प्रादेशिक बातम्या

January 30, 2025 8:01 PM January 30, 2025 8:01 PM

views 11

माघी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवरची बंदी कायम

राज्यात माघी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवरची बंदी मुंबई उच्च न्यायालयानं कायम ठेवली आहे. मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या पीठानं यासंबंधीचा अंतरिम आदेश आज जारी केला. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर बंदी घालण्याबाबत केंद्रीय प्...

January 30, 2025 7:35 PM January 30, 2025 7:35 PM

views 6

विधानसभा निवडणुकीत मतदारांनी मनसेनेला केलेलं मतदान पोहोचलंच नाही- राज ठाकरे

विधानसभा निवडणुकीत मतदारांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मतदान केलं, मात्र ते पोहोचलंच नाही, असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. मुंबईत वरळी इथं पक्षाच्या पदाधिकारी मेळाव्यात ते आज बोलत होते. लोकसभा निवडणुकीत ज्या पक्षांचे जास्त उमेदवार निवडून आले होते, त्यांचे विधानसभेत अगदी थोडे उमेदवार नि...

January 30, 2025 7:13 PM January 30, 2025 7:13 PM

views 6

यवतमाळ जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न

यवतमाळ जिल्हा नियोजन समितीची बैठकही आज पालकमंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी सन 2025-26 या आर्थिक वर्षातल्या 659 कोटी रुपयांच्या आराखड्याला मंजूरी देण्यात आली. जिल्हा नियोजन मधून मंजूर झालेला कुठल्याही विभागाचा निधी शिल्लक राहणार नाही, याची दक्षता घ्या, या निधीतून होणारी कामे दर्ज...

January 30, 2025 7:07 PM January 30, 2025 7:07 PM

views 22

सोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या १ हजार १९ कोटी ३३ लाख रुपयांच्या आराखड्याला मान्यता

सोलापूर जिल्हा वार्षिक योजना २०२५-२६ च्या १ हजार १९ कोटी ३३ लाख रुपयांच्या प्रारूप आराखड्याला जिल्हा नियोजन समितीनं आज  मान्यता दिली आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या आज झालेल्या बैठकीनंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी ही माहिती दिली.    जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सर्वसाधारण योजना ८६१ कोटी...

January 30, 2025 7:04 PM January 30, 2025 7:04 PM

views 194

मनोज जरांगे यांचं सहाव्या दिवशी उपोषण स्थगित

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यासह इतर मागण्यांसाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांनी आज सहाव्या दिवशी उपोषण स्थगित केलं. शिंदे समितीचं काम पुन्हा सुरू करण्यात  येईल, मराठा  आरक्षण आंदोलकांवर दाखल गुन्ह्यांची तपासणी करून गुन्हे मागे घेण्याची कार्यवाही सुरू केली जाईल, कुणबी प्रमाणपत्र ...

January 30, 2025 8:08 PM January 30, 2025 8:08 PM

views 2

दहावी आणि बारावी केंद्रावर गैरप्रकार झाल्यास परीक्षा केंद्राची मान्यता रद्द करण्याचा इशारा

फेब्रुवारी-मार्च मधे होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेत गैरप्रकार झाल्यास परीक्षा केंद्राची मान्यता रद्द करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि  उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिला आहे. तसंच परीक्षा केंद्रावर ज्या शाळांमधील विद्यार्थी परीक्षा देत आहेत, त्या शाळेतील शिक्षक, कर्मचाऱ्यांची नियु...

January 30, 2025 8:08 PM January 30, 2025 8:08 PM

views 7

लोकसेवा आयोगाच्या गट ब पदासाठीच्या प्रश्नपत्रिका सुरक्षित असल्याचं MPSC चं स्पष्टीकरण

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गट ब पदासाठीच्या प्रश्नपत्रिका सुरक्षित असून उमेदवारांनी अपवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन आयोगाच्या सचिव  डॉ. सुवर्णा खरात यांनी केलं आहे. त्या नवी मुंबई इथं पत्रकारपरिषदेत बोलत होत्या. येत्या रविवारी २ फेब्रुवारी ला   'महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व प...

January 30, 2025 6:48 PM January 30, 2025 6:48 PM

views 11

एआय धोरण २०२५ च्या टास्कफोर्स समितीची पहिली बैठक संपन्न

एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबंधित एआय धोरण २०२५ च्या टास्कफोर्स समितीची पहिली बैठक आज सह्याद्री अतिथीगृहात झाली. या बैठकीची माहिती राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशीष शेलार यांनी समाजमाध्यमावर दिली आहे. या बैठकीत अॅटलास स्किलटेक विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजन वेळूकर आणि मैत्री, एच डी एफ सी, गुगल, ...

January 30, 2025 5:59 PM January 30, 2025 5:59 PM

views 11

सामुहिक पुनर्विकासाच्या माध्यमातून मुंबईकरांचे घराचे स्वप्न आपण पूर्ण करु-एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज प्रभादेवी इथल्या सहा समूह पुनर्विकास प्रकल्पांची पाहणी  केली. तसंच दादर, माहिम आणि प्रभादेवी विभागातील प्रलंबित पुनर्विकासासंदर्भात आढावा कार्यक्रमाला संबोधित केलं. सामुहिक पुनर्विकासाच्या माध्यमातून मुंबईकरांचे घराचे स्वप्न आपण पूर्ण करु अशी खात्री शिंदे यांनी याव...

January 30, 2025 5:39 PM January 30, 2025 5:39 PM

views 3

तिसरं विश्व मराठी संमलेन उद्यापासून पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयात सुरु

तिसरं विश्व मराठी संमलेन उद्यापासून पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयात सुरु होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्या सकाळी अकरा वाजता संमेलनाचं उद्धाटन होणार आहे. बालगंधर्व रंगमंदिरापासून फर्ग्युसन महाविद्यालयापर्यंत शोभायात्रेनंतर, उद्घाटन समारंभ होईल. तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनात वि...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.