प्रादेशिक बातम्या

March 10, 2025 8:18 PM

views 22

राज्याला विकसित महाराष्ट्राच्या उद्दिष्टाकडे घेऊन जाणारा हा अर्थसंकल्प

आगामी वर्षाचा अर्थसंकल्प हा लोकाभिमुख आणि राज्याला विकसित महाराष्ट्राच्या उद्दिष्टाकडे घेऊन जाणारा, संतुलित असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना एकवीसशे रुपये देण्याचं आश्वासन पूर्ण करण्यासाठी नियोजन सुरू आहे, असं त्यांनी ...

March 10, 2025 8:12 PM

views 22

व्यक्तीगत वापराच्या सीएनजी आणि एलपीजी वाहनांवरच्या करात १ टक्के वाढ

व्यक्तीगत वापराच्या सीएनजी आणि एलपीजी वाहनांवरच्या करात १ टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव अर्थमंत्री अजित पवार यांनी आज सादर केला. याशिवाय ३० लाखापेक्षा अधिक किंमतीच्या इलेक्ट्रिक वाहनांवर ६ टक्के दराने मोटार वाहन कराची आकारणी त्यांनी प्रस्तावित केली.  बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या क्रेन्स, कॉम्प्रेसर,...

March 10, 2025 8:14 PM

views 32

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना लवकरच एकवीसशे रुपये देण्याचं नियोजन-मुख्यमंत्री

आगामी आर्थिक वर्षाचा एकूण ७ लाख २० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी आज सादर केला. त्यात ५ लाख ६० हजार ९६४ कोटी रुपयांची महसुली जमा आणि ६ लाख ६ हजार ८५५ कोटी रुपयांचा महसुली खर्च अपेक्षित आहे. यात ४५ हजार ८९१ कोटी  रुपये तूट अपेक्षित आहे. २०२५-२६ ची राजकोषीय तूट १ लाख ३६ हजार २३५ क...

March 10, 2025 8:08 PM

views 140

शेतकऱ्यांसाठी बळीराजा शेत आणि पाणंद रस्ते योजनेची अर्थसंकल्पात घोषणा

बी बियाणे, यंत्रसामुग्री, खते आणि शेतमालाच्या वाहतुकीसाठी बळीराजा शेत आणि पाणंद रस्ते ही नवे योजना अर्थमंत्र्यांनी आज जाहीर केली. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करुन पहिल्या टप्प्यात राज्यातल्या ५० हजार शेतकऱ्यांच्या १ लाख एकर क्षेत्राला लाभ देण्याचा निर्णय त्यांनी आज जाहीर केला. कोकणातल्या उल्हास आणि व...

March 10, 2025 8:08 PM

views 33

उद्योग, पायाभूत सुविधा, कृषि, सामाजिक क्षेत्रासह सर्वच क्षेत्राच्या विकासासाठी अर्थसंकल्पात महत्वाच्या तरतुदी

उद्योग, पायाभूत सुविधा, कृषि आणि संलग्न क्षेत्रे, सामाजिक तसंच इतर क्षेत्राच्या विकासासाठी महत्वाच्या तरतुदी करणारा आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत सादर केला. त्यांचा हा ११ वा अर्थसंकल्प होता. राज्य सरकार लवकरच नवे औद्योगिक, कामगार, गृहनिर्मा...

March 10, 2025 8:04 PM

views 27

जनता, शेतकरी आणि लाडक्या बहिणींची फसवणूक करणारा अर्थसंकल्प असल्याची विरोधकांची टीका

महायुती सरकारने निवडणूक काळात दिलेल्या एकाही आश्वासनाची पूर्तता अर्थसंकल्पात केली नाही.  या अर्थसंकल्पाद्वारे सरकारने जनतेची फसवणूक केल्याची टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. शेतकरी आणि लाडक्या बहिणींची फसवणूक करणारा हा अर्थसंकल्प असल्याचं विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्...

March 10, 2025 6:16 PM

views 17

ऊस तोडणी मशिन मालकांचं पुण्यात साखर आयुक्तांच्या कार्यालयासमोर आंदोलन

ऊस तोडणी मशीनचा दर वाढवून मिळावा, बँकेच्या हप्त्यांना मुदतवाढ मिळावी या आणि इतर मागण्यांसाठी ऊस तोडणी मशिन मालकांनी आज पुण्यात साखर आयुक्तांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केलं. मागण्या पूर्ण न झाल्यास राज्यातले तेराशे मशिन मालक आपल्या मशिन घेऊन साखर संकुल आणि मंत्रालयाला घेराव घालतील असा इशार...

March 10, 2025 5:26 PM

views 25

भंडारा जिल्ह्यात २२ लाखांहून अधिक किंमतीचा गुटखा आणि सुगंधित तंबाखू जप्त

भंडारा जिल्ह्यात कारधा पोलिसांनी २२ लाखांहून अधिक किमतीचा गुटखा आणि सुगंधित तंबाखू जप्त केला. छत्तीसगड मधून हे पदार्थ राज्यात आणले जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार कारवाई करत पोलिसांनी गुटखा, लोखंडी चॅनल आणि वाहतूक करणारा ट्र्क असा एकूण ४० लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

March 10, 2025 5:20 PM

views 26

राज्यातल्या पाच जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा

राज्यातल्या पाच जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. ११ मार्चपर्यंत कोकणासह मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागानं कळवलं आहे.

March 10, 2025 3:56 PM

views 148

राज्यासाठी नवे धोरण जाहीर करण्याची अर्थसंकल्पात घोषणा

राज्याचं नवीन औद्योगिक धोरण, कामगार धोरण, गृहनिर्माण धोरण तसंच आरोग्य आणि ज्येष्ठ नागरिक धोरण लवकरच जाहीर करण्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत केली. उद्योग, पायाभूत सुविधा, कृषि आणि संलग्न क्षेत्रे, सामाजिक तसंच इतर क्षेत्राच्या विकासासाठी महत्वाच्या तरतुदी करणारा आगामी आर्थिक वर्ष...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.