प्रादेशिक बातम्या

February 28, 2025 3:46 PM February 28, 2025 3:46 PM

views 17

भाषा टिकली तर संस्कृती टिकेल – राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

भाषा टिकली तर संस्कृती टिकेल. म्हणून  मुलांना मराठी बोलण्यासाठी,  लिहिण्यास प्रेरित करावं आणि प्रत्येकानं किमान एक मराठी वृत्तपत्र घरी आणावं, असं आवाहन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी केलं. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त काल राजभवनात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

February 28, 2025 4:04 PM February 28, 2025 4:04 PM

views 16

योजनांच्या अंमलबजावणीसाठी AIचा वापर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

राज्य शासनामार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी एआयचा वापर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिले. शासनाच्या कृती आराखड्यानुसार होणाऱ्या कामांचा आढावा घेण्यासाठी मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. विविध विभाग आणि पातळीवर उत्कृष्ट काम करत असल...

February 28, 2025 4:04 PM February 28, 2025 4:04 PM

views 16

Pune Crime : स्वारगेट बस स्थानक बलात्कार प्रकरणातल्या आरोपीला अटक

पुण्यातल्या स्वारगेट बस स्थानक बलात्कार प्रकरणातला आरोपी दत्ता गाडेला  आज पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी अटक केली. शिरूर तालुक्यातल्या कनाट गावातल्या ग्रामस्थांनी पोलिसांना मदत केली. त्याला आज न्यायालयात हजर केलं जाईल. हा खटला जलदगती न्यायालयात चालवणार असल्याचं पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश ...

February 28, 2025 8:09 PM February 28, 2025 8:09 PM

views 8

अभिनेते उत्तम मोहंती यांचं निधन

प्रख्यात ओडिया चित्रपट अभिनेते उत्तम मोहंती यांच्यावर आज भुवनेश्वर इथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच काल रात्री गुरुग्राममधल्या एका खाजगी रुग्णालयात निधन झालं होतं. यकृताच्या आजारामुळे ते आजारी होते. उत्तम  मोहंती  यांनी १३० हून अधिक ओडिया चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यांच्या निध...

February 27, 2025 9:10 PM February 27, 2025 9:10 PM

views 6

कवी कुसुमाग्रजांचे शिरवाडे वणी गाव “कवितांचे गाव” म्हणून घोषित

मराठी भाषा गौरव दिन आज राज्यभरात साजरा होत आहे.    २७ फेब्रुवारी हा कविवर्य कुसुमाग्रज म्हणजे विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस. त्यांच्या जयंतीचं औचित्य साधून हा दिवस साजरा केला जातो. यानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमं...

February 27, 2025 9:09 PM February 27, 2025 9:09 PM

views 12

एसटी महामंडळाच्या सर्व बसगाड्यांमध्ये CCTV लावण्याचे परिवहन मंत्र्यांचे आदेश

एसटी महामंडळाच्या सर्व बसेसमध्ये सीसीटीव्ही आणि जीपीएस यंत्रणा तातडीनं लावाव्यात, सर्व बसस्थानक आणि आगारांचे तातडीने सुरक्षा लेखापरीक्षण  करण्याच्या सूचना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिल्या आहेत. पुण्यातल्या स्वारगेट एसटी बस स्थानकात शिवशाही बसमध्ये  तरुणीवर अत्याचार झाल्याचं उघड झाल्यानंतर रा...

February 27, 2025 1:38 PM February 27, 2025 1:38 PM

views 339

राज्यात ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा

मराठी भाषा गौरव दिन आज राज्यभरात साजरा होत आहे. २७ फेब्रुवारी हा कविवर्य कुसुमाग्रज म्हणजे विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस. त्यांच्या जयंतीचं औचित्य साधून हा दिवस साजरा केला जातो. यानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजि...

February 27, 2025 1:31 PM February 27, 2025 1:31 PM

views 5

उद्योगांनी सरकारवर अवलंबून न राहता स्पर्धेत उतरावं – मंत्री पीयूष गोयल

उद्योगांनी सरकारवर अवलंबून न राहता स्पर्धेत उतरावं असं आवाहन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी उद्योजकांना केलं. मुंबईत आयएमसी चेंबर ऑफ कॉमर्सच्या आयएमसी भारत कॉलिंग परिषदेचं उद्घाटन गोयल यांच्या हस्ते आज झालं, त्यावेळी ते बोलत होते. अनुदान, उच्च आयात शुल्क अशा सरकारच्या  मदतीवर कध...

February 27, 2025 12:44 PM February 27, 2025 12:44 PM

views 12

पुणे बलात्कार प्रकरणातल्या आरोपीची माहिती देणाऱ्याला बक्षीस जाहीर

पुण्यातल्या स्वारगेट बस स्थानकातल्या बलात्कार प्रकरणातल्या आरोपीची माहिती देणाऱ्याला एक लाख रुपयांचं बक्षीस पुणे पोलिसांनी जाहीर केलं आहे. या प्रकरणातला आरोपी मंगळवारपासून फरार असून त्याला शोधण्यासाठी १३ पथकं कामाला लागली असल्याचं पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं. आरोपीची माहिती देणाऱ्याची ओळक गुप्त ठेवली...

February 26, 2025 8:38 PM February 26, 2025 8:38 PM

views 15

बीड सरपंचांच्या हत्येप्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती

बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी राज्य सरकारने ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. तर, विधीज्ञ बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाज माध्यमावर यास...