खेळ

November 29, 2025 3:06 PM

views 30

सुलतान अझलनशाह हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताचा प्रवेश

भारताचा हॉकी संघ सुलतान अजलनशाह चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. इपोह इथं झालेल्या उपान्त्य सामन्यात भारतानं कॅनडावर १४ विरुद्ध ३ अशा गोलफरकाने दणदणीत विजय मिळवला. जुगराज सिंगने ४ गोल केले.

November 28, 2025 1:36 PM

views 88

विमेन्स प्रिमिअर लिग मेगा लिलावात दीप्ती शर्मा ठरली महागडी खेळाडू

महिला क्रिकेटपटू दीप्ती शर्मा २०२६ विमेन्स प्रिमिअर लिग मेगा लिलावात सर्वात महागडी खेळाडू ठरली. दीप्तीला मोठी बोली मिळताच युपी वॉरियर्जने राईट टू मॅच कार्ड वापरून तिला तीन कोटी २० लाख रुपयांत संघात कायम ठेवलं. दीप्ती शर्मा डब्लुपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक मानधन मिळवणारी दुसरी भारतीय खेळाडू ठरली असू...

November 26, 2025 7:58 PM

views 40

अहमदाबादमध्ये १००वी राष्ट्रकुल स्पर्धा २०३० मध्ये होणार

१००वी राष्ट्रकुल स्पर्धा २०३० मध्ये गुजरातच्या अहमदाबाद इथं होणार आहेत. राष्ट्रकुल संघटनेनं आज ग्लासगो इथं औपचारिकरीत्या आयोजनाचे अधिकार भारताकडे सोपवले. यात ७४ देशातले खेळाडू सहभागी होतील. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आयोजनाची संधी मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. जगभरातल्या खेळाडूंचं स्वागत ...

November 26, 2025 7:53 PM

views 30

उझबेकिस्तानचा ग्रँडमास्टर जावोखीर सिंदारोव्हला फिडे विश्वचषक स्पर्धेचं अजिंक्यपद

उझबेकिस्तानचा ग्रँडमास्टर जावोखीर सिंदारोव्ह यानं फिडे विश्वचषक स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं आहे. अवघ्या १९व्या वर्षी ही कामगिरी करणारा तो सर्वात कमी वयाचा बुद्धिबळपटू ठरला आहे. गोव्यातल्या अरपोरा इथं झालेल्या या स्पर्धेत त्यानं चीनचा ग्रँडमास्टर वेई यी याला हरवलं. सिंदारोव्ह, वेई यी आणि रशियाचा आंद्...

November 26, 2025 3:37 PM

views 29

सैयद मुश्ताक अली टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धा आजपासून सुरु

सैयद मुश्ताक अली टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धा आजपासून सुरु झाली. या स्पर्धेत ३८ संघ सहभागी होत आहेत. उद्घाटनाचा सामना मिझोराम आणि नागालँड यांच्यात पुण्याच्या डेक्कन जिमखाना मैदानावर होत आहे. स्पर्धेतला अंतिम सामना १८ डिसेंबरला इंदूरमध्ये होईल. गतविजेत्या मुंबई संघाचं कर्णधारपद यावेळी शार्दूल ठाकूरकडे ...

November 26, 2025 3:31 PM

views 23

फिफा विश्वचषक फूटबॉल स्पर्धेची प्राथमिक फेरी येत्या ५ डिसेंबरपासून

फिफा विश्वचषक फूटबॉल स्पर्धेची प्राथमिक फेरी येत्या ५ डिसेंबरपासून वॉशिंग्टन इथं सुरू होणार आहे. याच्या दुसऱ्या दिवशी स्टेडियम आणि किक-ऑफ सह सामन्यांचं वेळापत्रक जाहीर होईल. पुढच्या वर्षी ११ जूनपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेचं संयुक्त यजमानपद अमेरिका, मॅक्सिको आणि कॅनडा या तीन देशांकडे आहे. स्पर्धेच...

November 26, 2025 8:04 PM

views 65

दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा दुसरा कसोटी सामना आणि मालिका भारतानं गमावली

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यात भारताचा पराभव झाला आणि ही मालिकांही भारतानं २-० अशी गमावली. आज पाचव्या दिवशी २ बाद २७ वरून सुरू झालेला भारताचा डाव अवघा १४० धावांत आटोपला. दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात ४८९ तर दुसऱ्या डावात २६० धावा केल्या होत्या. भारताचा संघ पहिल्या डावात ...

November 25, 2025 8:11 PM

views 27

डेफलिम्पिक्स नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताची १६ पदकांची कमाई

टोक्यो इथं झालेल्या डेफलिम्पिक्स नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारतानं यंदा १६ पदकांची चमकदार कामगिरी केली. यात ७ सुवर्ण, ६ रौप्य आणि ३ कांस्यपदकांचा समावेश आहे. १० दिवस चाललेल्या या स्पर्धेत एकंदर ३९ पदकांपैकी १६ पदकं भारतानं पटकावली. रायफल नेमबाज महित संधू हिनं २ सुवर्ण आणि २ रौप्यपदकांवर नाव कोरलं. ...

November 25, 2025 8:36 PM

views 36

आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर

टी-२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धा २०२६, ७ फेब्रुवारी ते ८ मार्चदरम्यान होणार आहे. आयसीसीचे अध्यक्ष जय शहा यांनी आज या स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलं. भारतात पाच ठिकाणी, तर श्रीलंकेत ३ ठिकाणी या स्पर्धेचे सामने होतील. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांचा समावेश, अमेरिका, नेदरलँड्स आणि नामिबियासह अ गटात ...

November 25, 2025 7:31 PM

views 46

कसोटी क्रिकेट सामन्यात दक्षिण अफ्रिकेचा डाव ५ बाद २६० वर घोषित

गुवाहाटी इथं बारसापारा स्टेडियमवर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या दुसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशीचा खेळ आज संपला तेव्हा भारताच्या २ बाद २७ धावा झाल्या होत्या. सलामीचे फलंदाज यशस्वी जैस्वाल आणि के एल राहुल बाद  झाल्यानंतर मैदानात आलेले साई सुदर्शन २ धावांवर आणि कुलदीप ...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.