प्रादेशिक बातम्या

February 15, 2025 8:33 PM

views 29

मुंबई विमानतळावर सुमारे सव्वा सात किलो सोनं जप्त

महसूल गुप्तचर संचालनालयाच्या पथकानं मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर तस्करीचं सुमारे सव्वा सात किलो सोनं काल रात्री जप्त केलं. या सोन्याची आंतरराष्ट्रीय बाजारातली किंमत  सुमारे साडेसहा कोटी रुपये इतकी आहे. दुबईहून आलेल्या तीन प्रवाशांना याप्रकरणी अटक केली आहे. 

February 15, 2025 8:15 PM

views 78

गोर-बंजारा समाजाचं आराध्य दैवत संत श्री सेवालाल महाराज यांची जयंती

गोर-बंजारा समाजाचं आराध्य दैवत संत श्री सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज त्यांना अभिवादन केलं. श्री सेवालाल महाराज यांचे विचार न्यायप्रिय, सौहार्दपूर्ण आणि मानवतेच्या दृष्टिकोनातून समाजाला सदैव मार्गदर्शन करत राहतील, असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.  &nbs...

February 15, 2025 8:41 PM

views 22

कॅलिफोर्नियाला कोकणासारखं व्हावंसं वाटलं पाहिजे, असं काम करण्याचा निर्धार-एकनाथ शिंदे

‘खरी शिवसेना कोणती ते राज्यातल्या जनतेने विधानसभा निवडणुकीत दाखवून दिलं,' असं प्रतिपादन शिवसेनेचे नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज रत्नागिरीत केलं. विधानसभा निवडणुकीतल्या यशाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रत्नागिरीत आयोजित आभार सभेत ते बोलत होते.   ‘कोकणाचा कॅलिफोर्निया नाही, तर कॅ...

February 15, 2025 7:58 PM

views 12

४४व्या मराठवाडा साहित्य संमेलनाला आजपासून प्रारंभ

४४व्या मराठवाडा साहित्य संमेलनाला आजपासून प्रारंभ झाला. छत्रपती संभाजीनगर जवळ वाळूज इथल्या दगडोजीराव देशमुख महाविद्यालयात उभारलेल्या विलासराव देशमुख साहित्य नगरीतून निघालेल्या ग्रंथदिंडीने संमेलनाला प्रारंभ झाला. मसिआचे अधक्ष चेतन राऊत यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांच्या प्र...

February 15, 2025 6:18 PM

views 22

जगभरातल्या सामायिक समस्यांवर मात करण्यासाठी वैचारिक देवाणघेवाण महत्वाची-राज्यपाल

जगभरातल्या सामायिक समस्यांवर मात करण्यासाठी वैचारिक देवाणघेवाण महत्वाची असल्याचं राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी म्हटलं आहे. ते काल राज भवन इथं जागतिक आर्थिक मंचाच्या युवा जागतिक नेत्यांच्या ५० सदस्यीय प्रतिनिधी मंडळाला संबोधित करत होते. या प्रतिनिधी मंडळात ४० देशांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे. युवा...

February 15, 2025 8:35 PM

views 9

नवी मुंबई महानगरपालिकेला स्मार्ट गव्हर्नन्स पुरस्कार

स्मार्ट गव्हर्नन्स क्षेत्रातल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल आज नवी मुंबई महानगरपालिकेला ‘स्मार्ट गव्हर्नन्स पुरस्कार’ प्रदान करून गौरवण्यात आलं. नागरी प्रशासनातला डिजीटल माध्यमांचा प्रभावी वापर, सार्वजनिक सेवा वितरणाच्या कार्यक्षमतेतली वाढ, कामकाजातली पारदर्शकता आणि नागरिकांना झालेला प्रत्यक्ष लाभ अशा व...

February 15, 2025 3:43 PM

views 557

लातूर जिल्ह्यात रुग्णवाहिकेच्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू

लातूर जिल्ह्याच्या अहमदपूर तालुक्यातल्या ‘हाडोळती प्राथमिक आरोग्य केंद्राच्या’ रुग्णवाहिकेच्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. रुग्णवाहिका अहमदपूरच्या दिशेनं जात असताना रस्त्याच्या कडेनं जाणाऱ्या दोघांना जोरदार धडक दिली. रुग्णवाहिकेच्या चालकाचा मुलगा ही गाडी चालवत होता.

February 15, 2025 3:42 PM

views 27

नाशिक जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीचा इतिहास

विधानसभा निवडणुकीत १५ पैकी १४ आमदार महायुतीचे निवडून देत नाशिक जिल्ह्यानं इतिहास रचला असून याची दखल घेत नाशिकच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ते काल नाशिकमध्ये हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर झालेल्या सभेत बोलत होते.   नाशिकच्या विकासासाठी ‘नार- पार- ...

February 15, 2025 2:48 PM

views 18

राजमल लखीचंद ज्वेलर्सची १ कोटी ६९ लाख रुपयांची मालमत्ता जप्त

सक्तवसुली संचालनालयानं राजमल लखीचंद ज्वेलर्सची १ कोटी ६९ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. नाशिक आणि जळगावमध्ये ही संपत्ती आहे. बँकेची फसवणूक केल्याच्या गुन्ह्याअंतर्गत दोन दिवसांपूर्वी ही कारवाई झाली.

February 15, 2025 11:15 AM

views 20

जुन्या खटल्यांच्या तपासासाठी राज्य सरकारकडून 27 न्यायवैद्यकशास्त्र व्हॅन्स तैनात

या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी राज्य पोलिस दलाच्या 90 टक्के कर्मचाऱ्यांना नव्या कायद्यांबाबत प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती वार्ताहरांना दिली. सात वर्षांपेक्षा जास्त जुन्या खटल्यांच्या तपासासाठी राज्य सरकारनं 27 न्यायवैद्यकशास्त्र व्हॅन्स तैनात केल्या असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.   नव्या...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.