खेळ

December 3, 2024 2:23 PM December 3, 2024 2:23 PM

views 8

गिनी देशात फुटबॉल सामन्यादरम्यान झालेल्या हिंसाचार आणि चेंगराचेंगरीच्या घटनेत ५६ जणांचा मृत्यू

गिनी देशात एनझेरेकोर शहरात फुटबॉल सामन्यादरम्यान झालेल्या हिंसाचार आणि चेंगराचेंगरीच्या घटनेत ५६ जणांचा मृत्यू झाला आहे. सरकार सर्वप्रकारची मदत करत असल्याचं सांगून गिनीचे राष्ट्राध्यक्ष मामाडी डौम्बोया यांनी मृतांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं आहे. दुर्घटनेची कारणं शोधण्यासाठी प्रधानमंत्री अमादोउ ओर...

December 3, 2024 10:20 AM December 3, 2024 10:20 AM

views 6

कनिष्ठ आशिया करंडक हॉकी स्पर्धेत भारत उपांत्यफेरीत

पुरुषांच्या कनिष्ठ आशिया चषक स्पर्धेच्या उपान्त्य फेरीत आज भारतीय संघाची मलेशिया बरोबर लढत होणार आहे. ओमानमध्ये मस्कत इथं भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री साडेआठ वाजता हा सामना सुरू होईल. या आधी रविवारी झालेल्या सामन्यानं भारतानं दक्षिण कोरियाचा 8 विरुद्ध 1 गोलाने पराभूत करून अ गटात अव्वल स्थान मिळवलं ...

December 2, 2024 7:43 PM December 2, 2024 7:43 PM

views 1

बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय ग्रँडमास्टर डी. गुकेश आणि चीनचा डिंग लिरेन यांच्यातला सामना अनिर्णित

जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय ग्रँडमास्टर डी. गुकेश आणि चीनचा डिंग लिरेन यांच्यातला आणखी एक सामना अनिर्णित राहिला. सलग तिसरा सामना बरोबरीत सुटल्यानं अंतिम फेरीत लिरेन आणि गुकेश यांचे प्रत्येकी ३ गुण झाले आहेत. दोन्ही खेळाडूंना अजूनही विजेतेपदासाठी प्रत्येकी साडेचार गुणांची आवश्यकता आहे. ...

December 2, 2024 7:26 PM December 2, 2024 7:26 PM

views 8

२०३६ मध्ये ऑलिम्पिक खेळांच्या यजमानपदासाठी आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीशी बोलणी सुरू

भारतीय ऑलिपिंक संघटनेनं २०३६ मध्ये ऑलिम्पिक खेळांच्या यजमानपदासाठी आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीशी बोलणी सुरू केली आहेत. गेल्या ऑक्टोबर महिन्यात या संबंधीचं पत्र जारी केलं आहे, अशी माहिती युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी आज लोकसभेत लेखी उत्तरात दिली. 

December 2, 2024 7:20 PM December 2, 2024 7:20 PM

views 8

U-19 आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत अ-गटात भारताचा जपानवर २११ धावांनी विजय

१९ वर्षाखालील आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज अ-गटात भारताने जपानचा २११ धावांनी पराभव केला. संयुक्त अरब अमिरातीतल्या शारजाह स्टेडीयमवर झालेल्या या सामन्यात जपानने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यानंतर भारताने विजयासाठी दिलेलं ३४० धावांचं उद्दिष्ट गाठताना जपानचा डाव १२...

December 2, 2024 7:56 PM December 2, 2024 7:56 PM

views 10

पुरुष हॉकी कनिष्ठ आशिया चषक स्पर्धेत भारत आणि मलेशिया यांच्यात उद्या उपांत्य फेरीचा सामना

पुरुष हॉकी कनिष्ठ आशिया चषक स्पर्धेत भारत आणि मलेशिया यांच्यात उद्या उपांत्य फेरीचा सामना होणार आहे. ओमानमध्ये मस्कत इथं ओमान स्टेडियमवर संध्याकाळी साडे आठ वाजता सामन्याला सुरुवात होईल. उपांत्य फेरीतला दुसरा सामना पाकिस्तान आणि जपान यांच्यात उद्या होणार आहे. तर या स्पर्धेतला अंतिम सामना ४ डिसेंबर रो...

December 2, 2024 10:42 AM December 2, 2024 10:42 AM

views 7

कनिष्ठ आशिया करंडक हॉकी स्पर्धेत भारत उपांत्यफेरीत

ओमान मधील मस्कत इथं सुरू असलेल्या कनिष्ठ आशिया करंडक हॉकी स्पर्धेत काल रात्री झालेल्या सामन्यात भारतानं दक्षिण कोरियाचा ८-१ असा पराभव करत अ गटात अव्वल स्थान मिळवलं आहे. उपांत्य फेरीत भारताचा सामना उद्या मलेशियाशी होणार आहे.

December 1, 2024 3:17 PM December 1, 2024 3:17 PM

views 19

ओमानमध्ये सुरू असलेल्या कनिष्ठ गटाच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत आज भारताचा सामना दक्षिण कोरियासोबत होणार

ओमानमध्ये सुरू असलेल्या कनिष्ठ गटाच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत आज भारताचा सामना दक्षिण कोरियासोबत होणार आहे. अ गटात असलेल्या भारताचा हा अखेरचा गटसाखळी सामना असेल. भारतीय प्रमाण वेळेनुसार आज रात्री साडेआठ वाजता हा सामना सुरू होईल. भारतानं याआधीचे आपले तिन्ही सामने जिंकले असून, सध्या भारत गुणतालिकेत ९...

December 1, 2024 8:56 AM December 1, 2024 8:56 AM

views 8

बॅडमिंटनमध्ये भारताच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी

सय्यद मोदी भारतीय आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत, भारताच्या लक्ष्य सेननं पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीत सेननं जपानच्या शोगो ओगावाचा २१-८, २१-१४ असा पराभव केला. अंतिम सामन्यात लक्ष सेनची लढत सिंगापूरच्या जिया हेंग जेसन तेहशी होईल. दरम्यान भारताच्या पी व्ही सिंधूनंही महिला...

November 30, 2024 8:21 PM November 30, 2024 8:21 PM

views 1

१९ वर्षाखालील आशिया चषक क्रिकेट : पाकिस्तान विरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारताचा पराभव

दुबईत सुरू असलेल्या १९ वर्षाखालील आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानबरोबरचा सामना भारताचा ४३ धावांनी गमावला. प्रथम फलंदाजी करत पाकिस्तानच्या शाहजाब खान आणि उस्मान खान यांच्या जोडीनं ५० षटकात ७ गडी बाद करत २८१ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल भारताचा डाव ४८ षटकात २३७ धावाच करु शकला...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.