प्रादेशिक बातम्या

January 17, 2025 7:03 PM

views 16

१५ फेब्रुवारीनंतर औषध वगळता इतर कुठल्याही खरेदीला मान्यता न देण्याचे वित्त विभागाचे आदेश

चालू आर्थिक वर्षातला निधी खर्च करायचा म्हणून १५ फेब्रुवारी नंतर औषध वगळता इतर कुठल्याही खरेदीला मान्यता देऊ नये, असे आदेश राज्य सरकारच्या वित्त विभागानं सरकारी कार्यालयांना दिले आहेत. संगणक, झेरॉक्स मशीन, फर्निचर दुरुस्ती, कार्यशाळा आयोजन यासारख्या गोष्टी करण्यालाही वित्त विभागानं मनाई केली आहे. आर्...

January 17, 2025 7:35 PM

views 53

राज्य सरकारकडून AI धोरण तयार करण्यासाठी कृती दलाची स्थापना

  राज्य सरकारनं आर्टिफिशियल इंटिलिजन्स आणि सायबर सुरक्षा धोरण तयार करण्यासाठी कृती दलाची स्थापना केली आहे. राज्याचे माहिती तंत्रज्ञान संचालक या दोन्ही कृती दलाचे अध्यक्ष आहेत. याशिवाय खासगी क्षेत्रातल्या अनेक तज्ञांचा समावेश यामध्ये आहे. AI धोरण राज्याच्या औद्योगिक विकासाला चालना देईल, असं माहिती तं...

January 17, 2025 7:39 PM

views 34

पुणे-नाशिक महामार्गावरील अपघातात ९ जणांचा मृत्यू

पुणे-नाशिक महामार्गावर आज सकाळी एका टेम्पोनं मिनीव्हॅनला दिलेल्या धडकेत नऊ जणांचा मृत्यू झाला. ही घटना सकाळी दहा वाजता नारायणगावजवळ घडली. ही मिनीव्हॅन नारायणगावच्या दिशेनं जात असताना पाठीमागून टेम्पोनं धडक दिल्यानं ती रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या रिकाम्या बसवर आदळली, अशी माहिती पुणे ग्रामीण पोलि...

January 16, 2025 7:33 PM

views 26

जागतिक हवामान बदल रोखण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज – राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन

जागतिक हवामान बदल रोखण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचं राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी आज चंद्रपूर इथं सांगितलं. हवामान बदल २०२५ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांना एकत्र आणण्यासाठी एका अॅप ची निर्मिती करणार असल्याचं ...

January 16, 2025 7:24 PM

views 42

शेत रस्ता बनवण्याबाबत तहसीलदारांना निर्णय घेण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्याचे महसूल मंत्र्यांचे निर्देश

यांत्रिकीकरणामुळे सध्या शेत वहीवाटीत मोठ्या वाहनांचा वापर होतो, त्यामुळे वाहन प्रकारानुसार शेत रस्ता बनवण्याबाबत तहसीलदारांना निर्णय घेता यावा यासाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. शेत वहिवाट रस्त्याची तक्रार सुनावणी तहसीलदार यांच्याकडे होते. ...

January 16, 2025 8:02 PM

views 8

गंगापूर, कडावा कालव्यातली गळती कमी करण्याच्या जलसंपदा मंत्र्यांच्या सूचना

नाशिक जिल्ह्यातल्या गंगापूर, कडावा कालव्यातली गळती कमी करण्याच्या सूचना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या आहेत.  शेतीसाठी पाण्याचे आवर्तन देतांना जवळपास ६० टक्के पाणी गळतीचे प्रमाण दिसून येत असून गळतीचं प्रमाण ६० टक्यांवरून २० टक्यांवर आणण्यासाठी जिल्हा प्रशासनानं आणि जलसंपदा विभागानं...

January 16, 2025 6:53 PM

views 12

राज्यातल्या ६ जिल्हापरिषदा आणि ४४ पंचायती समित्यांवर ‘प्रशासक राज’

मुदत संपल्यानं राज्यातल्या सहा जिल्हा परिषदा आणि त्यांच्या अंतर्गत  येणाऱ्या एकूण ४४ पंचायती समित्यांवर प्रशासक नेमण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. या जिल्हा परिषदांमध्ये नागपूर, अकोला, वाशिम, धुळे, नंदुरबार आणि पालघर यांचा समावेश आहे. या सहा जिल्हा परिषदांच्या अंतर्गत येणाऱ्या ४४ पंचायत समित्...

January 16, 2025 7:56 PM

views 18

राज्यात नाविन्यता शहराची स्थापना करणार असल्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

राज्यात नाविन्यता शहराची स्थापना करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत केली. राष्ट्रीय स्टार्टअप दिवसानिमित्तानं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.   सिडबी-स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाकडून स्टार्ट अपसाठी २०० कोटी रुपये तर प्रत्येक प्रादेशिक  विभागाला ३० क...

January 16, 2025 7:56 PM

views 28

संजय शिरसाठ यांची सिडकोच्या अध्यक्षपदावरून उचलबांगडी

राज्य सरकारनं संजय शिरसाठ यांना सिडकोच्या अध्यक्षपदावरुन दूर केलं आहे. त्यांची मंत्रीपदावर नियुक्ती झाल्यानं त्यांच्याकडचा हा पदभार काढून घेतल्याचं सरकारनं शासन निर्णयात म्हटलं आहे.

January 16, 2025 8:25 PM

views 7

सैफ अली खानची प्रकृती स्थिर, आरोपीच्या शोधासाठी १० पथकांची स्थापना

अभिनेता सैफ अली खान याची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली आहे. मुंबईतल्या लीलावती रुग्णालयात त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली असून अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. पहाटे मुंबईतल्या घरी अज्ञात इसमानं त्याच्यावर चाकू हल्ला केला होता. त्यात त्याला ६ ठिकाणी जखमा झाल्या होत्...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.