प्रादेशिक बातम्या

October 30, 2025 5:22 PM October 30, 2025 5:22 PM

views 192

‘वंदे मातरम्’ म्हणा, अन् व्हिडिओ पाठवा

देशाच्या 'वंदे मातरम्' या राष्ट्रीय गीताच्या १५०व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यातल्या सर्व शाळांमध्ये वंदे मातरम् म्हणण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. त्यानुसार, वंदेमातरम् गीताची महती, माहिती, अर्थ, इतिहास सांगतानाचा २५ ते ३० सेकंदाचा व्हिडिओ तसंच २-३ छायाचित्रं आपल्या शाळा, महाविद्यालय तसंच ...

October 30, 2025 3:52 PM October 30, 2025 3:52 PM

views 29

CSMI विमानतळावर १३ कोटींहून जास्त किमतीचे अमली पदार्थ जप्त

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क विभागाने या आठवड्यात १३ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे अमली पदार्थ आणि आणि इतर वस्तू जप्त केल्या.  वेगवेगळ्या वेळी केलेल्या कारवाईत अधिकाऱ्यांनी बँकॉक हून आलेल्या प्रवाशांकडून १२ किलो ४१८ ग्रॅम वजनाचे  अमली पदार्थ जप्त केले. त्याचं...

October 30, 2025 3:39 PM October 30, 2025 3:39 PM

views 322

मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग आरक्षणाच्या सोडतची तारीख जाहीर

मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांची तयारी वेगात सुरू झाली असून राज्य निवडणूक आयोगानं आरक्षण निश्चिती आणि सोडत कार्यक्रमाचं सविस्तर वेळापत्रक जाहीर केलं. त्यानुसार, निवडणुकीसाठी ११ नोव्हेंबर रोजी आरक्षण सोडत काढली जाईल. १४ नोव्हेंबर रोजी आरक्षणाचं प्रारूप जाहीर झाल्यावर नागरिकांना आपल्या हर...

October 29, 2025 9:13 PM October 29, 2025 9:13 PM

views 42

नौवहन क्षेत्रामुळे देशाच्या विकासाला चालना मिळत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

नौवहन क्षेत्रामुळे देशाच्या विकासाला चालना मिळत असून भारताच्या नौवहन सामर्थ्यावर जगाचा विश्वास आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र  मोदी यांनी केलं. मुंबईत सागरी क्षेत्रात काम करणाऱ्या जगभरातल्या प्रतिनिधींच्या परिषदेला ते आज संबोधित करत होते. मागच्या  दशकभरात नौवहन क्षेत्रात आमूलाग्र परिवर्तन झ...

October 29, 2025 9:10 PM October 29, 2025 9:10 PM

views 113

महाराष्ट्रात, आगामी निवडणुकीत व्हीव्हीपॅट वापरले जाणार नसल्याचं राज्य निवडणूक आयोगाकडून स्पष्ट

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर करण्याबाबत कोणतीही तरतूद नाही, त्यामुळे महाराष्ट्रात, आगामी निवडणुकीत व्हीव्हीपॅट वापरले जाणार नाहीत असं राज्य निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. काही अपवाद वगळता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार घेतल्या जातात...

October 29, 2025 3:37 PM October 29, 2025 3:37 PM

views 42

दिवाळीत राज्य परिवहन महामंडळाला ३०१ कोटी रुपयांचं उत्पन्न

राज्य परिवहन महामंडळाला यंदाच्या दिवाळीत ३०१ कोटी रुपयांचं उत्पन्न मिळालं आहे. गेल्या वर्षीच्या दिवाळी हंगामातल्या उत्पन्नापेक्षा ते ३७ कोटी रुपयांनी जास्त आहे. दिवाळीच्या शेवटच्या दिवशी म्हणजे २७ ऑक्टोबरला ३९ कोटी ७५ लाख रुपये उत्पन्न मिळालं असून यंदाचं आतापर्यंतचं हे सर्वाधिक उत्पन्न आहे. सर्वाधिक...

October 29, 2025 3:23 PM October 29, 2025 3:23 PM

views 61

शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत सरकार सकारात्मक, मुख्यमंत्र्यांची भूमिका

शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत सरकार पहिल्या दिवसापासून सकारात्मक आहे, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी आज मांडली. शेतकरी नेते बच्चू कडू यांनी इतके विविध प्रश्न मांडलेले आहेत, की फक्त आंदोलनाच्या माध्यमातून ते सोडवता येणार नाहीत, त्यावर चर्चा करून रोडमॅप तयार करावा लागेल, त्यामुळे त्यांना चर्चेचं निमंत्रण दिल...

October 29, 2025 3:36 PM October 29, 2025 3:36 PM

views 32

नीती आयोगाच्या औद्योगिक उत्पादन क्षेत्रातल्या रोडमॅपचं प्रकाशन

औद्योगिक उत्पादन क्षेत्रात महाराष्ट्राला मोठी संधी असून देश याबाबतीत जगाचं नेतृत्व करेल, तेव्हा महाराष्ट्र देशात आघाडीवर असेल, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज केलं. औद्योगिक उत्पादन क्षेत्रात भारताला जगात आघाडीवर नेण्याच्या दृष्टीनं नीती आयोगानं तयार केलेल्या रोडमॅपचं प्रकाशन आज प...

October 28, 2025 8:24 PM October 28, 2025 8:24 PM

views 57

ज्येष्ठ लेखक बाबू बिरादार यांचं निधन

ज्येष्ठ लेखक बाबू बिरादार यांचं आज नांदेड जिल्ह्यात देगलूर इथं निधन झालं. ते ७५ वर्षांचे होते. मराठी, उर्दू, कानडी, तेलगू, हिंदी या भाषा बोलणाऱ्या प्रदेशात राहून त्यांनी मराठीत लिखाण करून नावलौकिक मिळविला होता. बिरादार यांच्या मातीखालचे पाय, कावड, गोसावी, अग्निकाष्ठ, अंत:पुरूष, संभूती या कादंबऱ्या प...

October 28, 2025 8:09 PM October 28, 2025 8:09 PM

views 20

मुंबई वातावरण सप्ताह जागतिक परिषदेचं आयोजन

पर्यावरण संवर्धनात भारताचं योगदान अधोरेखित करण्यासाठी मुंबई वातावरण सप्ताह जागतिक परिषद आयोजित केली जाणार असल्याचं  मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी यावेळी परिषदेच्या बोधचिन्हाचं प्रकाशनही केलं.  १७ ते १९ फेब्रुवारी २०२६ दरम्यान मुंबईत होणाऱ्या ...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.