प्रादेशिक बातम्या

January 15, 2025 3:42 PM

views 8

आंतरविद्यापीठ नेमबाजी स्पर्धेमध्ये मुंबई विद्यापीठाला सुवर्णपदक

चंदीगडच्या पंजाब विद्यापीठात ९ ते १८ जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ नेमबाजी स्पर्धेमध्ये मुंबई विद्यापीठानं सुवर्णपदक पटकावलं आहे. ५० मीटर थ्री पोझिशन रायफल नेमबाजीत पुरुष गटात रुद्रांक्ष पाटील याने आपल्या उत्कृष्ट नेमबाजीच्या जोरावर ६०० पैकी ५९३ गुण मिळवत सुवर्णपद...

January 15, 2025 3:59 PM

views 19

परळीत व्यापाऱ्यांनी वाल्मीक कराडच्या समर्थनार्थ आजपासून पुकारला बेमुदत संप

संतोष देशमुख हत्या प्रकरणांमध्ये कटकारस्थान रचण्याच्या आरोपाखाली वाल्मीक कराड याच्यावर संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा अर्थात मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर बीड जिल्ह्यातल्या परळी शहरात तणावपूर्ण शांतता असल्याचं वृत्त आहे. परळी शहरात पोलिसांनी ठिकठिकाणी बंदोबस्त तैनात केला असून बाजारप...

January 15, 2025 4:08 PM

views 30

मुंबई नाशिक महामार्गावर शहापूर जवळ झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू

मुंबई नाशिक महामार्गावर वर शहापूर जवळ पाच वाहनांचा विचित्र अपघात होऊन त्यात तिघांचा मृत्यू झाला, तर १४ जण जखमी झाले. कंटेनर, ट्रक आणि खाजगी बस मिळून पाच वाहनांचा अपघातात समावेश आहे. आज पहाटे 3 च्या सुमारास हा अपघात झाला. पोलिस आणि ग्रामस्थांनी जखमींना शहापूरच्या रुग्णालयात दाखल केलं आहे.

January 15, 2025 2:38 PM

views 67

मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी न्यायमूर्ती आलोक आराधे

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दोन उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायमूर्तींच्या बदल्या केल्या आहेत. तेलंगण उच्चन्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती आलोक आराधे आता मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश असतील. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांना दिल्ली उच्च न्याया...

January 15, 2025 11:13 AM

views 23

संगीत रंगभूमीचे अभ्यासक, गायक, संगीतकार अरविंद पिळगांवकर यांचं निधन

संगीत रंगभूमीचे अभ्यासक, गायक, संगीतकार अरविंद पिळगांवकर यांचं नुकतंच मुंबईत अल्पशा आजाराने निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. त्यांनी अनेक नाटकांमधून विविध भूमिका साकारल्या. तसंच आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या कार्यक्रमांसाठी देखील काम केलं.

January 15, 2025 11:10 AM

views 29

नॉयलॉन मांजामुळे गळा कापला गेल्याने युवकाचा मृत्यू

नाशिकमध्ये संक्रांतीच्या निमित्ताने पतंगोत्सव साजरा केला जात असतानाच नॉयलॉन मांजामुळे गळा कापला गेल्याने एका युवकाचा बळी गेला आहे. दरम्यान घातक मांजाच्या वापरावर बंदी घालण्यात आली असून पोलीस आणि प्रशासनानं राज्यात अनेक ठिकाणी कारवाई करुन नायलॉन मांजाचे साठे जप्त केले आहेत.  

January 15, 2025 10:58 AM

views 25

छत्रपती संभाजीनगर इथल्या पाणचक्की तसेच दरवाजांचं चित्र असलेल्या टपाल तिकीटांचं भागवत कराड यांच्या हस्ते प्रकाशन

छत्रपती संभाजीनगर इथल्या ऐतिहासिक पाणचक्की आणि दरवाजांचे चित्र असलेल्या टपाल तिकीटांचं काल खासदार भागवत कराड यांच्या हस्ते प्रकाशन झालं. छत्रपती संभाजीनगर इथल्या एमजीएम विद्यापीठात झालेल्या या कार्यक्रमात, पारपत्राची सुविधा शहरातल्या टपाल कार्यालयाद्वारे देण्यात यावी अशी अपेक्षाही कराड यांनी व्यक्त ...

January 15, 2025 10:49 AM

views 8

कुंभ मेळ्यासाठी देवगिरी प्रांतातून सुमारे शंभर साधू रवाना

कुंभ मेळ्यासाठी देवगिरी प्रांतातून सुमारे शंभर साधू रवाना झाल्याची माहिती विश्व हिंदू परिषदेच्या देवगिरी प्रांताचे अध्यक्ष संजय बारगजे यांनी दिली. कुंभ मेळ्याबाबत दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते... सगळ्या जातीचे, सगळ्या संप्रदायाचे सर्व लोक एकत्र येऊन एका ठिकाणी स्नान करणं, याच्यासारखी जगात मोठ...

January 15, 2025 10:44 AM

views 147

शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याचे निलेश हेलोंडे यांचे निर्देश

शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याचे निर्देश वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष निलेश हेलोंडे पाटील यांनी दिले आहेत. काल जालना जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांचा आढावा घेतल्यानंतर ते बोलत होते.  

January 15, 2025 10:39 AM

views 36

नांदेड जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत १ लाख २० हजार पात्र लाभार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी पूर्ण

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यात एक लाख २० हजार पात्र लाभार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी पूर्ण झाली आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले यांनी ही माहिती दिली. ऑनलाइन नोंदणी झालेल्या पात्र लाभार्थ्यांना लवकरच उद्दिष्टानुसार मंजुरी देण्यात येणार असल्याचं त्यांनी ...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.