प्रादेशिक बातम्या

January 29, 2025 9:58 AM January 29, 2025 9:58 AM

views 15

लातूरमध्ये कोंबड्यांना बर्डफ्ल्यूची लागण

लातूर जिल्ह्यात उदगीर शहरातल्या रामनगरमध्ये कोंबड्यांना बर्ड फ्ल्यू ची लागण झाली आहे. बर्ड फ्ल्यूचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या आदेशानुसार रामनगर इथल्या एक किलोमीटर परिसरातल्या कोंबड्यांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. तसंच सहा ...

January 29, 2025 9:40 AM January 29, 2025 9:40 AM

views 11

कोल्हापूर, लातूरमध्ये जीबीएसचे रुग्ण

कोल्हापूर जिल्ह्यातही जीबीएसचे दोन रुग्ण आढळले आहेत. यामध्ये एका १२ वर्षीय मुलीचा आणि ६० वर्षीय वृद्धाचा समावेश आहे. दोन्ही रुग्ण जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असल्याचं, रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ एस एस मोरे यांनी सांगितलं.   लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातही जीबीएसचे दोन संशयित ...

January 29, 2025 9:37 AM January 29, 2025 9:37 AM

views 10

सोलापूरमध्ये जीबीएसचे ५ संशयित रुग्ण

सोलापूर जिल्ह्यात जीबीएस आजाराचे पाच संशयित आढळून आले आहेत. त्यापैकी चौघांवर उपचार सुरु असून, एकाचा मृत्यू झाला आहे. उपचार सुरू असलेले चार ही रुग्ण लातूर, निलंगा, तसंच अणदूर या ठिकाणचे आहेत. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी ही माहिती दिली. काल पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी, नागरिकांनी घाबरुन न जा...

January 28, 2025 7:17 PM January 28, 2025 7:17 PM

views 3

सैफ अली खान हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलिसांचं तपासाबाबत स्पष्टीकरण

सैफ अली खान हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी वार्ताहर परिषद घेऊन तपासाबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. पोलिसांनी आतापर्यंत तपास करून आरोपीविरोधात भरपूर पुरावे गोळा केले असून या प्रकरणाच्या खटल्यावेळी ते उपयुक्त ठरतील, असं पोलिसांनी म्हटलं आहे. आरोपीच्या बोटांच्या ठशांसंदर्भातला अहवाल अद्याप आलेला नसल्याने मा...

January 28, 2025 7:17 PM January 28, 2025 7:17 PM

views 6

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मराठी चित्रपट महोत्सवाचं आयोजन मुंबईत करणार -आशीष शेलार

राज्य शासनातर्फे यावर्षीपासून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मराठी चित्रपट महोत्सवाचं आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक मंत्री आशीष शेलार यांनी आज वार्ताहर परिषदेत केली.  जे मराठी चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहचत नाहीत असे चित्रपट या महोत्सवात दाखवण्यात येतील. प्रत्येक चित्रपटासोबत त्या चित्रपटाच...

January 28, 2025 7:16 PM January 28, 2025 7:16 PM

views 4

मलेशियानं महाराष्ट्रातली उत्पादनं आयात करण्यासाठी पुढाकार घ्यावा-जयकुमार रावल

महाराष्ट्र आणि मलेशियादरम्यान सांस्कृतिक समानता असून सांस्कृतिक आणि व्यापारी क्षेत्रातले परस्पर संबंध वृद्धिंगत करण्यासाठी महाराष्ट्र मलेशियाचं स्वागत करेल, असं राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितलं. मलेशियाचे महावाणिज्य दूत अहमद झुवारी युसुफ यांनी मंगळवारी रावल यांची सह्याद्री अतिथीगृहात ...

January 28, 2025 7:07 PM January 28, 2025 7:07 PM

views 2

इयत्ता दुसरी ते आठवीच्या पुस्तकांमध्ये वह्यांची कोरी पाने लावण्याचा निर्णय रद्द

राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता दुसरी ते आठवीच्या पुस्तकांमध्ये वह्यांची कोरी पाने लावण्याचा निर्णय राज्य सरकारनं रद्द केला आहे. येत्या शैक्षणिक वर्षांपासून पाठ्यपुस्तकांमध्ये कोरी पाने न लावण्याचा शासन आदेश सरकारनं आज प्रसिद्ध केला. पाठ्यपुस्तकांमध्ये लावलेल्या कोऱ्या पानांचा विद्यार्थ्यांनी उपयोग के...

January 28, 2025 6:59 PM January 28, 2025 6:59 PM

views 6

CUET-PG : अभ्यासक्रमांसाठीची प्रवेशपरीक्षा १३ ते ३१ मार्च दरम्यान होणार

राष्ट्रीय परीक्षा संस्थेतर्फे घेतली जाणारी सर्व केंद्रीय आणि सहभागी विद्यापीठांमध्ये पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठीची प्रवेशपरीक्षा १३ ते ३१ मार्च दरम्यान होणार आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १ फेब्रुवारी आहे.   इच्छुकांना exams.nta.ac/CUET-PG या संकेतस्थळावरून अर्ज करता येईल.

January 28, 2025 6:37 PM January 28, 2025 6:37 PM

views 15

मुंबईत बीएमसीचा अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात कारवाईचा धडाका सुरु

बृहन्मुंबई महानगरपालिकेने १७ जानेवारी ते २४ जानेवारी या सात दिवसात फेरीवाल्यांकडून सुमारे २ हजार ७६३ साधनसामुग्री जप्त केली आहे. यात अनधिकृत ५४४ हातगाड्या, ९६८ सिलिंडर व १ हजार २५१ इतर साहित्य यांचा समावेश आहे. फेरीवालामुक्त परिसर’ मोहीम अंतर्गत अतिक्रमण निर्मूलन पथकांकडून मुंबईत अनधिकृत फेरीवाल्यां...

January 28, 2025 8:30 PM January 28, 2025 8:30 PM

views 3

जीबीएस रुग्णांच्या उपचारासाठी विशेष व्यवस्था निर्माण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

जीबीएस, अर्थात गुईलेन बॅरे सिंड्रोमच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी शासकीय रुग्णालयांमधे विशेष व्यवस्था निर्माण करावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दिल्या आहेत. त्यांनी आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या आजाराबाबत आढावा घेतला. या आजारावर केले जाणारे उपचार महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.