प्रादेशिक बातम्या

November 22, 2025 7:13 PM November 22, 2025 7:13 PM

views 24

धाराशिव जिल्ह्यातल्या अणदूर जवळ रस्ते अपघातात ४ जणांचा मृत्यू तर ५ जण गंभीर जखमी

धाराशिव जिल्ह्यातल्या अणदूर जवळ आज सकाळी एका वाहन अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला असून ५ जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये ३ महिलांचा समावेश आहे. धावत्या क्रूझर गाडीचे टायर फुटल्याने चालकाचं नियंत्रण सुटलं आणि हा अपघात झाला. हे सर्व जण सोलापूर जवळच्या कासेगाव-उळे इथून निघाले होते.

November 22, 2025 7:00 PM November 22, 2025 7:00 PM

views 36

पालघर जिल्ह्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जाहीर सभा

राज्यातल्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी काल अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं असून उमेदवार आणि पक्षांनी प्रचाराला जोमाने सुरुवात केली आहे. आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्या, असं आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ ...

November 22, 2025 6:10 PM November 22, 2025 6:10 PM

views 7

जगभरातल्या भाषांमधलं नोबेलप्राप्त साहित्य मराठीत अनुवादित करण्यासाठी सरकारनं अनुदान द्यावं-ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस

'मराठी साहित्य संमेलनांवर खर्च करण्यापेक्षा जगभरातल्या वेगवेगळ्या भाषांमधलं दर्जेदार, तसंच नोबेलप्राप्त साहित्य लगेच मराठीत अनुवादित करण्यासाठी सरकारनं अनुदान द्यावं, अशी अपेक्षा ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस यांनी व्यक्त केली. मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृती...

November 22, 2025 6:04 PM November 22, 2025 6:04 PM

views 12

२०२९ पर्यंत काँग्रेस पक्षाचं अस्तित्व फार शिल्लक राहणार नाही- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

काँग्रेस पक्षाच्या नेत्यांमध्ये प्रचंड विसंगती असल्यानं हा पक्ष देशातून हद्दपार होत आहे. २०२९ पर्यंत या पक्षाचं अस्तित्व फार शिल्लक राहणार नाही, असं  मत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज व्यक्त केलं. गडचिरोली इथं भाजपच्या नगर परिषद निवडणुकीच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन झालं.त्यानंतर झालेल्या...

November 22, 2025 5:51 PM November 22, 2025 5:51 PM

views 7

हज यात्रेशी निगडित सर्व प्रक्रिया डिजिटल करून मानवी हस्तक्षेप दूर करण्याच्या भारतीय हज समितीला सूचना

हज यात्रेशी निगडित सर्व प्रक्रिया डिजिटल करून मानवी हस्तक्षेप दूर करण्याच्या सूचना केंद्रीय अल्पसंख्यक सचिव चंद्र शेखर कुमार यांनी भारतीय हज समितीला दिल्या आहेत. मुंबईत झालेल्या हज परिषदेत ते बोलत होते. हज यात्रेसाठी अर्ज करण्यापासून यात्रेहून परत आल्यानंतर करायच्या प्रक्रिया सुद्धा डिजिटल करण्याची ...

November 22, 2025 3:54 PM November 22, 2025 3:54 PM

views 28

राष्ट्रीय छात्र सेना-NCC ची क्षमता १७ लाखांवरून २० लाखापर्यंत वाढवण्याचा सरकारचा विचार

राष्ट्रीय छात्र सेना-NCC ची क्षमता १७ लाखांवरून २० लाखापर्यंत वाढवण्याचा आणि राष्ट्रीय विकास तसंच राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भात विविध कार्यक्रमांत एनसीसीचा सहभाग वाढवण्याचा सरकारचा विचार आहे. सुरक्षा सचिव राजेश कुमार सिंह यांनी ७८ व्या राष्ट्रीय छात्र सेना दिनानिमित्तानं नवी दिल्लीत राष्ट्रीय समर स्मारक...

November 22, 2025 3:49 PM November 22, 2025 3:49 PM

views 17

हिवाळी अधिवेशनापूर्वी बैठक घेऊन तोडगा काढावा – सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी विकास परिषदेची मागणी

सार्वजनिक ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी बैठक घेऊन तोडगा काढावा अशी मागणी सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी विकास परिषदेनं केली आहे. परिषदेचे अध्यक्ष सदाशिव बेडगे यांनी तसं निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केलं आहे. बैठक न झाल्यास येत्या अकरा ड...

November 22, 2025 3:40 PM November 22, 2025 3:40 PM

views 20

राज्यातल्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर निवडणुकीचं चित्र स्पष्ट

  लातूरमध्ये ४ नगर परिषदा आणि एका नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी ४४ तर सदस्य पदासाठी ६१४ जण निवडणुकीच्या रिंगणात उरले आहे. लातुरमध्ये काल नगराध्यक्ष पदासाठीच्या एकूण १५ तर सदस्य पदासाठीच्या १०७ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. रत्नागिरी जिल्ह्यातही नगराध्यक्षपदांच्या सात, तर नगरसेवकपदांच्या ८४ अशा एकू...

November 22, 2025 3:20 PM November 22, 2025 3:20 PM

views 26

राज्यात दोन वेगवेगळ्या अपघातात ८ जण ठार ८ जण जखमी

राज्यात दोन वेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातांमधे ८ जणांचा मृत्यू झाला तर ८ जण जखमी झाले. धाराशिव जिल्ह्यातल्या अणदूर जवळ आज सकाळी एका वाहन अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला असून ५ जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये ३ महिलांचा समावेश आहे. धावत्या क्रूझर गाडीचे टायर फुटल्याने चालकाचं नियंत्रण सुटलं आणि हा अपघात ...

November 21, 2025 7:03 PM November 21, 2025 7:03 PM

views 4.5K

Malegaon Case: बालिकेवर झालेल्या अत्याचाराप्रकरणी आरोपीला फाशीच्या शिक्षेची मागणी

बालिकेवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या निषेधार्थ आज नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. सर्वपक्षीयांच्यावतीनं काढण्यात आलेल्या जनआक्रोश मोर्चात हजारो नागरिकांनी स्वयंस्फूर्तीनं सहभागी होत आरोपीच्या फाशीच्या शिक्षेची मागणी केली.  जमावानं  घाेषणाबाजी करत न्यायालयात  घुसण्याचा प्...