वसईमध्ये वालीव इथे ११ कोटी ५८ लाख रुपयांच्या अंमली पदार्थांसह एका नायजेरियन नागरिकाला अटक करण्यात आली आहे. या अंमली पदार्थांविषयीची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीवरून वालीव इथल्या एका रहिवासी इमारतीवर पोलिसांनी छापे टाकले. या छाप्यातून ११ कोटी ५८ लाख रुपये किमतीचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. या अंमली पदार्थांची पालघर इथे विक्री होणार होती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
Site Admin | April 8, 2025 3:38 PM | Vasai
वसईमध्ये अंमली पदार्थांसह एका नायजेरियन नागरिकाला अटक
