंगने सिंधूचा १३-२१, २१-१६, ९-२१ असा पराभव केला.

October 18, 2024 1:44 PM

views 25

डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पी.व्ही.सिंधूची इंडोनेशियाच्या ग्रेगोरिया तुनजुंगशी लढत

डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आज भारताच्या पी. व्ही. सिंधू हिची लढत इंडोनेशियाच्या ग्रेगोरिया तुनजुंग हिच्याशी होणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना दुपारी ४ वाजून १० मिनिटांनी सुरू होईल. काल या स्पर्धेच्या १६व्या फेरीत सिंधूने चीनच्या हान यू हिचा १८-२१, २१-१२, २१-१६ असा पराभव केला होता.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.