प्रादेशिक बातम्या

January 24, 2025 7:59 PM January 24, 2025 7:59 PM

views 5

मुंबईत वर्ल्ड ट्रेड सेंटर इथं महापेक्स २०२५ महोत्सवाचं आयोजन

भारतीय टपाल विभागानं मुंबईत वर्ल्ड ट्रेड सेंटर इथं महापेक्स २०२५ या महोत्सवाचं आयोजन केलं आहे. या महोत्सवात महाराष्ट्राचा समृद्ध सांस्कृतिक वारश्याचं दर्शन हे टपाल तिकिटांच्या माध्यमातून होणार आहे.  यामध्ये भेंडी बाजार घराणं, सितार-मिराज, पुण्यातील जोगेश्वरी मिसळ, वांद्रे इथल्या माउंट मेरी चर्चची चि...

January 24, 2025 7:52 PM January 24, 2025 7:52 PM

views 1

शैक्षणिक हितासाठी एका वर्षासाठी EWS प्रमाणपत्र ग्राह्य धरण्याचा निर्णय

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी एका वर्षासाठी ई डब्ल्यू एस प्रमाणपत्र ग्राह्य धरण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. यामुळे ईडब्ल्यूएस प्रवर्गातून प्रवेश घेतलेल्या जवळपास १ हजार ६०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यां...

January 24, 2025 7:51 PM January 24, 2025 7:51 PM

views 5

भारत ऊर्जा सप्ताह २०२५ हा जागतिक स्तरावरचा दुसरा सर्वात मोठा ऊर्जा कार्यक्रम असेल – मंत्री हरदीप सिंग पुरी

भारत ऊर्जा सप्ताह २०२५ हा जागतिक स्तरावरचा दुसरा सर्वात मोठा ऊर्जा कार्यक्रम असेल, अशी माहिती केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी दिली आहे. ते आज मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. जवळपास १ लाख चौरस मीटरपेक्षा अधिक जागेत या कार्यक्रमाचं आयोजन केलं जाईल आणि त्यात विविध ...

January 24, 2025 8:57 PM January 24, 2025 8:57 PM

views 7

सहकाराच्या माध्यमातूनच शेतकरी आत्मनिर्भर होईल – मंत्री अमित शाह

सहकाराच्या माध्यमातूनच शेतकऱ्यांच्या उन्नतीचा मार्ग समृद्ध होऊन  शेतकरी आत्मनिर्भर होईल, त्यासाठी शेतीला विज्ञान आणि तंत्रज्ञानाची जोड देणं  आवश्यक आहे, असं केंद्रीय गृह  आणि  सहकारमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. ते आज नाशिक जिल्ह्यात मालेगाव तालुक्यातल्या अजंग इथं झालेल्या सहकार परिषदेत बोलत होते...

January 24, 2025 7:29 PM January 24, 2025 7:29 PM

views 9

प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी महाराष्ट्रतून विशेष पाहुण्यांना आमंत्रण

येत्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यात नवी दिल्लीत होणारं संचलन पाहण्यासाठी महाराष्ट्रातून अनेक विशेष पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. राष्ट्रासाठी महत्वाच्या उपक्रमांमध्ये जनभागीदारी वाढवण्याच्या उद्देशानं  देशभरातून एकूण १० हजार व्यक्तींना आमंत्रण देण्यात आलं आहे. यामध्ये उत्कृष्ट कार्य करणारे जलदूत...

January 24, 2025 8:04 PM January 24, 2025 8:04 PM

views 8

एसटी, रिक्षा आणि टॅक्सीच्या प्रवास भाड्यात वाढ

एसटी महामंडळानं प्रवासभाड्यात केलेली १४ पूर्णांक ९७ शतांश टक्के दरवाढ आज पासून लागू असून, एक फेब्रुवारी पासून रिक्षा आणि टॅक्सीची देखील भाडेवाढ होणार आहे. ही तीन रुपयांची असेल, असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी बातमीदारांशी बोलताना सांगितलं. जुन्या योजना आणि सवलती कायम राहणार असून, २ हजार कोटी र...

January 24, 2025 9:31 PM January 24, 2025 9:31 PM

views 3

भंडारा : आयुध निर्मिती कारखान्यात झालेल्या स्फोटात ८ जणांचा मृत्यू

भंडारा जिल्ह्यात आयुध निर्मिती कारखान्यात स्फोट होऊन ८ जणांचा मृत्यू झाला तर ५ जण जखमी झाले आहेत, अशी माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेच्या वेळी कारखान्यात असलेल्या इतर कर्मचाऱ्यांचा शोध सुरु आहे. स्फोटातल्या जखमींना भंडारा रूग्णालयात दाखल केलं आहे. घटनास्थळी पोलीस आणि आरोग्य विभागामार्फत बचावकार्य स...

January 24, 2025 8:04 PM January 24, 2025 8:04 PM

views 13

सिंधुदुर्गतल्या कुडाळ नगरपंचायतीत नगराध्यक्षपदी महायुतीच्या प्राजक्ता बांदेकर

सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ नगरपंचायतीत नगराध्यक्षपदी सिद्धिविनायक पॅनल प्रणित महायुतीच्या प्राजक्ता बांदेकर यांची निवड झाली. त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सई काळप यांचा अवघ्या एका मतानं पराभव केला. कुडाळचे आमदार निलेश राणे यांनी प्राजक्ता बांदेकरांचं अभिनंदन केलं असून पारदर्शक ...

January 24, 2025 6:42 PM January 24, 2025 6:42 PM

views 3

राजभवनात उत्तर प्रदेश तसंच दादरा, नगर हवेली, दमण आणि दीव केंद्रशासित प्रदेशाचा स्थापना दिवस साजरा

'एक भारत श्रेष्ठ भारत' कार्यक्रमांतर्गत आज मुंबईत राजभवन इथं राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत उत्तर प्रदेश तसंच दादरा, नगर हवेली, दमण आणि दीव केंद्रशासित प्रदेशाचा स्थापना दिवस साजरा करण्यात आला. मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी या राज्यांचं लोकजीवन आणि संस्कृतीचं, ताल आणि नृत्याच्या ...

January 24, 2025 8:02 PM January 24, 2025 8:02 PM

views 8

आयआयटी मुंबईचे उपसंचालक मिलिंद अत्रे यांना प्रजासत्ताक दिनाचं आमंत्रण

येत्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीत कर्तव्य पथावर पार पडणाऱ्या सोहळ्यासाठी आयआयटी मुंबईचे उपसंचालक मिलिंद अत्रे यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. ते गेली २० वर्षं आयआयटी मुंबईत विविध विभागांमध्ये काम करत असून ते सध्या मेकॅनिकल विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला उ...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.