प्रादेशिक बातम्या

September 18, 2025 1:22 PM September 18, 2025 1:22 PM

views 71

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नेपाळच्या हंगामी प्रधानमंत्री सुशीला कार्की यांच्याशी संवाद साधला

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नेपाळच्या हंगामी प्रधानमंत्री सुशीला कार्की यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. नेपाळमधील सद्यस्थितीबद्दल चर्चा केल्याचं प्रधानमंत्री मोदी यांनी समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशात म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी युवा पिढीनं केलेल्या आंदोलनात झालेल्या जीवितहानीबद्दल ती...

September 18, 2025 3:17 PM September 18, 2025 3:17 PM

views 131

ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन मेहेंदळे यांचं निधन

ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन भास्कर मेहेंदळे यांच्या पार्थिवावर आज पुणे इथल्या वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मेहेंदळे यांचं काल  हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं. ते ७८ वर्षांचे होते. गेली ५० वर्षं मेहेंदळे यांनी इतिहासाच्या संशोधन कार्याला वाहून घेतलं होतं. शिव...

September 17, 2025 9:02 PM September 17, 2025 9:02 PM

views 29

त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासंदर्भातला अहवाल डिसेंबरपर्यंत सादर करण्याचा मानस

राज्यातील शाळांमध्ये त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासंदर्भातला अहवाल ५ डिसेंबरपर्यंत सादर करण्याचा मानस असल्याचं समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र जाधव यांनी आज मुंबईत सांगितलं. त्रिभाषा सुत्र समितीद्वारे वेबसाईट आणि विशेष लिंक तयार करण्यात येणार आहे. त्यावर त्रिभाषा धोरण संदर्भात मत मांडता येईल, असं ते म्हण...

September 17, 2025 8:19 PM September 17, 2025 8:19 PM

views 80

नवीकरणीय ऊर्जेसाठी लागणाऱ्या विविध घटकांवरचा GST ५ टक्के

जीएसटी परिषदेनं अनेक वस्तू आणि क्षेत्रांमधले जीएसटीचे दर कमी केले आहेत. त्यात नवीकरणीय ऊर्जेसाठी लागणाऱ्या विविध घटकांवरचा जीएसटी १२ टक्क्यांवरून ५ टक्के झाला आहे. या सुधारणांमुळे छतांवर लावण्यात येणारी सौरयंत्रणा, सौरपंप आणि तत्सम इतर उपकरणांची किंमतही कमी होईल, ज्यामुळे शेतकरी, उद्योग आणि विकासकां...

September 17, 2025 8:58 PM September 17, 2025 8:58 PM

views 21

लाडक्या बहिणींना बिनव्याजी एक लाख रुपयांचं कर्ज देण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

प्रत्येक गावात जिल्हा बँकेमार्फत लाडक्या बहिणींना बिनव्याजी एक लाख रुपयांचं कर्ज देऊन शासन त्यांना आर्थिक पाठबळ देईल. त्यातून उद्योग व्यवसाय करुन त्या स्वावलंबी बनतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज व्यक्त केला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या किनगाव इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

September 17, 2025 8:58 PM September 17, 2025 8:58 PM

views 22

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची काँग्रेसची मागणी

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत करावी, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही त्यात अतिवृष्टीमुळे शेतातलं पीक देखील हातातून गेलं आहे. त्यामुळे बळीराजा...

September 17, 2025 8:03 PM September 17, 2025 8:03 PM

views 16

प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आत्मनिर्भर, बलशाली भारताची निर्मिती – मंत्री पियुष गोयल

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली आत्मनिर्भर, बलशाली भारताची निर्मिती झाली आहे. २०४७ पर्यंत विकसित भारत घडवण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासारख्या निर्णायक नेतृत्वाची देशाला गरज असल्याचं केंद्रीय मंत्री पियुष गोयल म्हणाले. भाजपच्या मुंबईतल्या प्रदेश कार्यालयात झालेल्य...

September 17, 2025 8:01 PM September 17, 2025 8:01 PM

views 55

प्रधानमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमाचं आयोजन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त आज राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. पर्यटन विभागामार्फत राज्यातला साडे सात हजार तरुणांना प्रशिक्षण देण्याचा ‘नमो पर्यटन कौशल्य कार्यक्रम’ आणि पर्यटकांना सुविधा देणारे ‘नमो पर्यटन माहिती व सुविधा केंद्र’ पाच ठिकाणी उभारण्यात असल्य...

September 17, 2025 8:58 PM September 17, 2025 8:58 PM

views 18

गडचिरोलीत २ नक्षली महिला ठार

गडचिरोली जिल्ह्यातल्या एटापल्ली तालुक्यात मोडस्के जंगलात आज दुपारी झालेल्या चकमकीत पोलिसांनी दोन नक्षली महिलांना ठार केलं. पोलिसांनी घटनास्थळावरुन स्वयंचलित रायफलीसह मोठ्या प्रमाणावर दारुगोळा आणि अन्य साहित्य ताब्यात घेतलं आहे. मृतदेहांची ओळख पटवण्याचं काम सुरु असल्याची माहिती जिल्हा  पोलीस अधीक्षका...

September 17, 2025 4:34 PM September 17, 2025 4:34 PM

views 22

Seva Pakhwada : उत्तर मुंबई मतदारसंघात विविध उपक्रमांचं आयोजन

सेवा पंधरवड्यामध्ये केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात विविध उपक्रमांचं आयोजन केलं आहे. त्यांची सुरुवातही आजपासून झाली. आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधांचा विकास यासारख्या विषयांवरचे ते उपक्रम आहेत. देशव्यापी स्वच्छता ही सेवा अभियानालाही आजपासून सुरुवात झाली आहे.