प्रादेशिक बातम्या

March 31, 2025 7:54 PM March 31, 2025 7:54 PM

views 8

म्हाडातर्फे येत्या आर्थिक वर्षात १९ हजार ४९७ सदनिका बांधण्याचं उद्दीष्ट

'म्हाडा', अर्थात महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणानं वर्ष २०२५-२०२६ च्या अर्थसंकल्पात १९ हजार ४९७ सदनिकांचं बांधकाम करण्याचं उद्दीष्ट ठेवलं आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात ९ हजार २०२ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. सुमारे १५ हजार ९५७ कोटी रुपयांचा हा अर्थसंकल्प मंजूर झाला असून, वर्ष २०२४-२५...

March 31, 2025 7:45 PM March 31, 2025 7:45 PM

views 12

नागपुरात भारती कृष्ण विद्या विहार इथं वैदिक गणिताचं गुणवत्ता केंद्र उभारलं जावं-मुख्यमंत्री

नागपुरात भारती कृष्ण विद्या विहार इथं वैदिक गणिताचं गुणवत्ता केंद्र उभारलं जावं, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी व्यक्त केली आहे. त्यासाठी राज्य शासन संपूर्ण सहकार्य देईल, असं आश्वासनही त्यानी दिलं. ते आज भारती कृष्ण विद्या विहार शाळेत शंकराचार्य कृष्ण तीर्थ महाराज लिखित वैदिक गणिताच्य...

March 31, 2025 6:13 PM March 31, 2025 6:13 PM

views 11

मुंबई होणाऱ्या वेव्ह परिषदेच्या दरम्यान वेव्हज बाजाराचही आयोजन

मुंबई होणाऱ्या वेव्ह परिषदेच्या दरम्यान वेव्हज बाजाराचही आयोजन केलं जाणार आहे. यात चित्रपट, टीव्ही, Animation, VFX, Gaming, and Comics यासारख्या क्षेत्रातले दिग्गज एकत्र येणार आहेत. यात भागिदारी, व्यवसाय विस्तार यासारख्या गोष्टींवर चर्चा होईल. त्यासाठी प्रक्षेपण व्यवस्था, खरेदीदार - विक्रेते यांच्या...

March 31, 2025 3:45 PM March 31, 2025 3:45 PM

views 21

अपघातग्रस्तांना वैद्यकीय विम्या अंतर्गत मिळालेले पैसे वजा करता येणार नाहीत – मुंबई उच्च न्यायालय

मोटार वाहन कायद्याअंतर्गत अपघातग्रस्तांना मिळणाऱ्या भरपाईतून वैद्यकीय विम्या अंतर्गत मिळालेले पैसे वजा करता येणार नाहीत, असं मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलं आहे. विमा कंपनीसोबत केलेल्या करारानुसार त्या व्यक्तीला वैद्यकीय विम्या अंतर्गत रक्कम मिळते असं न्यायालयाने सांगितलं. न्यायमूर्ती ए एस चांदुरकर, म...

March 31, 2025 3:12 PM March 31, 2025 3:12 PM

views 7

मशिदीत स्फोट घडवणाऱ्या आरोपींवर UAPA कायदा लागू करण्याची जलील यांची मागणी

बीड जिल्ह्यात मशिदीत स्फोट घडवल्याचा आरोप असलेल्या दोन्ही आरोपीवर यूएपीए कायदा लागू करावा, अशी मागणी माजी खासदार इम्तियाज़ जलील यांनी केली आहे. छत्रपती संभाजीनगर इथे रमजान ईदच्या नमाजानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. काल पहाटे गेवराई तालुक्यातल्या अर्ध मसला गावात हा स्फोट झाला.  पोलिसांनी याप्रकरणी दो...

March 31, 2025 2:41 PM March 31, 2025 2:41 PM

views 7

अर्थसंकल्पातल्या तरतुदीपेक्षा जास्त झालेल्या वाढीचा स्पष्ट उल्लेख करण्याचे मुख्य सचिवांचे निर्देश

महाराष्ट्रात राज्य शासनाच्या सर्व विभागांनी राज्य मंत्रिमंडळासमोर नवा प्रस्ताव ठेवताना खर्चात अर्थसंकल्पातल्या तरतुदीपेक्षा जास्त झालेल्या वाढीचा स्पष्ट उल्लेख करण्याचे निर्देश राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी दिले आहेत. नवीन प्रस्तावात खर्चात झालेली वाढ यामुळे स्पष्टपणे लक्षात येईल, तसंच त्...

March 31, 2025 9:08 PM March 31, 2025 9:08 PM

views 13

औरंगजेबाच्या कबरीचं उदात्तीकरण करू दिलं जाणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुगल शासक औरंगजेबाची कबर हे संरक्षित स्मारक आहे, मात्र त्याचं उदात्तीकरण करू दिलं जाणार नाही, असं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. ते आज नागपुरात वार्ताहरांशी बोलत होते. कुणाला आवडो की न आवडो औरंगजेबाची कबर हे संरक्षित स्मारक आहे, असं फडणवीस म्हणाले. छत्रपती संभाजीनगर जिल...

March 31, 2025 1:17 PM March 31, 2025 1:17 PM

views 6

मुंबई विमानतळावर प्रवाशाकडून ३ किलो गांजा जप्त

मुंबई विमानतळावर सीमाशुल्क विभागाने बँकॉकवरून येणाऱ्या एका प्रवाशाकडून ३ किलो गांजा जप्त केला आहे. आरोपी केरळचा रहिवासी असून हा गांजा त्याला बेंगळुरूमध्ये मुख्य तस्कराकडे पोहोचवायचा होता. त्या बदल्यात त्याला प्रतिग्रॅम दीड लाख रुपये मिळणार असल्याचं त्याने चौकशीत कबूल केलं.

March 31, 2025 1:14 PM March 31, 2025 1:14 PM

views 25

‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज

भारतीय हवामानशास्त्र विभागाने पुढील 4 दिवसांत महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये वादळ, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. हवामान संस्थेने 1 ते 3 एप्रिल दरम्यान पश्चिम मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, केरळ, माहे, किनारी आंध्र प्रदेश, यानम, रायलसीमा,...

March 30, 2025 9:02 PM March 30, 2025 9:02 PM

views 7

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्यात नवीन ८६ हजार ८१४ वाहनांची नोंदणी

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्यात नवीन ८६ हजार ८१४ वाहनांची नोंदणी झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ३० टक्के वाढ झाली आहे.  यावर्षी  २२ हजार ८१ चार चाकी वाहनांची नोंदणी झाली आहे. ही वाढ सुमारे २८ टक्के आहे. तर ५१ हजार ७५६ नवीन दुचाकी वाहनांची खरेदी नागरिकांनी केली आहे. दुचाकी वाहनांच्या खरेदी...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.