प्रादेशिक बातम्या

February 3, 2025 8:50 AM February 3, 2025 8:50 AM

views 12

आदिवासींच्या आरोग्यासाठी सर्वसमावेशक धोरण तयार करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन

आदिवासींच्या आरोग्यासाठी राज्य सरकारतर्फे सर्वसमावेशक आरोग्य धोरण तयार केल जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केल. आदिवासींच्या आरोग्याच्या समस्या दूर करणं, केवळ भारताच्याच नाही तर जगाच्या दृष्टीने महत्वाचं आहे असं ते म्हणाले. नागपूर इथं महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि...

February 2, 2025 8:12 PM February 2, 2025 8:12 PM

views 16

आदिवासीबहुल भागांमधलं सर्व प्रकारचं मागासलेपण दूर करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन

आदिवासीबहुल भागांमधलं सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक मागसलेपण दूर करणं सर्वांत मोठं आव्हान असून सरकार त्यादृष्टीने सातत्याने प्रयत्न करत आहे, असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. नागपूर मध्ये एम्स इथं महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या वतीनं आय...

February 2, 2025 7:45 PM February 2, 2025 7:45 PM

views 12

महानुभाव पंथाच्या राज्यातल्या सर्व प्रमुख श्रद्धास्थळांचा विकास करायचा संकल्प सरकारनं केला – मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस

महानुभाव पंथाच्या राज्यातल्या सर्व प्रमुख श्रद्धास्थळांचा विकास करायचा संकल्प सरकारनं केला असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी सांगितलं. नांदेड जिल्ह्यातल्या हदगाव इथल्या श्रीकृष्ण देव उखळाई मंदिराच्या नवपर्व आणि कलशारोहण सोहळ्यात ते आज बोलत होते. चक्रधऱ स्वामी आणि त्यांच्या अनुयायांनी विपरित...

February 2, 2025 7:43 PM February 2, 2025 7:43 PM

views 12

राज्यात १५ ते १६ वर्ष वयोगटातली ९८ टक्के मुलं शाळेत जात असून शाळाबाह्य मुलांचं प्रमाण सर्वात कमी असलेल्या राज्यांमधे महाराष्ट्राचा समावेश

राज्यात १५ ते १६ वर्ष वयोगटातली ९८ टक्के मुलं शाळेत जात असून शाळाबाह्य मुलांचं प्रमाण सर्वात कमी असलेल्या राज्यांमधे महाराष्ट्राचा समावेश होतो. अशी माहिती शालेय शिक्षण विभागामार्फत देण्यात आली आहे. प्रथम एज्युकेशन फाउंडेशन या संस्थेतर्फे राज्याच्या ग्रामीण भागातल्या शाळांचा सर्वेक्षण अहवाल - असर - प...

February 2, 2025 3:38 PM February 2, 2025 3:38 PM

views 12

आज जागतिक पाणथळ जागा दिन

आज जागतिक पाणथळ जागा दिन आहे. अशा जागांचं  संरक्षण आणि त्याबाबतची आस्था व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा करायची प्रथा १९७१ सालापासून सुरु आहे. इराणच्या रामसर शहरात २ फेब्रुवारी १९७१ रोजी या दिवसानिमित्त पहिलं रामसर अधिवेशन झालं होतं. वनस्पती आणि इतर सूक्ष्म जीवांचा अधिवास असलेल्या जल परिसंस्था या केव...

February 2, 2025 3:08 PM February 2, 2025 3:08 PM

views 2

देशभरात आज वसंत पंचमी साजरी

देशभरात आज वसंत पंचमी साजरी होत आहे. या दिवशी विद्येची देवता सरस्वती देवीची पूजा केली जाते, तसंच वसंत ऋतूचं स्वागत करून निसर्गातील नवनिर्मितीचा उत्सव साजरा केला जातो.    शिक्षण आणि ज्ञानाचं महत्व सांगणारा तसंच समृद्धी आणि आनंदाचा उत्सव साजरा करणारा हा दिवस असून सर्व देशवासियांना शुभेच्छा देत अस...

February 2, 2025 3:41 PM February 2, 2025 3:41 PM

views 2

गुजरातमधे सापुतारा घाटात झालेल्या बस अपघातात 5 जणांचा मृत्यू , 17 जण जखमी

गुजरातच्या डांग जिल्ह्यात सापुतारा घाटात दोनशे फूट दरीत बस कोसळून आज झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला, तर १७ जण जखमी झाले आहेत. ही बस भाविकांना घेऊन महाराष्ट्रातल्या त्र्यंबकेश्वर इथून गुजरातमधल्या द्वारका इथं जात होती. सर्व भाविक मध्यप्रदेशातले रहिवासी आहेत. जखमी  प्रवाशांना अहवा इथल्या रुग्...

February 2, 2025 12:22 PM February 2, 2025 12:22 PM

views 9

मुंबई अंतरराष्ट्रीय विमानतळावर एक किलो ६४९ ग्रॅम वजनाचे अंमली पदार्थ जप्त

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज अंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी एका प्रवाशाकडून काल एक किलो ६४९ ग्रॅम वजनाचे अंमली पदार्थ जप्त केले. त्याचं आंतरराषट्रीय बाजार पेठेतलं मूल्य अंदाजे १६ कोटी ४९ लाख रुपये इतकं आहे. पॅरिसमार्गे मुंबईला आलेल्या प्रवाशाकडून  पांढऱ्या रंगाच्या १७०...

February 2, 2025 12:15 PM February 2, 2025 12:15 PM

views 2

राज्यात आंतरराष्ट्रीय कृषी विद्यापीठ स्थापन करण्यात येईल-माणिकराव कोकाटे

राज्यातल्या प्रयोगशील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाने शेती विकसित करता यावी, यासाठी राज्यात आंतरराष्ट्रीय कृषी विद्यापीठ स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केली आहे. काल नाशिक इथं कोकाटे यांचा सर्वपक्षीय नागरी सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. आता ड्रो...

February 2, 2025 12:07 PM February 2, 2025 12:07 PM

views 7

गडचिरोली जिल्ह्यातले पंचायत समितीचे माजी सभापती यांची हत्या

गडचिरोली जिल्ह्यातल्या भामरागड पंचायत समितीचे माजी सभापती सुखराम मडावी यांची काल नक्षलवाद्यांनी गळा दाबून हत्या केल्याचं वृत्त आहे. मडावी हे भामरागड तालुक्यातल्या कियर इथले रहिवासी होते. २०१७ ते २०१९ अशी अडीच वर्षे ते भामरागड पंचायत समितीचे सभापती होते. सध्या ते उपसभापती म्हणून कार्यरत होते. घटनास्थ...