प्रादेशिक बातम्या

March 13, 2025 3:46 PM

views 27

राज्यात उन्हाचा कडाका वाढणार !

राज्यातल्या अनेक भागात उन्हाचा कडाका वाढला असून, येत्या दोन दिवसात विदर्भात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. उर्वरित राज्यात तापमान सरासरीच्या जवळपास राहील असं पुणे वेधशाळेनं म्हटलं आहे.

March 13, 2025 3:47 PM

views 28

फास्टॅगचा अनिवार्य करण्याच्या निर्णयात हस्तक्षेप करायला मुंबई उच्च न्यायालयाचा नकार

राज्यातल्या प्रत्येक टोल नाक्यावर फास्टॅगचा वापर अनिवार्य करणं आणि रोख पैसे दिल्यास दुप्पट शुल्क आकारणं हा राज्य सरकारचा धोरणात्मक निर्णय असल्याचा निर्वाळा आज मुंबई उच्च न्यायालयाने दिला. त्यामुळे या निर्णयात हस्तक्षेप करणार नसल्याचं म्हणत न्यायालयाने फास्टॅग सक्तीच्या निर्णयाला आव्हान देणारी जनहित ...

March 13, 2025 2:58 PM

views 31

होळीचा सण जबाबदारीनं साजरा करण्याचं मुंबई पालिकेचं आवाहन

मुंबईकरांनी होलिका दहन आणि धूलिवंदन हे सण आनंदानं आणि जबाबदारीनं साजरे करावेत. होलिका दहनासाठी वृक्षतोड करू नये, तसंच प्रदूषण टाळण्यासाठी रंगवलेलं लाकूड, प्लास्टिक, रबर, टायर अश्या वस्तू होळीत टाकू नये, असं आवाहन मुंबई महानगरपालिकेनं केलं आहे.   रंगांचा उत्सव साजरा करताना पर्यावरणाची काळजी घ्‍य...

March 12, 2025 8:14 PM

views 37

डिजिटल गुन्ह्यांमध्ये तिपटीने वाढ

२०२२ ते २०२४ या तीन वर्षांत देशात डिजिटल अटकेसारख्या गुन्ह्यांमध्ये जवळपास तिपटीने वाढ झाली आहे, अशी माहिती आज राज्यसभेत गृहराज्यमंत्री बंडी संजयकुमार यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली. २०२२मध्ये सुमारे ४० हजार गुन्हे नोंदवले गेले होते. त्यात ९१ कोटी रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक झाली होती.   २०...

March 12, 2025 8:09 PM

views 13

किरकोळ चलनफुगवट्याचा दर सात महिन्यातल्या निचांकी पातळीवर

फेब्रुवारी महिन्यात किरकोळ चलनफुगवट्याचा दर कमी होऊन ३ पूर्णांक ६१ शतांश टक्क्यांवर आला. सात महिन्यातली ही निचांकी पातळी आहे. हा दर ४ टक्क्यांच्या खाली आणण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे उद्दिष्ट रिझर्व्ह बँकेला दिले होते.   ही घट अनपेक्षित असल्याचं इक्रा या पतनिर्धारण संस्थेच्या मुख्य अर्थशा...

March 12, 2025 8:02 PM

views 23

जास्त व्याजदर देणाऱ्या योजनांच्या आमिषाला बळी न पडण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागरिकांना आवाहन

जास्त व्याजदर देणाऱ्या योजनांच्या आमिषाला नागरिकांनी बळी पडू नये. जादा व्याज देणाऱ्या ९९ टक्के योजना या फसव्या असतात, असा सावधगिरीचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.   अभ्यासक्रमाची पुस्तके मराठीत उपलब्ध होऊ लागल्यानं MPSC कडून घेण्यात येणाऱ्या सर्वच स्पर्धा परीक्षा मराठीमध्ये ...

March 12, 2025 7:38 PM

views 91

६६वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा येत्या २६ तारखे पासून जामखेड इथं होणार

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची ६६वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा कर्जत जामखेड इथे होणार आहे, अशी माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली. येत्या २६ ते ३० मार्च पर्यंत ही स्पर्धा आयोजित केली जाणार असून ३० तारखेला अंतिम सामना होणार आहे. या स्पर्धेत कोणतंही राजकारण असणार नाही, असंही रोहित पवार म्हणा...

March 12, 2025 7:46 PM

views 10

राज्याच्या कर महसूलाकडे लक्ष देण्याची गरज – माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार

अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पातून राज्याची प्रगती होत असल्याचं दिसतंय. मात्र राज्याचा कर महसूल कमी झाला आहे, त्याकडे लक्ष देणं गरजेचं असल्याचं माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले. विधानसभेत अर्थसंकल्पावरच्या चर्चेत ते बोलत होते.   या अर्थसंकल्पाद्वारे सरकारने अनेक सकारात...

March 12, 2025 7:21 PM

views 31

भेसळीचं पनीर विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येणार- अजित पवार

कृत्रिम किंवा भेसळीचं पनीर आरोग्यासाठी धोक्याचं असून त्याच्या विक्रेता आणि संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितलं.   अशा प्रकारची भेसळ ओळखण्यासाठी नवीन प्रयोगशाळा सुरु करण्यासाठी तसंच प्रयोगशाळांचं बळकटीकरण करण्यास...

March 12, 2025 7:11 PM

views 26

रत्नागिरी जिल्ह्यात शिमगोत्सवाच्या मानापमानावरून होनारे वाद मिटवण्यात पोलिसांना यश

रत्नागिरी जिल्ह्यातल्या २४ गावांमध्ये शिमगोत्सवाच्या मानापमानावरून काही वाद होत होते, मात्र पोलिसांनी पुढाकार घेतल्याने २४ पैकी १९ गावांमध्ये सामोपचाराने वाद मिटवण्यात यश आलं आहे.   अन्य गावांमध्येही वाद मिटवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी ...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.