प्रादेशिक बातम्या

March 30, 2025 8:54 PM March 30, 2025 8:54 PM

views 22

शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्नशील -माणिकराव कोकाटे

शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या समस्यांचा अभ्यास करून त्या सोडवण्याचं आश्वासन कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिलं आहे. ते आज नाशिक जिल्ह्यात वावी इथल्या जामनदी खोरे शेतकरी उत्पादक कंपनीच्या १ हजार टन क्षमतेच्या गोदामाच्या बांधकामाचा प्रारंभ करताना बोलत होते.    शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी राज्य...

March 30, 2025 3:31 PM March 30, 2025 3:31 PM

views 13

लातूर पोलिसदलातर्फे मॅरेथॉनचं आयोजन

लातूर पोलिसदलाने आज आयोजित केलेल्या एक धाव सायबर सुरक्षेसाठी या मॅरेथॉनमध्ये महाराष्ट्रातल्या धावपटूंनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.  लातूर जिल्हा क्रीडा संकुलातून तीन किलोमीटर, पाच किलोमीटर  आणि दहा किलोमीटर अशा तीन गटातल्या या दौडीत शालेय विद्यार्थ्यापासून वृद्धांनी  सहभाग नोंदवला. सायबर गुन्हेगारी म...

March 30, 2025 3:31 PM March 30, 2025 3:31 PM

views 16

बीडमध्ये मशिदीत स्फोट

बीड जिल्ह्यात अर्ध मसला गावातल्या मशिदीत आज पहाटे स्फोट झाला. जिलेटीनच्या कांड्यांमुळे हा स्फोट झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या स्फोटात कोणीही जखमी झालेलं नाही मात्र मशिदीच्या आतल्या भागाचं नुकसान झालं आहे. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. या घटनेमुळे गावात तणाव नि...

March 30, 2025 3:13 PM March 30, 2025 3:13 PM

views 7

गुढीपाडव्याचा सर्वत्र उत्साह

वर्षप्रतिपदा, अर्थात गुढी पाडव्याचा सण सर्वत्र उत्साहात साजरा होत आहे. रेशमी वस्त्र, कडुनिंब आणि साखरेच्या गाठ्यांच्या माळांनी सजवलेली गुढी घरोघरी उभारुन, तिची पूजा करुन तसंच रांगोळ्या, झेंडूच्या फुलांच्या तोरणांनी सजावट करण्यात आली आहे. राज्यात काही ठिकाणी कडुनिंबाची पानं आणि गूळाचा प्रसाद खाल्ला ज...

March 30, 2025 1:58 PM March 30, 2025 1:58 PM

views 11

नागपुरात प्रधानमंत्र्यांच्या हस्ते माधव नेत्रालयाच्या प्रीमियम सेंटरचं भूमिपूजन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नागपूर इथल्या माधव नेत्रालयाच्या प्रीमियम सेंटरचं भूमिपूजन झालं. नागपुरात माधव नेत्रालय गोळवलकर गुरूजी यांच्या आदर्शानुसार लाखो लोकांची सेवा करत असून नागपुरात आज आपण एका पुण्यसंकल्पाचे साक्षीदार बनत आहोत, असं यावेळी ते म्हणाले. देशवासियांना चांगल्या आरोग्य ...

March 29, 2025 7:51 PM March 29, 2025 7:51 PM

views 12

तुळजापूर मंदिर विकास आराखड्याला शासनाची तत्वतः मान्यता

तुळजापूर मंदिर विकास आराखड्याला शासनाने तत्वतः मान्यता दिली असून महत्वाच्या कामांसाठी तातडीनं निधी वितरित केला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी आज तुळजापूर विकास आराखड्याचा आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. या आराखड्याची दोन वर्षांत अंमलबजावणी व्हावी, असे न...

March 29, 2025 7:49 PM March 29, 2025 7:49 PM

views 15

पंढरपुरातल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या जिर्णोद्धाराचं काम आषाढीपर्यंत पूर्ण करणार-मुख्यमंत्री

पंढरपुरातल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या जिर्णोद्धाराचं काम आषाढी एकादशीपर्यंत पूर्ण करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.  श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्णन विकास आराखड्या अंतर्गत सुरू असलेल्या कामाची पाहणी मुख्यमंत्र्यांनी आज केली, त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. पंढरपूर ...

March 29, 2025 7:42 PM March 29, 2025 7:42 PM

views 14

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या नागपूर दौऱ्यावर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गुढीपाडव्यानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. रेशीमबागेतल्या स्मृती मंदिरात ते डॉ केशव बळिराम हेडगेवार यांना आदरांजली वाहतील. त्यानंतर दीक्षाभूमीलाही भेट देऊन ते आदरांजली वाहणार आहेत. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते नागपूरम...

March 29, 2025 7:38 PM March 29, 2025 7:38 PM

views 6

येत्या १ ते ४ एप्रिल दरम्यान संपूर्ण राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता

येत्या दोन दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून, विदर्भात हवामान कोरडं राहील  असा अंदाज आहे.   येत्या १ ते ४ एप्रिल दरम्यान संपूर्ण राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता असून, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी सोसाट्याचे वारे ...

March 29, 2025 7:34 PM March 29, 2025 7:34 PM

views 12

IPL वर सट्टा लावणाऱ्या ५ जणांना जालन्यातून अटक

जालना जिल्ह्यात आयपीएल क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावणारे ४ बुकी आणि एका सट्टेबाजाला चंदनझिरा पोलिसांनी आज अटक केली. आयपीएल मध्ये चेन्नई सुपर किंग्ज विरुध्द रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातल्या सामन्यावर सट्टा लावल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.  पोलिसांनी या कारवाईत  मोबाईल, लॅपटॉप आणि इतर साहित्यासह एकूण...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.