प्रादेशिक बातम्या

April 8, 2025 8:18 PM

views 31

शेतीसंबंधी वादावर तोडग्यासाठी असलेल्या सलोखा योजनेला २०२७ पर्यंत मुदतवाढ

शेतीसंबंधी वादावर तोडगा काढण्यासाठी असलेल्या सलोखा योजनेला २०२७ पर्यंत मुदतवाढ देण्याची घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. शेतजमिनीचा ताबा, वहिवाटी, कुटुंबातले वाद अशा प्रकरणावर सलोखा योजनेच्या माध्यमातून तोडगा काढला जातो. आतापर्यंत १ हजार ७ प्रकरणांवर यशस्वी तोडगा निघाला आहे. तसंच...

April 8, 2025 7:53 PM

views 30

आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सव चित्रपताकाचं २१ ते २४ एप्रिलला आयोजन

पहिल्या आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सव चित्रपताकाचं आयोजन येत्या २१ ते २४ एप्रिल दरम्यान मुंबईत प्रभादेवी इथे केलं जाणार आहे. या महोत्सवाच्या बोधचिन्हाचं अनावरण आज राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते झालं. चार दिवस चालणाऱ्या या चित्रपट महोत्सवात विविध विषयांवरचे एक...

April 8, 2025 7:33 PM

views 33

विठ्ठल मंदिरात वारी वेळी होणाऱ्या गर्दीच्या व्यवस्थानासाठी एआयचा वापर करणार

पंढरपूर इथल्या विठ्ठल मंदिरात वारीच्या वेळी होणाऱ्या गर्दीचं व्यवस्थापन करण्यासाठी एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. या तंत्रज्ञानाची चाचणी आज पंढरपुरात घेण्यात आली. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून गर्दीचं प्रमाण, गर्दीची घनता मोजता येणार आहे. चेहरे ओळखण्याच्या प्रणा...

April 8, 2025 7:14 PM

views 10

पुणे महापालिकेकडून थकबाकी भरण्यासाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला नोटीस

पुणे महापालिकेकडून २२ कोटी रुपयांची थकबाकी भरण्यासाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला नोटीस बजावण्यात येणार आहे. रुग्णालय प्रशासनानं महापालिकेच्या मिळकत कराची कुठल्याही प्रकारची थकबाकी नसल्याचं म्हटलं आहे. रूग्णालय प्रशासनानं आत्तापर्यंत धर्मादाय कायद्यानुसार सवलत ग्राह्य धरून मिळकत कर भरल्यानं कराची थक...

April 8, 2025 7:09 PM

views 27

MMRDA चे इंडिया ग्लोबल फोरममधे ४ लाख ७ हजार कोटी रूपयांचे सामंजस्य करार

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं आज मुंबईत जियो वल्ड सेंटर इथं आयोजित इंडिया ग्लोबल फोरम २०२५च्या कार्यक्रमात ४ लाख ७ हजार कोटी रूपयांचे सामंजस्य करार केले. रस्ते, रेल्वे, पिण्याचे पाणी, महामार्ग, सागरी किनारा मार्ग, उड्डाणपुल आणि मेट्रोसारख्या विविध प्रकल्पांसाठी देशातल्या सार्वजनिक कंपन्यांस...

April 8, 2025 6:59 PM

views 28

राज्यातल्या बहुतांश भागात पुढचे दोन दिवस तापमान वाढण्याचा अंदाज

राज्यातल्या बहुतांश भागात पुढचे दोन दिवस तापमान वाढण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, कोकणात बहुतांश भागात हवामान उष्ण आणि दमट राहण्याची शक्यता आहे. विदर्भात अकोला, अमरावती आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्या...

April 8, 2025 6:54 PM

views 23

येत्या पाच वर्षांत राज्यातल्या सर्वच भागांचा संतुलित विकास झाल्याचं दिसेल-मुख्यमंत्री

येत्या पाच वर्षांत राज्यातल्या सर्वच भागांचा संतुलित विकास झाल्याचं दिसेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी व्यक्त केला आहे. ते आज मुंबईत ‘इंडिया ग्लोबल फोरम नेक्स्ट २५’ या कार्यक्रमात बोलत होते.   राज्यात गुंतवणुकीसाठी विनाअडथळा सुविधा पुरवल्या जात आहेत. राज्याच्या सर्वच भागात गुं...

April 8, 2025 3:38 PM

views 17

वसईमध्ये अंमली पदार्थांसह एका नायजेरियन नागरिकाला अटक

वसईमध्ये वालीव इथे ११ कोटी ५८ लाख रुपयांच्या अंमली पदार्थांसह एका नायजेरियन नागरिकाला अटक करण्यात आली आहे. या अंमली पदार्थांविषयीची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीवरून वालीव इथल्या एका रहिवासी इमारतीवर पोलिसांनी छापे टाकले. या छाप्यातून ११ कोटी ५८ लाख रुपये किमतीचे अंमली पदार्थ जप्त करण्या...

April 8, 2025 3:35 PM

views 18

वर्ध्यात झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातल्या ४ जणांचा मृत्यू

वर्धा जिल्ह्यात तरोडा इथं झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातल्या ४ जणांचा मृत्यू झाला. मरण पावलेले पोलीस कर्मचारी आणि त्यांचं कुटुंब मांडगाव इथून रामनवमी कार्यक्रमाहून परतत होते. वाटेत आलेल्या जनावराला वाचवण्यासाठी गाडी वळवताना नियंत्रण सुटल्यानं ती दुभाजकाला धडकून हा अपघात झाला.

April 8, 2025 3:36 PM

views 39

सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूप्रकरणी न्यायालयीन चौकशीची प्रकाश आंबेडकरांची मागणी

परभणी इथले आंबेडकरी कार्यकर्ते सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कोठडीतल्या मृत्यू प्रकरणी न्यायालयीन चौकशी करावी अशी मागणी याचिकाकर्ते ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी आज औरंगाबाद उच्च न्यायालयात केली. याप्रकरणी एसआयटी नेमावी, ती न्यायालयाच्या देखरेखीखाली असावी, अशी मागणीही आंबेडकर यांनी केली आहे. सीआयडीलाही ...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.