प्रादेशिक बातम्या

November 16, 2025 7:12 PM

views 43

मुंबईच्या नौदल गोदीवर दहशतवादी हल्ला होणार असल्याचा फोन केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांकडुन दोघांना अटक

मुंबईच्या नौदल गोदीवर दहशतवादी हल्ला होणार असल्याचा फोन केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. गोदीचेच कर्मचारी असणाऱ्या या दोघांपैकी एकानं दारूच्या नशेत मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन केला आणि नौदल गोदीवर हल्ला होणार असल्याची माहिती आपल्याला दुसऱ्या कुणा व्यक्तीकडून मिळाल्याचा ...

November 16, 2025 7:08 PM

views 54

आदिवासी विकास महामंडळाच्या निवडणूकीत मंत्री झिरवाळ यांच्या पॅनलचा विजय

महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळाच्या निवडणुकीत मंत्री नरहरी झिरवाळ आणि माजी आमदार जे पी गावित यांच्या नेतृत्वाखालच्या पॅनलचा विजय झाला. महामंडळाच्या सतरा जागांसाठी १४ नोव्हेंबरला मतदान झालं होतं, आज या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. त्यात झिरवाळ आणि गावित यांच्या पँनलचे सर्व उमेदवार विजयी झाले....

November 16, 2025 7:02 PM

views 16

नाशिकमध्ये पारा आणखी घसरला असून निफाडमध्ये ८ अंश सेल्सिअस इतकं नीचांकी तापमानाची नोंद

नाशिकमध्ये पारा आणखी घसरला असून निफाडमध्ये ८ अंश सेल्सिअस इतकं नीचांकी तापमान नोंदवलं गेलं. नाशिक शहरात आज १० पूर्णांक १ दशांश अंश सेल्सीअस इतकं तापमान नोंदवलं गेलं. काल १० पूर्णांक ३ अंश सेल्सीअस किमान तापमानाची नोंद झाली होती. विशेष म्हणजे कमाल तापमान देखील कमी झालं आहे. त्यामुळे गारठा वाढला आहे. ...

November 16, 2025 6:44 PM

views 25

विषमुक्त अन्ननिर्मितीसाठी नैसर्गिक शेतीला पर्याय नाही – राज्यपाल आचार्य देवव्रत

रसायनांच्या अतिवापरामुळे शेतजमीन ओसाड झाली असून विषमुक्त अन्ननिर्मितीसाठी नैसर्गिक शेतीला पर्याय नाही, असं राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत राजभवनात संकल्प फाउंडेशनतर्फे ‘नैसर्गिक कृषी - अनुपम भारतीय वारसा’ या विषयावर आयोजित चर्चासत्रात बोलत होते. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नैसर्गि...

November 16, 2025 5:25 PM

views 301

नंदुरबार जिल्ह्यामधल्या नंदुरबार, नवापूर, शहादा आणि तळोदा या नगरपरिषदांच्या नगराध्यक्षपदासाठी १४ उमेदवारी अर्ज दाखल

नंदुरबार जिल्ह्यामधल्या नंदुरबार, नवापूर, शहादा आणि तळोदा या नगरपरिषदांच्या नगराध्यक्षपदासाठी १४ उमेदवारी अर्ज दाखल झाले असून नगरसेवक पदासाठी १४६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. नंदुरबार ४१, शहादा २९, तळोदा २१ आणि नवापूर नगरपरिषदेच्या २३ जागांसाठी निवडणूक होणार आहे. राज्यातल्या नगरपरिषद आणि नगरपंचायती...

November 16, 2025 6:05 PM

views 69

महाराष्ट्रात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महायुतीच्या जागावाटपांच चित्र येत्या दोन दिवसांत स्पष्ट होईल-मुख्यमंत्री

राज्यातल्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महायुतीच्या जागावाटपाचं चित्र येत्या दोन दिवसांत स्पष्ट होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.छत्रपती संभाजीनगर इथं ते वार्ताहरांशी बोलत होते. या निवडणुकांच्या जागावाटपाचे निर्णय जिल्हास्तरावर होतात, त्यामुळे क...

November 16, 2025 3:42 PM

views 152

राज्यातल्या शाळा आणि महाविद्यालयांना शालेय सहलीसाठी एसटीच्या नवीन बस मिळणार

राज्यातल्या शाळा आणि महाविद्यालयांना शालेय सहलीसाठी राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटीच्या नवीन बस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. राज्याचे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. शिक्षण संस्था आणि विद्यार्थ्यांना स्वस्त आणि सुरक्षित प्रवासाचा आनंद घेता यावा हा याम...

November 16, 2025 3:00 PM

views 30

मराठवाडा, विदर्भ, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडच्या काही भागात उद्यापर्यंत थंडीची लाट राहील -हवामान विभाग

मराठवाडा, विदर्भ, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडच्या काही भागात उद्यापर्यंत थंडीची लाट राहील, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. पूर्व राजस्थान, झारखंड आणि उत्तरप्रदेशमध्ये तुरळक ठिकाणी आज थंडीची लाट राहील, तर तामिळनाडू आणि करैकलमध्ये आज जोरदार ते अती जोरदार पावसाची शक्यता आहे. दरम्यान, राजधानी दिल्ली परिसरात ...

November 15, 2025 8:03 PM

views 43

सर्जनशीलता आणि तंत्रज्ञानाचा संयोग ही येत्या इफ्फी २०२५ ची संकल्पना आहे – मुख्यमंत्री प्रमोद सावंत

सर्जनशीलता आणि तंत्रज्ञानाचा संयोग ही येत्या इफ्फी २०२५ ची संकल्पना असल्याचं गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितलं. ते आज पणजी इथं आगामी ५६ व्या इफ्फीच्या पार्श्वभूमीवर आयोजित वार्ताहर परिषदेत बोलत होते. येत्या २० ते २८ नोव्हेंबर दरम्यान पणजीत इफ्फी महोत्सव रंगणार आहे. या सोहळ्याला ८० देश...

November 15, 2025 7:20 PM

views 29

नवे शैक्षणिक धोरण आधुनिक काळातल्या स्पर्धेत विद्यार्थ्यांना पुढे नेणारं आहे – मंत्री चंद्रकांत पाटील

नवे शैक्षणिक धोरण व्यावहारिक असून, यात संशोधनावरही भर देण्यात आला आहे आणि हे धोरण आधुनिक काळातल्या स्पर्धेत विद्यार्थ्यांना पुढे नेणारं आहे असं उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज सांगितलं. मुंबईत उर्मीज आर्ट फोरमतर्फे आयोजित 'नेक्स्ट इन डिझाईन फ्युचर' प्रदर्शनाचं उदघाटन त्यांच्या ...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.