प्रादेशिक बातम्या

October 7, 2024 7:42 PM

views 23

विष्णुदास भावे पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांना जाहीर

यंदाचा विष्णुदास भावे पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांना जाहीर झाला आहे. सांगलीच्या अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीच्या वतीनं दिल्या जाणाऱ्या या पुरस्काराचं स्वरूप- गौरव पदक, पंचवीस हजार रुपये, आणि स्मृतीचिन्ह असं आहे. रंगभूमी दिनाचं औचित्य साधून येत्या ५ तारखेला १०० व्या अखिल भारती...

October 7, 2024 3:46 PM

views 22

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपुरसाठी विशेष रेल्वे गाड्याचं नियोजन

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मध्य रेल्वेनं नागपूरसाठी विशेष रेल्वे गाडी सोडण्याचं नियोजन केलं आहे. पुणे-नागपूर विशेष रेल्वे गाडी पुण्याहून ११ ऑक्टोबरला दुपारी ४ वाजता सुटेल आणि दुसऱ्यादिवशी सकाळी पावणे सात वाजता नागपूरला पोहचेल. ही गाडी नागपूरहून १२ ऑक्टोबरला रात्री ११ वाजता सुटेल आणि पुण्याला दुसऱ...

October 7, 2024 3:38 PM

views 34

मुंबईतल्या माहीम इथं रहिवासी इमारतीमध्ये भीषण आग

मुंबईत माहीम इथं मोहित हाइट्स या रहिवासी इमारतीच्या चौथ्या मजल्यावर काल भीषण आग लागली. या आगीमुळे इमारतीतील काही रहिवासी अडकले होते, मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांना सुरक्षित बाहेर काढलं. आगीत घरातलं सामानसुमान जळून खाक झालं. आगीचं कारण समजू शकलं नाही.

October 7, 2024 3:33 PM

views 13

यंदाचा केशवसृष्टी पुरस्कार ‘टीच’ संस्थेचे संस्थापक अमन शर्मा यांना जाहीर

यंदाचा केशवसृष्टी पुरस्कार मुंबईतल्या 'टीच' संस्थेचे संस्थापक अमन शर्मा यांना जाहीर झाला आहे. १ लाख रुपये, मानचिन्ह आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे आहे. मूकबधीर मुलांचं उच्च शिक्षण, विविध क्षेत्रातलं कौशल्य शिक्षण आणि त्यांना उत्पन्नाच्या संधीं मिळवून देण्यासाठी 'टीच' संस्था काम करते. येत्...

October 7, 2024 3:30 PM

views 23

धुळे जिल्ह्यातल्या मनमाड-इंदूर रेल्वे मार्गाच्या पहिल्या टप्प्याचं काम सुरू

धुळे जिल्ह्यातल्या बोरविहीर ते नरडाणा या मनमाड-इंदूर रेल्वे मार्गाच्या पहिल्या टप्प्याचं काम सुरू झालं आहे. तसंच नव्या धुळे रेल्वेस्थानकाच्या कामालाही सुरुवात झाली आहे, अशी माहिती माजी केंद्रीय मंत्री सुभाष भामरे यांनी दिली. धुळे ते नरडाणा दरम्यान सहा रेल्वेस्थानकं असतील. यात बोरविहीर, न्यू धुळे, नि...

October 7, 2024 3:57 PM

views 11

नायगाव इथल्या बीडीडी चाळीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव

मुंबईतल्या नायगाव इथल्या बीडीडी चाळीचं नामांतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बीडीडी संकुल असं करण्यात आलं आहे. या चाळीत डॉक्टर आंबेडकर राहत असत, तसंच इथं आंबेडकरांचे अनुयायी मोठ्या प्रमाणावर राहतात, त्यामुळे चाळीला त्यांचं नाव द्यावं अशी मागणी स्थानिक नागरिक अनेक दिवसांपासून करत होते. ही मागणी मान्य करत ...

October 7, 2024 3:14 PM

views 25

बच्चु कडूंना धक्का, प्रहारचे आमदार राजकुमार पटेल शिवसेनेच्या वाटेवर

आमदार बच्चु कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार राजकुमार पटेल हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. येत्या १० ऑक्टोबरला मुख्यमंत्री शिंदे मेळघाट दौऱ्यावर येणार असून त्यांच्या उपस्थितीत आपण शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती पटेल यांनी आज दिली. बच्चु कडू यांनी स्थापन केलेल्या तिसऱ्या आघाडीतून आपण वि...

October 7, 2024 3:56 PM

views 21

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी हाती धरली तुतारी

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज भाजपाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. भाजपा सोडताना आपण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्याशी चर्चा करून आपली भूमिका मांडल्याचं पाटील यांनी सांगितलं. इंदापुरातल्या कार्यकर्त्यांच्या आणि जनतेच्या आग्रहामुळे हा निर्णय घेतल्य...

October 7, 2024 8:09 PM

views 25

देशाच्या विकासाच्या मार्गात नक्षली कारवाया हा मोठा अडथळा – केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन

नक्षलवादाने कोणाचंही भलं झालेलं नाही. नक्षलवादी मार्ग चोखाळणाऱ्या सर्वांनी मुख्य प्रवाहात येऊन शस्त्रांचा त्याग करावा असं आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं आहे. देशातल्या नक्षलप्रभावित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक आज अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत झाली, त्यानंतर ते बोलत ह...

October 7, 2024 1:31 PM

views 20

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची द्वैमासिक आढावा बैठक आज मुंबईत

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची द्वैमासिक आढावा बैठक आज मुंबईत सुरू झाली.अन्नधान्याची दरवाढ नियंत्रणात ठेवून आर्थिक विकासाला चालना देणं हा पतधोरण समितीसाठी चर्चेचा प्रमुख मुद्दा असेल, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. परवा येत्या बुधवारी रिझर्व्ह बँकेच्या चलन आणि पतविषयक धोरणाचा द्वैमासिक आ...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.