प्रादेशिक बातम्या

July 16, 2025 3:28 PM

views 27

शेतकऱ्यांना सौर वीज घेण्याची सक्ती नाही- देवेंद्र फडणवीस

शेजारी राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात वीज दर कमी असून शेतकऱ्यांना सौर वीज घेण्याची सक्ती नाही मात्र, त्यांच्या सौर ऊर्जेशी संबंधित अडचणी समजून घेऊन त्यावर प्राधान्याने उपाय शोधले जात आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात प्रश्नोत्तराच्या तासाला दिली.   वीज दरवाढीचा प्रश्न...

July 16, 2025 3:20 PM

views 26

मुंबईत उपनगरी रेल्वे गाडीतून प्रवास करताना गेल्या 3 वर्षांत साडेसातहजारांहून अधिक नागरीकांचा मृत्यू  

मुंबईत उपनगरी रेल्वे गाडीतून प्रवास करताना गेल्या तीन वर्षांत साडेसातहजार पेक्षा जास्त जणांचा जीव गेला असून सुमारे ७ हजार३०० जण जखमी झाले असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधानसभेत दिली. गेल्या महिन्यात मुंब्रा-कळवा स्थानकांदरम्यान दोन लोकलमधले प्रवासी एकमेकांना धडकून झालेल्या अप...

July 16, 2025 3:10 PM

views 51

शिवसेना आणि रिपब्लिकन सेनेची युती जाहीर

शिवसेना आणि रिपब्लिकन सेनेची युती झाल्याची घोषणा शिवसेना नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी आज केली.   मुंबई इथे झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत या युतीची घोषणा करण्यात आली. गेल्या अडीच वर्षांत सामान्य माणसासाठी तसंच गोरगरीब, शोषित आणि वंचितां...

July 16, 2025 3:07 PM

views 32

तेलंगण सीमा भागातली वादग्रस्त १४ गावं लवकरच चंद्रपूर जिल्ह्यात समाविष्ट होणार

महाराष्ट्र-तेलंगणा सीमावादात अडकलेली  जिवती तालुक्यातील १४ मराठी गावं  लवकरच महाराष्ट्रात समाविष्ट होणार आहेत. ही  १४ गावं चंद्रपूर जिल्ह्यात येणार असून  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत , यावर अंतिम निर्णय लवकरच घेण्यात येईल, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकु...

July 16, 2025 2:55 PM

views 26

निरोगी जीवनशैलीसाठी तेल मंडळाची स्थापना करण्याचे आदेश

सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने शाळांना विद्यार्थ्यांच्या निरोगी जीवनशैलीला चालना देण्यासाठी तेल मंडळाची स्थापना करण्याचे आदेश दिले आहेत.   पौष्टिक अन्न आणि व्यायामावर भर देणारे उपक्रम यांच्यावर भर देण्याचे निर्देशही सीबीएसईने शाळांना लिहिलेल्या पत्रात दिले आहेत. तसंच, शाळांमध्य...

July 16, 2025 1:08 PM

views 23

लोकमान्य टिळक यांचे पणतू डॉ. दीपक टिळक यांचं निधन

लोकमान्य टिळक यांचे पणतू, 'केसरी'चे विश्वस्त संपादक आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती डॉ. दीपक टिळक यांचं आज पहाटे पुण्यात निधन झालं, ते ७२ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत.    दीपक टिळक यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,...

July 15, 2025 7:40 PM

views 13

चाकरमान्यांसाठी खुशखबर ! गणेशोत्सवासाठी जादा गाड्या सुटणार

गणपती उत्सवाकरता कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी यंदा राज्यपरिवहन महामंडळ पाच हजार  जादा  गाड्या सोडणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज मुंबईत ही माहिती दिली. गणपती उत्सवाच्या अनुषंगाने मंत्रालयात  बोलावलेल्या बैठकीत बोलत होते.    २३ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर दरम्यान मुंबई, ठाणे, प...

July 15, 2025 7:40 PM

views 136

राष्ट्रवादी काँग्रेस शरद्चंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून विधानपरिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांची निवड आज करण्यात आली. आता ते जयंत पाटील यांची जागा घेतील. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, जयंत पाटील, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड यांच्यासह इतर महत्त्वाच्या नेत्यांची मुंबईत बैठक झाली, त्यात हा निर्णय घ...

July 15, 2025 7:41 PM

views 28

राज्याच्या विविध भागात पावसाचा जोर

राज्याच्या विविध भागात आज सकाळपासून पावसानं जोर धरला असून अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबई आणि उपनगरात आज सकाळपासून दमदार पावसानं हजेरी लावली.    रत्नागिरीच्या खेड तालुक्यात मुंबई-गोवा महामार्गावर कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कशेडी घाटात दरड कोसळून वाहतूक कोंडी झाली असून,...

July 15, 2025 7:41 PM

views 18

‘महाराष्ट्र’ हे देशातलं सर्वात मोठं इलेक्ट्रिक वाहन उत्पादन क्षमता असलेलं राज्य ठरेल – मुख्यमंत्री

महाराष्ट्र हे देशातलं सर्वात मोठं इलेक्ट्रिक वाहन उत्पादन क्षमता असलेलं राज्य ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज व्यक्त केला. प्रसिद्ध इलेक्ट्रिक कार निर्माता कंपनी टेस्लाने भारतीय बाजारात प्रवेश केला असून मुंबईत त्यांच्या पहिल्या सेंटरचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज झालं, ...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.