प्रादेशिक बातम्या

December 11, 2025 3:43 PM December 11, 2025 3:43 PM

views 14

राज्यात एकही शेतकरी लाभार्थी योजनांच्या लाभापासून वंचित राहणार नाही – कृषीमंत्री

शेतकऱ्यांना शेततळी, अवजार खरेदी आणि इतर गरजांच्या मदतीसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही आणि एकही शेतकरी लाभार्थी वंचित राहणार नाही, अशी ग्वाही कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज विधानपरिषदेत दिली.   गेल्या ४ वर्षांपासून विविध प्रकारच्या मदतीसाठी शेतकऱ्यांनी केलेले सुमारे ४८ लाख अर्ज कारवाईविना ...

December 11, 2025 2:55 PM December 11, 2025 2:55 PM

views 9

ठाणे जिल्ह्यात दहशतवाद विरोधी पथकाची छापेमारी

दहशतवादी कारवायांना पैसा पुरवठा प्रकरणी ठाणे जिल्ह्यात पडघा इथं सक्तवसुली संचालनालय आणि दहशतवाद विरोधी पथकानं आज सकाळी छापेमारी केली.   यावेळी पडघा परिसरातल्या काही घरांमध्ये केलेल्या तपासात इलेक्ट्रॉनिक उपकरणं आणि बनावट कागदपत्र जप्त करण्यात आल्याचं संबंधित सूत्रांनी सांगितलं.

December 11, 2025 1:28 PM December 11, 2025 1:28 PM

views 8

राज्यसभेत आज वंदे मातरमच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवानिमित्तच्या चर्चेचा समारोप

वंदे मातरम हा देशाचा आत्मा जागृत करण्याचा मंत्र आणि देशाच्या पुनर्निर्माणाचं आवाहन आहे, असं प्रतिपादन राज्यसभेचे सभागृह नेते जे. पी. नड्डा यांनी केलं. वंदे मातरम या गीताच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त चर्चेचा समारोप करताना ते बोलत आहेत. या चर्चेत ८० पेक्षा जास्त खासदारांनी भाग घेतला असून स...

December 10, 2025 8:14 PM December 10, 2025 8:14 PM

views 53

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना योग्य वेळी रुपये देण्याचं राज्य सरकारचं आश्वासन

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना २१०० रुपयांचा हप्ता योग्य वेळी देण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत एका लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली. लाडकी बहीण योजनेसाठी  २ कोटी ४३ लाख ८२ हजार ९३६ अर्ज विभागाने पात्रतेनुसार ग्राह्य धरले आहेत, अशी माहिती महिला...

December 10, 2025 8:24 PM December 10, 2025 8:24 PM

views 20

जमीन घोटाळ्यात पार्थ पवार यांना वाचवण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे का? – मुंबई उच्च न्यायालय

पुण्यातल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांचं नाव एफआयआरमधे न नोंदवता इतर व्यक्तींची चौकशी करत पोलीस पार्थ पवार यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत का, असा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाने विचारला आहे. या प्रकरणातील आरोपी शीतल तेजवानी यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जा...

December 10, 2025 7:09 PM December 10, 2025 7:09 PM

views 18

वाहनांच्या ई-चलानच्या यंत्रणेत बदल करणार, लोक अदालतीतून थकीत दंड वसुलीचाही प्रयत्न

वाढती वाहनसंख्या तसंच ई - चलानच्या यंत्रणेत बदल करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा अभ्यासगट स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी विधानपरिषदेत ही घोषणा केली. ई चलानची वसुली करण्यासाठी लोक अदालत सारखा उपक्रम राबवण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.   राज्यात सर्व...

December 10, 2025 3:36 PM December 10, 2025 3:36 PM

views 34

महाराष्ट्रात इलेक्ट्रिक वाहनांसाठीची टोलमाफी येत्या 8 दिवसात लागू करावी- विधानसभा

महाराष्ट्रात सर्व इलेक्ट्रिक वाहनांना शासनाने जाहीर केलेली टोलमाफी येत्या आठ दिवसात लागू करण्यात यावी आणि निर्णय लागू केल्यापासून आजवर वसूल झालेली टोल रक्कम परत करावी, असे निर्देश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज महाराष्ट्र विधानसभेत दिले. प्रश्नोत्तराच्या तासात ते बोलत होते. याबाबतचा प्रश्न शंकर जगत...

December 10, 2025 3:31 PM December 10, 2025 3:31 PM

views 14

गडचिरोलीत ११ नक्षली अतिरेक्यांचं आत्मसमर्पण

गडचिरोली इथं आज ११ जहाल नक्षलवाद्यांनी महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यासमोर आत्मसमर्पण केलं. त्यांच्यावर एकंदर ८२ लाख रुपयांचं बक्षीस होतं. विभागीय समितीच्या दोन सदस्यांचाही यात समावेश आहे.   यावेळी रश्मी शुक्ला यांनी जहाल नक्षलवादी भूपती याच्या शरणागतीत महत्त्वाची भूमिका बज...

December 9, 2025 7:31 PM December 9, 2025 7:31 PM

views 28

राज्यात गारठा वाढला!

राज्यात बऱ्याच ठिकाणी गारठा वाढला आहे. धुळे शहर आणि जिल्ह्यात पुन्हा थंडीची लाट पसरली असून आज पारा ५ पूर्णांक ३ दशांश अंश सेल्सीअसपर्यंत घसरला. उत्तरेकडून थंड वारे वाहत असल्यानं हुडहुडी वाढली आहे. नाशिक जिल्ह्यात निफाड तालुक्यात आज ५ पूर्णांक ९ दशांश अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. नाशिक शहरातही प...

December 9, 2025 7:11 PM December 9, 2025 7:11 PM

views 79

तुकडेबंदी कायद्यातल्या जाचक अटी शिथिल करणाऱ्या विधेयकाला विधानसभेची मंजुरी

तुकडेबंदी कायद्यातल्या जाचक अटी शिथिल करणारं विधेयक आज विधानसभेत मंजूर झालं. यामुळं सर्व जमीन धारकांची नावं सात बाऱ्यावर येतील आणि लहान भूखंडाची खरेदी विक्री सुलभ होईल, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.    या नवीन विधेयकामुळे आता विकास आराखडा किंवा प्रादेशिक आराखडा मंजूर अस...