प्रादेशिक बातम्या

April 23, 2025 4:51 PM April 23, 2025 4:51 PM

views 14

मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्याल शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश नोंदणी सुरू

मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयं, स्वायत्त महाविद्यालयं, मान्यताप्राप्त संस्थांमधे २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठीय पदवी अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी सुरू झाली आहे.   मुंबई विद्यापीठाच्या https://mu.ac.in/admission  या संकेतस्थळावर ही नोंदणी करता येईल. पदवी परीक्षांचे नि...

April 23, 2025 3:48 PM April 23, 2025 3:48 PM

views 14

पहलगाम हल्ल्यानंतर राज्यातल्या पर्यटकांना सुरक्षित परत आणण्याला सर्वोच्च प्राधान्य असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही

पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात राज्यातल्या एकूण ६ पर्यटकांचा मृत्यू झाला असून त्यांचे मृतदेह राज्यात परत आणण्यात येत आहेत. मृतांच्या कुटुंबांना राज्यशासनानं प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. काश्मीरमधे अडकलेल्या पर्यटकांना सुखरुप राज्यात परत आणण्याला शासनाचं प्राधान्य राहील असं आश्...

April 23, 2025 1:48 PM April 23, 2025 1:48 PM

views 14

हलगाम हल्ल्यात २७ जणांचा मृत्यू तर १६ जण जखमी

काश्मीरमधे पहलगाम इथं काल झालेल्या दहशतवादी हल्ल्याबद्दल सर्वत्र तीव्र निषेधाची लाट उमटली आहे. या हल्ल्यात आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार २७ जणांचा बळी गेला असून त्यातले बहुसंख्य पर्यटक होते. महाराष्ट्रातल्या ६ पर्यटकांचा या हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. जम्मू काश्मीर सरकारने मृतां...

April 23, 2025 11:12 AM April 23, 2025 11:12 AM

views 13

पिण्याचं पाणी जपून वापरण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण तसंच शहरी भागातल्या लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये यासाठी पुढचे दोन महिने पिण्याचं पाणी जपून वापरा, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. शिंदे यांनी राज्यातल्या पाण्याच्या स्थितीबाबत सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख...

April 22, 2025 9:08 PM April 22, 2025 9:08 PM

views 9

मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा द्यायला मंत्रिमंडळात मान्यता

केंद्रीय कामगार संहितेच्या अनुषंगानं राज्यातल्या कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी तयार केलेल्या महाराष्ट्र कामगार संहिता नियमांना आज राज्य सरकारनं मंजुरी दिली. मुंबईत आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला. केंद्र सरकारने २९ कामगार कायद्यांचं एकत्रिकरण करून चार कामगार संहिता तयार ...

April 22, 2025 9:00 PM April 22, 2025 9:00 PM

views 10

पहिली ते पाचवीसाठी हिंदी भाषा अनिवार्य ऐवजी ऐच्छिक-दादाजी भूसे

राज्यातल्या पहिली ते पाचवीच्या मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये हिंदी भाषा अनिवार्य नव्हे तर ऐच्छिक करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. यासंदर्भात तज्ञांशी चर्चा करुन लवकरच शासन निर्णय जारी केला जाईल, अशी माहिती शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी मंत्रालयात झालेल्या वार्ताहर परिषदेत दिली....

April 22, 2025 6:54 PM April 22, 2025 6:54 PM

views 9

काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश

काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी आज मुंबईत आपल्या कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.   भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचं पक्षात स्वागत केलं.

April 22, 2025 6:44 PM April 22, 2025 6:44 PM

views 51

साक्षी कांबळे आत्महत्या प्रकरणी उपसभापती नीलम गोऱ्हेंची कांबळे कुटुंबीयांना भेट

बीड इथं साक्षी कांबळे आत्महत्या प्रकरणात विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी कांबळे कुटुंबाची भेट घेतली.   या भेटीनंतर गोऱ्हे यांनी जिल्हा आणि पोलीस प्रशासनाचा आढावा घेत सूचना केल्या. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांबरोबर घेतलेल्य बैठकीत छेडछाडीच्या घटना रोखण्यासाठी स्थानिक पातळीवर उपाय...

April 22, 2025 3:35 PM April 22, 2025 3:35 PM

views 4

रुह आफजाला शरबत जिहाद म्हणणारे चित्रफिती माध्यमावरून काढून टाकण्याची रामदेव बाबा यांची कबूली

हमदर्द या कंपनीच्या रुह आफजा या शितपेयाला शरबत जिहाद म्हणणाऱ्या चित्रफिती समाजमाध्यमावरून काढून टाकण्याचं पतंजली उद्योग समूहाचे संस्थापक रामदेव बाबा यांनी दिल्ली उच्च न्यायालयासमोर मान्य केलं आहे.   हमदर्द कंपनीने या चित्रफितींच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी न्यायमूर्ती अमित बन्सल...

April 22, 2025 3:14 PM April 22, 2025 3:14 PM

views 15

भंडारा जिल्ह्यात २ गाड्यांची टक्कर होऊन झालेल्या अपघातात ४ जणांचा मृत्यू

भंडारा जिल्ह्यात पाथरी इथं काल रात्री एक दुचाकी आणि चारचाकी गाडीची टक्कर होऊन झालेल्या अपघातात ४ जण मृत्युमुखी पडले. या प्रकरणी पोलिसांनी एका व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे.