प्रादेशिक बातम्या

February 9, 2025 1:13 PM February 9, 2025 1:13 PM

views 14

मध्यप्रदेशातील अपघातात ३ जणांचा मृत्यू , दहा जण जखमी

मध्यप्रदेशातल्या सतना इथं आज पहाटे झालेल्या दोन वाहनांच्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून दहा जण जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त मिनी ट्रक भाविकांना प्रयागराज इथं कुंभमेळ्याला घेऊन जात होती.   अपघात झाल्यानंतर सतना - चित्रकुट रस्त्यावर  बराच काळ वाहतूक कोंडी झाली होती. जखमींवर उपचार सुरू असल्य...

February 9, 2025 1:09 PM February 9, 2025 1:09 PM

views 11

विमा, निवृत्तीवेतन आणि शेअर बाजार हे देशाच्या आर्थिक विकासाचे 3 महत्त्वपूर्ण पैलू- नितीन गडकरी

विमा, निवृत्तीवेतन आणि शेअर बाजार हे तीन स्तंभ देशाच्या आर्थिक विकासाचे तीन महत्त्वपूर्ण पैलू असून या माध्यमातून आलेली गुंतवणूक उद्योगव्यवसायांना समृद्ध करु शकते, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. नागपूर इथं झालेल्या गुंतवणूकदार प्रशिक्षण परिषदेत ते काल बोलत होते.   आर्थिक वाढीस...

February 8, 2025 7:41 PM February 8, 2025 7:41 PM

views 2

बुलडाणा जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या अपघातात ३ ठार तर १ गंभीर जखमी

बुलडाणा जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या अपघातात ३ जण ठार तर १ जण गंभीर जखमी झाले आहेत. मलकापूर जवळ उमाळी इथं दुचाकीची समोरासमोर धडक होऊन २ जणांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. दुसऱ्या अपघातात खामगाव नजीक टेंभुर्णा इथं अज्ञात वाहनाने मागून धडक दिल्याने दुचाकीवरच्या इसमाचा मृत्यू झाला.

February 8, 2025 7:36 PM February 8, 2025 7:36 PM

views 6

शेतकऱ्यांना कृषिक्षेत्रात काळानुरूप होणारे बदल आता स्वीकारावे लागतील – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

आधुनिक तंत्रज्ञान आणि जैविक खतांचा वापर करून शेतीची उत्‍पादन क्षमता वाढवावी लागणार असून शेतकऱ्यांना कृषिक्षेत्रात काळानुरूप होणारे बदल आता स्वीकारावे लागतील, असं प्रतिपादन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं. डाळिंब उत्‍पादक शेतकऱ्यांसाठी अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहाता तालुक्यातल्या राजु...

February 8, 2025 7:35 PM February 8, 2025 7:35 PM

views 11

कोल्हापूर जिल्हा वार्षिक योजनेचा वर्ष २०२५-२६ साठीचा ९४० कोटी रुपयांचा आराखडा सरकारला सादर

कोल्हापूर जिल्हा वार्षिक योजनेचा वर्ष २०२५-२६ साठीचा ९४० कोटी रुपयांचा आराखडा आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सरकारला सादर करण्यात आला. केशवराव भोसले नाट्यगृह नूतनीकरण लवकरात लवकर पूर्ण करणं, मधाचं गाव पाटगाव अंतर्गत चांगल्या प्रतीच्या शुद्ध मधाचं उत्पादन वाढवून रोजगार निर्मितीला चालना ...

February 8, 2025 7:14 PM February 8, 2025 7:14 PM

views 7

ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत यांच्या पार्थिवावर आज दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. आज पहाटे मुंबईत त्यांचं राहत्या घरी निधन झालं. ते ९० वर्षांचे होते. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय यांचा लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार, मुंबई मराठी पत्रकार संघाचा पुढारीकार ग. गो. जाधव पुरस्कार तसंच मंत्रालय आण...

February 8, 2025 3:38 PM February 8, 2025 3:38 PM

views 5

जुन्या आणि निरुपयोगी वाहनांच्या स्क्रॅपिंगसाठी राज्यात ६ केंद्रांना मान्यता

केंद्र शासनाच्या वाहन स्क्रॅपिंग अर्थात निष्कासन धोरणाची अंमलबजावणी राज्यात केली जात आहे. त्यानुसार जुन्या आणि निरुपयोगी वाहनांचं निष्कासन करण्यासाठी राज्यात ६ नोंदणीकृत सुविधा केंद्रांना मान्यता दिली आहे. आपल्या वाहनांचं निष्कासन नोंदणीकृत वाहन सुविधा केंद्रांमार्फत केल्यास नवीन वाहन खरेदी करतांना ...

February 8, 2025 3:38 PM February 8, 2025 3:38 PM

views 13

MHADA: सदनिका सोडती संदर्भातील माहिती पुस्तिकेचे अनावरण

म्हाडा नाशिक गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळातर्फे नाशिकमधल्या विविध ठिकाणी २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेतल्या ४९३ सदनिकांच्या विक्रीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी आणि अर्ज भरणा प्रक्रियेचा काल प्रारंभ झाला. सदनिका सोडती संदर्भातील माहिती पुस्तिकेचे अनावरणही मंडळाचे सभापती रंजन ठाकरे यांच्या हस्ते...

February 8, 2025 11:20 AM February 8, 2025 11:20 AM

views 10

बेकायदेशीररीत्या रहात असलेल्या सात बांगलादेशी नागरिकांना मुंबईत अटक

मार्च 2020 पासून बेकायदेशीररीत्या देशात रहात असलेल्या सात बांगलादेशी नागरिकांना काल मुंबईत अटक करण्यात आली. यामध्ये चार महिलांचा समावेश आहे. अटक करण्यात आलेले सातही जण गेल्या पाच वर्षांपासून मुंबईतल्या चेंबूरच्या माहुल भागात रहात होते, त्यांच्याकडे कोणतीही वैध कागदपत्रं नव्हती. तसंच त्यांनी बांगलादे...

February 8, 2025 3:40 PM February 8, 2025 3:40 PM

views 131

विंदा.करंदीकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक रा.रं.बोराडे यांना जाहीर

राज्यशासनाचे विविध वाङ्गमय पुरस्कार काल जाहीर झाले. या वर्षासाठीचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार छत्रपती संभाजीनगर इथले ज्येष्ठ साहित्यिक रावसाहेब रंगराव उर्फ रा रं बोराडे यांना जाहीर झाला आहे. श्री.पु. भागवत पुरस्कार, पुण्याच्या ज्योत्स्ना प्रकाशनला, डॉ.अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार डॉ.रमेश सू...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.