प्रादेशिक बातम्या

April 12, 2025 5:14 PM

views 25

येत्या १४ आणि १५ एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्कीट सहलीचं आयोजन

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त राज्य शासनाच्या पर्यटन विभागाच्या पर्यटन संचालनालयानं येत्या १४ आणि १५ एप्रिलला मुंबई, नाशिक आणि नागपूर इथं डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्कीट सहलीचं आयोजन केलं आहे. पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी आज मुंबई इथं ही माहिती दिली. या टूर सर्की...

April 12, 2025 3:24 PM

views 11

मुंबई विद्यापीठाच्या सागरी अभ्यास केंद्राला ७१ लाख ७४ हजार रुपयांचं अनुदान मंजूर

केंद्राच्या भूविज्ञान मंत्रालयाकडून मुंबई विद्यापीठाच्या सागरी अभ्यास केंद्राला सागरी सूक्ष्मशैवाल जैवसंशोधनासाठी ७१ लाख ७४ हजार रुपयांचं अनुदान मंजूर झालं आहे.    भूविज्ञान मंत्रालयाच्या महत्त्वाकांक्षी ‘डीप ओशन मिशन’ कार्यक्रमांतर्गत सागरी सूक्ष्मशैवालच्या जैवसंशोधनावर आधारित एका महत्त्वाकांक...

April 12, 2025 8:49 PM

views 11

नागपूर जिल्ह्यात उमरेडमध्ये कारखान्यात झालेल्या स्फोटात ५ जणांचा मृत्यू

नागपूर जिल्ह्यात उमरेडमध्ये एका कारखान्यात झालेल्या स्फोटात ५ जणांचा मृत्यू झाला असून ६ जण जखमी झाले आहेत. मृतांच्या नातेवाईकांना कंपनी ५५ लाख रुपये देणार असून राज्य सरकार ५ लाख रुपये देईल, अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेअर बावनकुळे यांनी केली. जखमीच्या नातेवाईकांना कंपनी रोजगार देणार आहे. जखमींना कं...

April 12, 2025 3:17 PM

views 75

देशभरात पोषण पंधरवडा राबवण्यात येत आहे

देशभरात सध्या पोषण पंधरवडा राबवण्यात येत आहे. या अंतर्गत गरोदर तसंच स्तन्यदा माता, आणि बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं सकस आहार पुरवण्यावर भर दिला जात आहे. अहिल्यानगर ग्रामीणचे बालविकास प्रकल्प अधिकारी दीपक म्हेत्रे यांनी याविषयी माहिती दिली. 

April 12, 2025 9:12 PM

views 14

हनुमान जयंती निमित्त देशभरात भक्तिपूर्ण कार्यक्रम

हनुमान जयंती आज सर्वत्र उत्साहात साजरी होत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी हनुमान जयंती निमित्त नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील राज्याच्या नागरिकांना हनुमान जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.    मुंबईत ठिकठिकाणच्या हनुमान मंदिरांमधे दर्शनासाठी भाविकांच...

April 12, 2025 3:31 PM

views 33

तांत्रिक बिघाडामुळे देशभरात युपीआय सेवा विस्कळीत

तांत्रिक बिघाडामुळे देशभरात आज युपीआयच्या सेवा विस्कळीत झाल्यानं कोट्यावधी ग्राहकांची गैरसोय होत आहे.   यामुळं अनेक बँकांच्या ॲपच्या कामावर परिणाम झाला आहे. ही तांत्रिक अडचण दूर करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं कळवलं आहे.    दररोज सरासरी ५९ कोटी व्यवहार यु...

April 11, 2025 8:18 PM

views 13

महाजेनको आणि रशियाच्या रोसातोम यांच्यात सामंजस्य करार

थोरियम अणुभट्टी विकासासाठी मुंबईत सह्याद्री अतिथीगृह इथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाजेनको आणि रशियाच्या रोसातोम या शासकीय कंपनीसह सामंजस्य करार करण्यात आले. महाराष्ट्रात थोरियम रिॲक्टरचे संयुक्त विकास करणं, अणुऊर्जा नियामक मंडळाच्या सुरक्षा निकषांनुसार थोरियम रिॲक्टरचं व्यावसाय...

April 11, 2025 8:42 PM

views 21

मुंबईकरांना एकाच कार्डवरुन सर्व प्रवासी सुविधांचं तिकिट लवकरच काढता येणार

मुंबईतल्या बेस्ट, उपनगरीय रेल्वे, मेट्रो इत्यादी सर्व प्रवासी सेवांचं एकाच माध्यमातून तिकिट देणारं मुंबई वन कार्ड लवकरच सुरू होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत वार्ताहर परिषदेत म्हणाले.   याशिवाय, छत्रपती शिवाजी महार...

April 11, 2025 8:45 PM

views 16

ST कर्मचाऱ्यांच्या पगाराची तारीख निश्चित, ‘या’ दिवशी होणार पगार !

एसटी कर्मचाऱ्यांचा पगार दर महिन्याच्या ७ तारखेला होईल, ही अध्यक्ष म्हणून आपली जबाबदारी असेल, अशी ग्वाही परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. ते आज महामंडळाच्या मुख्यालयात अध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारताना बोलत होते. एसटी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्यात फक्त ५६ टक्के वेतन...

April 11, 2025 7:38 PM

views 16

प्रशांत कोरटकरची कळंबा कारागृहातून सुटका

इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना फोनवरून धमकी देणारा प्रशांत कोरटकर याची कळंबा कारागृहातून आज सुटका झाली. न्यायालयानं अटी-शर्तीसह ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर कोरटकरचा जामीन मंजूर केला होता. मात्र कागदपत्रांची पुर्तता न झाल्यानं त्याचा कारागृहातील दोन दिवस मुक्काम वाढला होता. अखेर आज कडक पोलिस...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.