प्रादेशिक बातम्या

March 1, 2025 9:10 PM March 1, 2025 9:10 PM

views 16

अंमलीपदार्थांच्या प्रकरणांमध्ये दोषी आढळणारे पोलीस सेवेतून बडतर्फ

अंमलीपदार्थांच्या प्रकरणांमध्ये दोषी आढळणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं यापुढे केवळ निलंबन न करता पोलीस सेवेतून बडतर्फ केलं जाईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत झालेल्या पोलीस संमेलनात बोलत होते. या संमेलनात देशात नव्यानं  तयार झालेल्या तिन्ही कायद्यांच्या अंमल...

March 1, 2025 9:20 PM March 1, 2025 9:20 PM

views 12

ज्येष्ठ लेखिका, प्रवासवर्णनकार डॉ. मीना प्रभू यांचं निधन

ज्येष्ठ लेखिका, प्रवासवर्णनकार डॉ. मीना प्रभू यांचं आज पुण्यात निधन झालं. त्या ८५ वर्षांच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या आणि त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.   डॉ. प्रभू यांनी सुमारे २० वर्षं लंडनमध्ये वैद्यकीय क्षेत्रात काम केलं. त्यांनी जगातल्या अनेक देशांमध...

March 1, 2025 7:16 PM March 1, 2025 7:16 PM

views 2

महत्त्वाच्या विद्यापीठांच्या पुनरुज्जीवनाची गरज उपराष्ट्रपतींकडून व्यक्त

भारतात एकेकाळी ज्ञानाची केंद्रं म्हणून कार्यरत असलेल्या नालंदा, तक्षशीला अशा महत्त्वाच्या विद्यापीठांचं पुनरुज्जीवन व्हायला हवं, असं आग्रही प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज केलं. मुंबईत के. पी. बी. हिंदुजा वाणिज्य महाविद्यालयाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे ...

March 1, 2025 7:08 PM March 1, 2025 7:08 PM

views 13

वेव्हजमध्ये कम्युनिटी रेडिओ कंटेट स्पर्धेचं आयोजन

वेव्हज परिषदेत कम्युनिटी रेडिओ कंटेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. कम्युनिटी रेडिओ स्टेशनवरून प्रसारित होणाऱ्या नावीन्यपूर्ण, सर्जनशील कार्यक्रमांचं महत्व अधोरेखित करणं, प्रादेशिक वैशिष्ट्य आणि स्थानिक कलाकारांना सक्षम करणं हा याचा हेतू आहे. ही परिषद १ ते ४ मे रोजी मुंबईत आयोजित करण्यात आली आहे.

March 1, 2025 7:52 PM March 1, 2025 7:52 PM

views 15

माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेवर ५ मार्चला सुनावणी

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला त्यांनी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात आव्हान दिलं असून यावर ५ मार्च रोजी न्यायालय निकाल सुनावणार आहे. सदनिका खरेदी करताना कोकाटे यांनी खोटी माहिती दिली यासाठी त्यांना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा न्यायालयाने सुुनावली आहे, या शिक्षेला स्थगिती मिळावी यासा...

March 1, 2025 6:55 PM March 1, 2025 6:55 PM

views 10

मजबूत विकासासाठी देशाला आधुनिक तंत्रज्ञानाची गरज – मंत्री नितीन गडकरी

मजबूत विकासासाठी देशाला आधुनिक तंत्रज्ञानाची गरज असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत आयोजित इनोव्हर्स परिषदेत बोलत होते. भारत ही जगातली सर्वात  वेगानं वाढणारी  अर्थव्यवस्था असून यात उद्योग क्षेत्राची भूमिका मोठी आहे, असंही ते म्हणाले.

March 1, 2025 7:19 PM March 1, 2025 7:19 PM

views 20

३५व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेचा समारोप

३५व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेचा समारोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज ठाण्यात झाला. विविध क्रीडा प्रकारात सहभागी झालेल्या खेळाडूंचं फडणवीस यांनी अभिनंदन केलं. संघभावना जोपासण्यासाठी खेळ खेळणं आवश्यक आहे, त्यामुळे क्रीडा स्पर्धेत जास्तीत जास्त जणांनी सहभाग घ्यावा असं ...

March 1, 2025 3:54 PM March 1, 2025 3:54 PM

views 3

८२ दिवसांत ५७ हजार ३३ घरांवर सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्प बसवण्यात उद्दिष्ट पूर्ण

वीज महावितरण कंपनीने प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचं राज्य सरकारनं दिलेलं उद्दिष्ट ८२ दिवसांत पूर्ण केलं आहे. महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी ही माहिती दिली.   पाच डिसेंबरपर्यंत राज्यात ७१ हजार ४३७ तर त्यानंतर शंभर दिवसांच्या मोहिमेत ८२ दिवसांत ५७ हजार ३३ घरां...

March 1, 2025 3:48 PM March 1, 2025 3:48 PM

views 9

अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या सोमवारपासून मुंबईत सुरु

राज्य विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या सोमवारपासून मुंबईत सुरु होणार आहे. अधिवेशनासाठी सुरक्षाव्यवस्था आणि तयारीचा आढावा काल घेण्यात आला.   विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सुरक्षा, वाहन तळ व्यवस्था, वैद्यकीय सुवि...

March 1, 2025 3:42 PM March 1, 2025 3:42 PM

views 30

कोयना परिसर पर्यटन हब बनविणार- पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

सातारा जिल्ह्यातल्या कोयना परिसराला पर्यटन हब बनवण्यासाठी महत्त्वाचं पाऊल उचलत एमटीडीसी म्हणजेच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या कोयना रिसॉर्टचं आधुनिकीकरण आणि नूतनीकरण करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. कोयना पर्यटन विकासासंदर्भात मंत्रालयात झालेल्या आढावा ...