प्रादेशिक बातम्या

January 24, 2025 8:04 PM January 24, 2025 8:04 PM

views 13

सिंधुदुर्गतल्या कुडाळ नगरपंचायतीत नगराध्यक्षपदी महायुतीच्या प्राजक्ता बांदेकर

सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ नगरपंचायतीत नगराध्यक्षपदी सिद्धिविनायक पॅनल प्रणित महायुतीच्या प्राजक्ता बांदेकर यांची निवड झाली. त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सई काळप यांचा अवघ्या एका मतानं पराभव केला. कुडाळचे आमदार निलेश राणे यांनी प्राजक्ता बांदेकरांचं अभिनंदन केलं असून पारदर्शक ...

January 24, 2025 6:42 PM January 24, 2025 6:42 PM

views 3

राजभवनात उत्तर प्रदेश तसंच दादरा, नगर हवेली, दमण आणि दीव केंद्रशासित प्रदेशाचा स्थापना दिवस साजरा

'एक भारत श्रेष्ठ भारत' कार्यक्रमांतर्गत आज मुंबईत राजभवन इथं राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत उत्तर प्रदेश तसंच दादरा, नगर हवेली, दमण आणि दीव केंद्रशासित प्रदेशाचा स्थापना दिवस साजरा करण्यात आला. मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी या राज्यांचं लोकजीवन आणि संस्कृतीचं, ताल आणि नृत्याच्या ...

January 24, 2025 8:02 PM January 24, 2025 8:02 PM

views 8

आयआयटी मुंबईचे उपसंचालक मिलिंद अत्रे यांना प्रजासत्ताक दिनाचं आमंत्रण

येत्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीत कर्तव्य पथावर पार पडणाऱ्या सोहळ्यासाठी आयआयटी मुंबईचे उपसंचालक मिलिंद अत्रे यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. ते गेली २० वर्षं आयआयटी मुंबईत विविध विभागांमध्ये काम करत असून ते सध्या मेकॅनिकल विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला उ...

January 24, 2025 3:57 PM January 24, 2025 3:57 PM

views 7

ॲडव्हान्टेज विदर्भ महोत्सवात ५० हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले जाणार- नितीन गडकरी

नागपुरात आयोजित ॲडव्हान्टेज विदर्भ २०२५ या औद्योगिक महोत्सवात ५० हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले जाणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. नागपुरात आज आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.   तसंच ६७० कोटी रुपयांचा मदर डेअरी चा प्रकल्प लवकरच नागपुरात सुरु होणार असल्याचं ...

January 24, 2025 3:55 PM January 24, 2025 3:55 PM

views 2

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा आगाशे यांचा अपघाती मृत्यू

ठाणे जिल्ह्यातल्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा आगाशे यांचा काल अपघाती मृत्यू झाला. त्या ७३ वर्षाच्या होत्या. ग्राहक चळवळ, पर्यावरण संरक्षण, नेत्रदान अशा विविध क्षेत्रात त्यांनी कार्य केलं.त्यांच्या इच्छेनुसार अंतिम संस्कारापूर्वी त्यांचे नेत्रदान करण्यात आले. त्या पत्रकार आशिष आगाशे यांच्या ...

January 24, 2025 9:11 AM January 24, 2025 9:11 AM

views 8

दावोसमध्ये महाराष्ट्रासाठी 15 लाख 75 हजार कोटी रुपयांचे करार

दावोसमध्ये महाराष्ट्रासाठी विक्रमी 15 लाख 75 हजार कोटी रुपयांचे करार. दावोसमधल्या जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्रानं जगभरातील विविध दिग्गज कंपन्यासमवेत विक्रमी 15 लाख 75 हजार कोटी रुपयांचे गुंतवणूकीचे सामंजस्य करार केले आहेत; यातून राज्यात 15 लाख 98 हजार रोजगार निर्मिती होईल, असा विश्वास मुख्यमंत्र...

January 23, 2025 8:10 PM January 23, 2025 8:10 PM

views 6

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचं काम दर्जेदार करावं – मंत्री संजय शिरसाट

मुंबईत दादर इथल्या इंदू मिलमधे उभारल्या जात असलेल्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचं अनावरण एप्रिल 2026 पर्यंत करण्याचा मानस असून स्मारकाचं काम दर्जेदार करावं, अशा सूचना सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिल्या आहेत. त्यांनी आज या स्मारकाच्या कामाची पाहणी केली.   मुंबईत वरळी इथं स...

January 23, 2025 8:10 PM January 23, 2025 8:10 PM

views 9

राज्यातल्या सहा ‘जल योद्ध्यांना’ प्रजासत्ताक दिन सोहळ्याचं निमंत्रण

अटल भूजल योजनेअंतर्गत भूजल व्यवस्थापनामध्ये राज्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सहा ‘जल योद्ध्यांना’ प्रजासत्ताक दिन सोहळ्यात विशेष अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आलं आहे. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे सहसंचालक डॉ. प्रवीण कथने यांनी वृत्तसंस्थेला ही माहिती दिली. त्यात पुणे जिल्ह्यातल्या काऱ्हाटी ...

January 23, 2025 7:38 PM January 23, 2025 7:38 PM

views 18

ज्येष्ठ कवी, लेखक अनिल सोनार यांचं निधन

ज्येष्ठ कवी, लेखक अनिल सोनार यांचं आज धुळे इथं निधन झालं. ते ७९ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर शहरातल्या स्मशानभूमित अंत्यसंस्कार करण्यात आले. सोनार यांची २१ नाटकं, तीन कादंबऱ्या, सहा काव्य संग्रह, ३८ एकांकिका, एक आस्वादक समीक्षापर लेख संग्रह, एक विनोदी लेख संग्रह, पाच बालकथा संग्रह, दोन एकांकि...

January 23, 2025 8:10 PM January 23, 2025 8:10 PM

views 12

एसटीची सर्व बसस्थानकं सुंदर करण्याचा प्रयत्न – मंत्री प्रताप सरनाईक

एसटी बसस्थानकांची स्वच्छता ही कर्मचारी आणि प्रवाशांची संयुक्त जबाबदारी असून, या अभियानाच्या माध्यमातून एसटीची सर्व बसस्थानकं सुंदर करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आज म्हणाले. मुंबईत कुर्ला नेहरूनगर बसस्थानकावर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियाना...