प्रादेशिक बातम्या

February 14, 2025 8:27 PM

views 26

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ३ इराणी नागरिकांना अटक

महसूल गुप्तचर संचालनालयाने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर तीन इराणी नागरिकांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ७ किलो १४३ ग्रॅम सोनं जप्त केलं आहे. या सोन्याची किंमत जवळपास ६ कोटी २८ लाख रुपये इतकी आहे. हे तिन्ही प्रवासी दुबईहून मुंबईच्या दिशेने प्रवास करत होते.

February 14, 2025 7:32 PM

views 31

धुळ्यातल्या अनेर डॅमचा विकास होणार

धुळे जिल्ह्याच्या  शिरपूर तालुक्यातल्या अनेर डॅम या निसर्गसंपन्न स्थळाचा पर्यटन स्थळ म्हणून विकास केला जाणार असून जिल्हाधिकाऱ्यांनी त्याबाबतचा विकास आराखडा सादर करण्याच्या सुचना वन्यजीव विभागाला दिल्या आहेत. या पर्यटन स्थळात  पॅगोडा, टेहळणी टॉवर, टेन्ट हाऊस, बोंटीग, साहसी खेळ आणि ट्रेकींगसारख्या सुव...

February 14, 2025 7:21 PM

views 29

दहावी, बारावी क्रीडानिपुण विद्यार्थ्यांना ग्रेस गुणांसाठीचे अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ

इयत्ता १० वी आणि १२ वी उत्तीर्ण झालेल्या क्रीडानिपुण विद्यार्थ्यांना ग्रेस गुणांसाठीचे ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी १० मार्च, २०२५ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. हे अर्ज ‘आपले सरकार’ या पोर्टलच्या माध्यमातून  महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि  उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडे पाठवावेत.

February 14, 2025 7:37 PM

views 30

मुंबईत बेस्ट बसचा प्रवास महागणार !

मुंबईत बेस्ट बसचा प्रवास महागण्याची शक्यता आहे. बेस्टचे महाव्यवस्थापक एस. व्ही. आर. श्रीनिवासन यांनी काल अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. बेस्टचा तोटा भरून काढण्यासाठी भाडेवाढ हा एकमेव उपाय असल्याने त्यावर विचार सुरू आहे. अद्याप याबाबत निर्णय झालेला नाही, अशी माहिती श्रीनिवासन यांनी दिली आहे. 

February 14, 2025 7:35 PM

views 22

रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाची परवानगी न घेता तिकीट लावून होणाऱ्या कार्यक्रमांच्या चौकशीचे आदेश

राज्याच्या रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाची परवानगी न घेता तिकीट लावून होणाऱ्या आणि अश्लील भाष्य करणाऱ्या कार्यक्रमांची चौकशी करण्याचे आदेश राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशीष शेलार यांनी दिले आहेत. भारतीय डिजिटल पार्टी या ओटीटी वाहिनीच्या निर्लज्ज कांदेपोहे या कार्यक्रमाविरोधात अनेक तक्रारी शेलार यांच्याकडे...

February 14, 2025 3:27 PM

views 12

IICT चं लवकरच भूमीपूजन होणार

जागतिक पातळीवरचं   तंत्रज्ञान शिकण्याची संधी  आणि त्यासाठी आवश्यक असणारं मनुष्यबळ भारतात उपलब्ध करण्याच्या उद्देशानं उभारल्या जाणार असलेल्या इंडियन इन्स्टिटयूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी सेंटर फॉर एक्सलन्सचं लवकरच भूमी पूजन करण्यात येणार असल्याचं सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी काल पुणे इथं सा...

February 14, 2025 3:21 PM

views 28

वादग्रस्त पूजा खेडकरला १७ मार्चपर्यंत दिलासा

बनावट प्रमाणपत्र देऊन आरक्षणाचा लाभ घेतल्या प्रकरणी आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकरला सर्वोच्च न्यायालयाने येत्या १७ मार्चपर्यंत दिलासा दिला आहे. या काळात तपासाला सहकार्य द्यावं असं न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना आणि न्यायमूर्ती सतीश चंद्र शर्मा  यांच्या पीठाने बजावलं आहे. पूजा खेडकरच्या जामीन अर्जा...

February 14, 2025 3:17 PM

views 23

मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर ४ कोटी ९३ लाख रुपये किमतीचे हिरे जप्त

सीआयएसएफ अर्थात केंद्रीय औद्योगिक संरक्षण दलाच्या अधिकाऱ्यांनी काल मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुमारे ४ कोटी ९३ लाख रुपये किमतीचे हिरे जप्त केले. या हिऱ्यांची  तस्करी करणाऱ्या तस्कराला अटक करण्यात आली असून अधिक चौकशीसाठी त्याला विमानतळावरच्या गुप्तचर विभागाकडे सोपवलं आह...

February 14, 2025 3:15 PM

views 41

कोल्हापूरमध्ये जीबीएसग्रस्त महिला रुग्णाचा मृत्यू

कोल्हापूरच्या चंदगड इथं गुईलेन बॅरे सिंड्रोमग्रस्त महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे. या महिलेवर गेल्या काही दिवसांपासून छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात उपचार सुरू होते. या आजारामुळं राज्यात झालेला हा ९वा मृत्यू आहे. राज्यात गुईलेन बॅरे सिंड्रोमचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत.

February 14, 2025 3:29 PM

views 33

शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कृषीमंत्री कक्षाची स्थापन

शेतकऱ्यांच्या समस्या सोडवणं सोपं व्हावं यासाठी विभाग स्तरावर कृषी मंत्री कक्ष स्थापन करण्यात येणार असल्याचं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितलं. नागपूर इथं प्रगतीशील शेतकऱ्यांच्या परिसंवाद कार्यक्रमात ते काल बोलत होते.   शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाकडून अनेक योजना, उपक्रम राबवले जात आहेत...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.