प्रादेशिक बातम्या

January 16, 2025 3:50 PM

views 29

भंडारा जिल्ह्यातील तीन आयुर्वेदिक दवाखान्यांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार

भंडारा जिल्हा ग्रामीण आरोग्य सेवेच्या येरली, वडद आणि लाखोरी या तीन आयुर्वेदिक दवाखान्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. नॅशनल ॲक्रिडेशन बोर्ड ऑफ हॉस्पिटल्स अँड हेल्थकेअर प्रोव्हायडर्सने या पुरस्कारांसाठी प्रमाणपत्र जाहीर केलं आहे. भारतातल्या सार्वजनिक रुग्णालयांमध्ये, आरोग्य सुविधा आणि संसर्ग नियं...

January 16, 2025 3:45 PM

views 30

राज्यात नाविन्यता शहराची स्थापना करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

राज्यात नाविन्यता शहराची स्थापना करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स इथल्या जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागांतर्गत राज्य नाविन्यता सोसायटीच्यावतीने एम्पॉवरींग इनोव्हेशन, एलिव्हेटिंग महाराष्ट्र या संकल्पनेवर आधारित ‘...

January 16, 2025 7:54 PM

views 4

धरणांमधल्या पाण्याचा सिंचनासाठी पूर्ण क्षमतेनं वापर करण्याचे जलसंपदा मंत्र्यांचे निर्देश

धरणातल्या पाण्याचा सिंचनासाठी पूर्ण क्षमतेने वापर करावा अशा सूचना जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिल्या आहेत. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाच्या बैठकीत मंत्रालयात ते बोलत होते. सिंचन क्षेत्र वाढून शेतकऱ्यांना सिंचनाच्या पाण्यासाठी अडथळा येऊ नये असे नियोजन जलसंपदा विभागाने करणे आव...

January 16, 2025 3:37 PM

views 8

गोदावरी स्वच्छ राहण्यासाठी नागरिकांनी मोठा लढा उभारावा – राजेंद्र सिंह

जलप्रदूषण आणि काँक्रिटीकरणामुळे नाशिकमध्ये गोदावरी नदीचं आरोग्य बिघडलं असून, गोदावरी स्वच्छ राहण्यासाठी नागरिकांनी मोठा लढा उभारावा, असं आवाहन, जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांनी केलं आहे. नाशिक मध्ये २०२७ मध्ये होणाऱ्या आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित, गोदावरी आणि तिच्या उपनद्यांचे भवितव्य गोदा...

January 16, 2025 3:34 PM

views 28

चारचाकी गाडी विहिरीत पडून झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू

अहिल्यानगर जिल्ह्यात जामखेड नगरपरिषदेच्या जांबवाडी इथं चारचाकी गाडी विहिरीत पडून काल झालेल्या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला. हे चौघेजण मातकुळीहून जांबवाडीमार्गे जामखेडकडे येत असताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यानं रस्त्यालगत असलेल्या विहिरीत पडली. ग्रामस्थांनी विहिरीत पडलेल्या तरुणांना बाहेर काढ...

January 16, 2025 3:32 PM

views 11

लातूर जिल्ह्यातील माऊली सोट मृत्यूप्रकरणी एसआयटी स्थापन करण्याची ओबीसी नेत्यांची मागणी

लातूर जिल्ह्यातील माऊली सोट मृत्यूप्रकरणी एसआयटी स्थापन करण्याची मागणी ओबीसी नेते वाघमारे आणि सोनकटे यांनी केली आहे. लातूर जिल्ह्यातल्या टाकळी इथल्या अठरा वर्षीय तरुण माऊली सोट या तरुणाला प्रेमप्रकरणातून जमावाकडून मारहाण झाली होती. घटनेच्या दोन महिन्यानंतर माऊली सोट या तरुणाचा उपचार सुरू असताना मृत्...

January 16, 2025 3:30 PM

views 15

मुंबई – अमरावती, पुणे – अमरावती वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याचा रेल्वे प्रशासनाचा निर्णय

मुंबई - अमरावती, पुणे - अमरावती वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतला आहे. आतापर्यंत राज्यात पुणे आणि मुंबई इथून वंदे भारत रेल्वे धावत होत्या. मुंबईहून धावणाऱ्या वंदे भारत गाड्या सोलापूर, शिर्डी, गोवा, कोल्हापूर शहरांमध्ये जातात.

January 16, 2025 3:28 PM

views 39

धुळे जिल्ह्यातल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमधल्या हमाल मापाडी कामगारांनी आजपासून सुरू केला बेमुदत संप

धुळे जिल्ह्यातल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमधल्या हमाल मापाडी कामगारांनी आजपासून बेमुदत संप सुरू केला आहे. मजुरीत वाढ करावी अशी मागणी कामगारांनी केली आहे. जोपर्यंत मजुरी वाढ होत नाही तोपर्यंत संप मागे घेणार नाही असा इशारा कामगारांनी दिला आहे.  

January 16, 2025 9:50 AM

views 12

दूध भेसळ तपासणीत दोषी आढळल्यास कडक कारवाई होणार- नरहरी झिरवाळ

राज्यात काल अन्न आणि औषध प्रशासन विभागाने एकाच दिवशी दूध भेसळ तपासणी मोहीम राबवली. यावेळी विविध ठिकाणाहून दुधाचे १ हजार ६२ दुधाचे नमुने विश्लेषणासाठी ताब्यात घेण्यात आले. यामध्ये विविध ब्रान्डच्या दुधाचे ६८० पाउच तसंच पिशवी पॅकिंग आणि ३८२ सुट्या स्वरूपातील दुधाचा समावेश आहे. या तपासणी नमुन्यात दोषी ...

January 16, 2025 9:31 AM

views 19

महाराष्ट्र राज्य सीईटी परीक्षेसाठीच्या ‘अटल’ या ऑनलाइन नोंदणी प्रणालीचं उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

महाराष्ट्र राज्य सीईटी परीक्षेसाठीच्या 'अटल' या ऑनलाइन नोंदणी प्रणालीचं उद्घाटन उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते काल झालं. राज्य सामायिक प्रवेश कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या विविध व्यवसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी परीक्षांचा सराव करता यावा म्हणून हा उपक्रम सुरू करण्यात आल...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.