प्रादेशिक बातम्या

January 26, 2025 7:26 PM January 26, 2025 7:26 PM

views 8

मुंबई किनारी रस्त्याच्या उत्तर वाहिनीचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्त्याच्या उत्तर वाहिनीचं लोकार्पण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या हस्ते झालं. किनारी रस्त्यामुळे मुंबईकरांचा प्रवासाचा वेळ आणि इंधन यात मोठी बचत होणार असून प्रदूषण कमी करण्यात हा मार्ग महत्त्वाची भूमिका बजावेल, असं मुख्यमंत्री यावेळी ...

January 26, 2025 6:15 PM January 26, 2025 6:15 PM

views 4

नांदेडमध्ये बर्ड फ्लूमुळे ‘या’ भागात अलर्ट झोन

नांदेड जिल्ह्यातल्या लोहा तालुक्यात किवळा इथं कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्यामुळे  तिथल्या दहा किलोमीटर परिसरात अलर्ट झोन घोषित केला आहे. किवळा इथं नुकतीच कोंबड्यांमधे मरतूक दिसून आल्यानं पशुसंवर्धन विभागानं मृत कोंबड्यांचे नमुने गोळा करून राज्यस्तरीय पुण्याच्या पशुरोग अन्वेषण प्रयोगशाळेत, तसंच ...

January 26, 2025 6:13 PM January 26, 2025 6:13 PM

views 12

राज्यात सर्वत्र प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

देशाचा ७६ वा प्रजासत्ताक दिन राज्यात इतरत्रही मोठ्या उत्साहात साजरा झाला.    नवी मुंबईत कळंबोली इथे पोलीस मुख्यालय मैदानावर प्रजासत्ताक दिनानिमित्त कोकण स्तरावरचं ध्वजारोहण संपन्न झालं. कोकण विभागीय आयुक्त डॉ. राजेश देशमुख यांनी तिरंगा फडकावला. या कार्यक्रमाला वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसह नागर...

January 26, 2025 2:41 PM January 26, 2025 2:41 PM

views 2

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला १३९ पद्म पुरस्कारांची घोषणा

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला १३९ पद्म पुरस्कारांची घोषणा केली. यंदा ७ पद्म विभूषण, १९ पद्म भूषण आणि ११३ पद्म पुरस्कारांचा समावेश आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि सुप्रसिद्ध गझल गायक पंकज उधास यांना मरणोत्तर पद्म विभूषण पुरस्काराने सन्मानित ...

January 26, 2025 2:36 PM January 26, 2025 2:36 PM

views 13

७६वा प्रजासत्ताक दिन विविध देशांमध्येही साजरा

भारताचा ७६वा प्रजासत्ताक दिन आज विविध देशांमध्येही साजरा होत आहे. बांगलादेशात राजधानी ढाका इथं भारतीय उच्चायुक्तालयात प्रजासत्ताक दिन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. बांगलादेशातले भारतीय उच्चायुक्त प्रणय वर्मा यांनी तिरंगा ध्वज फडकावला. या सोहळ्यात भारतीय समुदायाचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाल...

January 25, 2025 7:29 PM January 25, 2025 7:29 PM

views 3

जास्त मतदान झाल्याच्या काँग्रेसच्या आक्षेपाला निवडणूक आयोगाने उत्तर दिलेलं नाही- नाना पटोले

विधानसभा निवडणुकीत मतदार यादीतील मतदारांपेक्षा जास्त मतदान झाल्याच्या काँग्रेसच्या आक्षेपाला निवडणूक आयोगाने उत्तर दिलेलं नाही, याविरोधात आपण न्यायालयीन लढाई लढू, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं.   ते आज नागपूर मध्ये वार्ताहरांशी बोलत होते. निवडणूक आयोगानं विधानसभेच्या निवडणुक...

January 25, 2025 7:21 PM January 25, 2025 7:21 PM

views 3

मुख्यमंत्र्यांनी मागण्या मान्य कराव्यात यासाठी मनोज जरांगे यांची पुन्हा उपोषणाला सुरुवात

मराठा समाजाच्या बाबतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मागण्या मान्य कराव्यात असे सांगत मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी आज जालन्यात अंतरवाली सराटी इथं बेमुदत उपोषणाला सुरुवात केली. मराठा समाजाला इतर मागास वर्गीय समाजातून कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे...

January 25, 2025 7:17 PM January 25, 2025 7:17 PM

views 6

यवतमाळ जिल्ह्यातील बस अपघातात एका विद्यार्थिनीचा मृत्यू

यवतमाळ जिल्ह्यातल्या उमरखेड इथं शाळेची बस झाडावर आदळून झालेल्या अपघातात एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. यात काही विद्यार्थी जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.   बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी बसवले जातात का हे तपासा आणि दोषींवर कठोर कारवाई करा, असे निर्देश पालकमं...

January 25, 2025 7:24 PM January 25, 2025 7:24 PM

views 58

महाराष्ट्रात एसटीची भाडेवाढ आजपासून लागू

राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासभाड्यात आजपासून १४ पूर्णांक ९५ शतांश टक्के वाढ करण्यात आली आहे.   हकीम समितीने निश्चित केलेल्या सूत्रानुसार ही भाडेवाढ करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यानुसार साध्या बसचं भाडं ६ किलोमीटर प्रति टप्प्यासाठी ११ रुपये, जलद सेवा बससाठी ६ किलोमीटर प्रति टप्प...

January 25, 2025 7:06 PM January 25, 2025 7:06 PM

views 5

भंडारा जिल्ह्यातल्या आयुध निर्माण कंपनीकडून मरण पावलेल्यांच्या कुटुंबांना ५० लाख रुपयांची मदत

भंडारा जिल्ह्यातल्या आयुध निर्माण कंपनीत झालेल्या स्फोटात मरण पावलेल्यांच्या कुटुंबांना ५० लाख रुपयांची मदत देण्याचं कंपनी प्रशासनानं जाहीर केलं आहे.   तसंच कुटुंबातल्या एकाला नोकरी देण्याचं आश्वासन कंपनी प्रशासनानं दिलं आहे. दरम्यान, या प्रकरणी जे दोषी असतील त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाईल अ...