प्रादेशिक बातम्या

May 13, 2025 9:35 AM May 13, 2025 9:35 AM

views 10

दहावीचा निकाल आज जाहीर होणार

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं मार्च २०२५ मध्ये घेतलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल, आज दुपारी १ वाजता जाहीर होणार आहे, असं मंडळाच्या अधिकृत पत्रकात म्हटलं आहे. विद्यार्थ्यांना त्यांचे विषयनिहाय गुण, मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर पाहता येतील.

May 12, 2025 6:57 PM May 12, 2025 6:57 PM

views 10

राज्यात अवकाळी पाऊस

राज्यात आज विविध ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली. बीड शहरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला. पावसामुळे, पाेलिसांसाठी नव्यानं बांधलेल्या इमातीतल्या घरांच्या खिडक्या निखळल्या. जालना शहरासह जिल्ह्यातही हलक्या स्वरुपाचा पाऊस पडला. कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातही आज दुपारच्या सुमाराला अवकाळी पावसाच्या ज...

May 12, 2025 6:30 PM May 12, 2025 6:30 PM

views 8

सहकार कायद्यात काळानुरूप बदल करण्यासाठी समिती स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

सहकार कायद्यात काळानुरूप बदल करण्यासाठी समिती स्थापन करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज केली. ते मुंबईत, सहकाराचं सक्षमीकरण आणि शासनाचं धोरण या विषयावर आयोजित परिसंवादात बोलत होते. सहकार चळवळीचं सिंहावलोकन करुन त्या माध्यमातून ग्रामीण अर्थकारण अधिक प्रगतिशील करण्यासाठी आणि साम...

May 12, 2025 3:34 PM May 12, 2025 3:34 PM

views 2

गोपाळ कृष्ण गोखले पुलाचं पालकमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबईत अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या, नव्यानं बांधण्यात आलेल्या  गोपाळ कृष्ण गोखले पुलाचं काल मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते उद्घाटन झालं.    अभियांत्रिकी आव्हानांना न जुमानता विक्रमी वेळेत पूर्ण झालेला हा पूल वाहतूक कोंडी कमी करेल. हा पूल  नियोजित तारखेच्या ए...

May 12, 2025 3:26 PM May 12, 2025 3:26 PM

views 6

पालघर जिल्ह्यात आवास प्लस २०२४ सर्वेक्षण सध्या वेगानं सुरू

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा २ अंतर्गत पात्र कुटुंबांची निवड करण्यासाठी पालघर जिल्ह्यात आवास प्लस २०२४ सर्वेक्षण सध्या वेगानं सुरू आहे. जिल्ह्यात ४ मे पर्यंत, ११ हजार ४६५ कुटुंबांचं सर्वेक्षण पूर्ण झालं, अशी माहिती प्रकल्प संचालकांनी दिली.   ग्रामीण भागातल्या घर नसलेल्या किंवा कच्च्या ...

May 12, 2025 3:24 PM May 12, 2025 3:24 PM

views 8

राज्य सरकार संरक्षण दलांसोबत अधिक समन्वयानं काम करेल- मुखमंत्री

भारतीय सैन्याने ज्या ताकदीनं आणि अचूकतेनं ऑपरेशन सिंदूर राबवलं ते अभूतपूर्व असून राज्य सरकार संरक्षण दलांसोबत अधिक समन्वयानं काम करेल, असं मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. भारत आणि पाकिस्तान दरम्यानच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण दल आणि राज्य सरकार यांची संयुक्त बैठक आज वर्षा या निवा...

May 12, 2025 2:28 PM May 12, 2025 2:28 PM

views 11

गडचिरोली जिल्ह्यातील नक्षली शिबिरं उद्ध्वस्त

गडचिरोली जिल्ह्यात महाराष्ट्र आणि छत्तीसगड जिल्ह्याच्या सीमेवर पोलीस आणि नक्षलवाद्यांमधे आज चकमक झाली. या चकमकीत काही नक्षलवादी ठार आणि जखमी  झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. पोलिसांनी नक्षली शिबिरं उद्ध्वस्त केली असून त्यांच्याकडील बंदुका आणि अन्य साहित्य ताब्यात घेतलं आहे. 

May 11, 2025 7:31 PM May 11, 2025 7:31 PM

views 3

११वी प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन आणि केंद्रीय पद्धतीने होणार

राज्यात यंदा अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन आणि केंद्रीय पद्धतीने होणार आहे. येत्या ११ ऑगस्टपासून महाविद्यालये सुरू होणार असून, १५ ऑगस्टपर्यंत प्रवेशाचे सर्व टप्पे पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागाचे संचालक संपत सूर्यवंशी यांनी दिली.   प्रवेश प्रक्रियेदरम्य...

May 11, 2025 8:47 PM May 11, 2025 8:47 PM

views 56

राष्ट्रीय लोक अदालत उपक्रमात ठाणे जिल्हा प्रथम स्थानी

प्रलंबित खटल्यांच्या जलद निवारणासाठी आयोजित केल्या जाणाऱ्या राष्ट्रीय लोक अदालत उपक्रमात ठाणे जिल्ह्यानं प्रथम क्रमांक पटकावला आहे. यावर्षी दुसऱ्यांदा आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीत ठाणे जिल्हा न्यायालयात एकूण ९८ हजार ८९९ प्रकरणं मार्गी लागली तर एक अब्ज १२ कोटींहून अधिक रुपयांच्या प्रकरणांमध्...

May 11, 2025 3:33 PM May 11, 2025 3:33 PM

views 10

राजकोट किल्ल्यावर उभारलेल्या शिवरायांच्या पुतळ्याचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजन

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण इथे राजकोट किल्ल्यावर उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूजन केलं. या सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार नारायण राणे, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. शिवरायांचा पु...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.