प्रादेशिक बातम्या

September 27, 2024 10:52 AM September 27, 2024 10:52 AM

views 8

गडचिरोली जिल्ह्यातल्या उदयनगर बांग्ला प्राथमिक शाळेच्या परसबागेला राज्यात प्रथम क्रमांक

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत 2023-24 या शैक्षणिक वर्षात राज्यातील सर्व शाळांमधून परसबाग उपक्रमास प्रोत्साहन देण्यासाठी घेण्यात आलेल्या परसबाग स्पर्धेत गडचिरोली जिल्ह्याच्या मुलचेरा तालुक्यातील उदयनगर बांग्ला जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या परसबागेला राज्यात प्रथम क्रमांक मिळाला आहे. ये...

September 26, 2024 8:17 PM September 26, 2024 8:17 PM

views 8

राष्ट्रीय पोषण महिना उपक्रम राबविण्यात महाराष्ट्र आघाडीवर

केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या सातव्या राष्ट्रीय पोषण महिना उपक्रमा अंतर्गंत आतापर्यंत ९ कोटी ६८ लाखांहून अधिक कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. यावर्षी राबवण्यात येत असलेल्या या अभियानात महाराष्ट्र, बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात आणि आंध्र प्रदेश राज्यांनी चांगली कामगिरी केली असल्...

September 26, 2024 7:33 PM September 26, 2024 7:33 PM

views 7

अकोल्याच्या कापूस शेतीचं प्रारूप संपूर्ण विदर्भात राबवण्याचा मानस – मंत्री गिरीराज सिंह

अकोल्याच्या कापूस शेतीचं प्रारूप संपूर्ण विदर्भात राबवण्याचा मानस केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांनी व्यक्त केला आहे. सध्या अकोल्यात साडेतीन हजार हेक्टरवर मोठ्या प्रमाणावर रोपण करून प्रति हेक्टर पंधराशे ते अठराशे किलो कापसाचं उत्पादन घेतलं जात आहे. पुढच्या वर्षी हे उत्पादन अकोल्यात 50 ह...

September 26, 2024 7:10 PM September 26, 2024 7:10 PM

views 15

नांदेडमध्ये ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ अंतर्गत अवैध धंद्यांवर कारवाई

नांदेडमध्ये ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत जिल्ह्यातल्या अवैध धंद्यांवर कारवाई करण्यात आली. यात ५ कोटी २६ लाख रुपयांहून अधिक रकमेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ८ ऑगस्टपासून ऑपरेशन फ्लश आऊट सुरू झालं आहे. जुगार, मटका, गुटखा विक्री, वाळू तस्करी, अंमली पदार्थांची विक्री, रेशनचा काळा बाजार रोखण्यासाठी पोलि...

September 26, 2024 7:02 PM September 26, 2024 7:02 PM

views 11

रत्नागिरी शहर स्मार्ट सिटी म्हणून विकसीत करण्यासाठी ४०० कोटी रुपये मंजूर

रत्नागिरी शहर स्मार्ट सिटी म्हणून विकसीत करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळानं ४०० कोटी रुपये मंजूर केल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी आज दिली. रत्नागिरीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जिल्ह्यातल्या वाटद, राजापूर, मंडणगड इथं एमआयडीसीसह आणखीही  काही प्रकल्प उभारले जाणार आह...

September 26, 2024 7:00 PM September 26, 2024 7:00 PM

views 9

राजकोट इथं शिवछत्रपतींच्या पुतळ्यासह शिवसृष्टी उभारणार – मंत्री दीपक केसरकर

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण-राजकोट इथं शिवछत्रपतींच्या पुतळ्यासह शिवसृष्टी उभारणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज दिली. ओरोस इथं ते पत्रकार परिषदेत बोलत होते.    राजकोट इथं शिव छत्रपतींचा पूर्णाकृती ब्रॉन्झचा पुतळा उभारणार येणार असल्याचं केसरकर यांनी सांगितलं. पुतळ्याच्...

September 26, 2024 6:55 PM September 26, 2024 6:55 PM

views 2

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा ‘महाविजय संवाद’ दौरा

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं ‘महाविजय संवाद’ या राज्यव्यापी दौऱ्याची घोषणा आज केली. शिवसेनेच्या युवा सेना, महिला आघाडी आणि शिवसेना सोशल मीडिया या तीन विभागांकडून उद्यापासून राज्यभरात हे अभियान राबवलं जाणार आहे. यात प्रत्येक विधानसभा मतदार संघाचा आढावा घेऊन पक्ष संघटना मजबूत केली जाई...

September 26, 2024 6:49 PM September 26, 2024 6:49 PM

views 13

MPSCकडून राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२३ ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध

महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२३ ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. वैद्यकीय अहवाल विचारात घेऊन उमेदवारांना पदांचे पसंतीक्रम ऑनलाईन सादर करण्याची सुविधा लवकरच उपलब्ध करुन दिली जाईल, असं आयोगानं कळवलं आहे.  ही यादी विविध न्यायालयांमधे दाखल असलेल...

September 26, 2024 7:27 PM September 26, 2024 7:27 PM

views 21

राज्यातल्या अनेक धरणांच्या पातपातळीत वाढ

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा ९९ टक्क्यावर पोहोचला असून धरणाच्या १८ दरवाजांमधून सध्या ३७ हजार ७२८ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. हिंगोली जिल्ह्यातल्या इसापूर तर बीड जिल्ह्यातल्या मांजरा धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरु आहे. लातूर जिल्ह्यातल...

September 26, 2024 3:47 PM September 26, 2024 3:47 PM

views 8

पालघर आणि नाशिकमध्ये उद्या सकाळीपर्यंत ‘रेड अलर्ट’

हवामान विभागानं उद्या सकाळी साडे ८ वाजेपर्यंत पालघर आणि नाशिकमध्ये रेड अलर्ट दिला आहे. या दोन्ही जिल्ह्यात वीजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र आणि ठाणे, रायगड तसंच पुण्यात ऑरेंज अलर्ट आहे. राज्याच्या इतर भागातही आज जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.