प्रादेशिक बातम्या

June 24, 2025 7:25 PM June 24, 2025 7:25 PM

views 4

धोरण, संशोधन, आणि उद्योग यांना जोडण्यात IIM मुंबईची महत्त्वाची भूमिका-जितेंद्र सिंह

२०४७ पर्यंत भारत विकसित भारतासाठी नवोन्मेष हा एक प्रमुख कणा असून त्यासाठी धोरण, संशोधन, आणि उद्योग यांना जोडण्यात आय़आय़एम मुंबईची महत्त्वाची भूमिका असल्याचं केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान, पृथ्वी विज्ञान राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी आज म्हटलं आहे. आयआयएम मुंबई इथं आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते...

June 24, 2025 6:41 PM June 24, 2025 6:41 PM

views 12

संतोष देशमुख हत्याप्रकरणी पुढची सुनावणी ७ जुलैला

बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग इथले सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी आज बीड इथल्या न्यायालयात सुनावणी झाली. वाल्मिक कराडचा संतोष देशमुख यांच्या हत्येत सहभाग नाही असा युक्तीवाद त्याच्या वकिलाने न्यायालयात केला. त्याला विशेष सरकारी वकिल उज्ज्वल निकम यांनी विरोध केला. न्यायालयाने आज दोन्ही बाजूंचे युक्तीवाद...

June 24, 2025 5:36 PM June 24, 2025 5:36 PM

views 38

नाशिक आणि पुणे घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट

पुढचे दोन दिवस पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग आणि नंदूरबार जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता असून हवामान विभागानं या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसंच नाशिक आणि पुणे घाटमाथ्यावर अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केला आहे. तर कोल्हापूर आणि सातारा...

June 24, 2025 5:36 PM June 24, 2025 5:36 PM

views 10

लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार जाहीर

पत्रकारितेच्या क्षेत्रातल्या उत्कृष्ट कार्यासाठी राज्य शासनाच्या वतीने दिले जाणारे २०२१ ते २०२३ या तीन वर्षांसाठीचे पुरस्कार जाहीर झाले आहे. यामध्ये पाच ज्येष्ठ पत्रकारांना लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला आहे.   राही भिडे, सुधीर पाठक, भाऊ तोरसेकर, विजय बाविस्कर आणि बाळासाह...

June 24, 2025 3:22 PM June 24, 2025 3:22 PM

views 18

धाराशिव जिल्ह्यातल्या ७२० गावांमधे स्वच्छता सर्वेक्षण होणार

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत धाराशिव जिल्ह्यातल्या ७२० गावांमधे स्वच्छता सर्वेक्षण होणार आहे. यामधे गावांमधल्या स्वच्छतेची पाहणी केली जाणार आहे. यात वैयक्तिक आणि सार्वजनिक शौचालयांचा वापर, दृश्यमान स्वच्छता, ओला-सुका कचरा वर्गीकरण, कचरा व्यवस्थापन, घनककचरा आणि सांडपाणी  व्यवस्थापन, खतखड्डे, प्लास्टिक सं...

June 24, 2025 1:10 PM June 24, 2025 1:10 PM

views 3

त्रिभाषा सूत्रासंदर्भात चर्चा करुनच अंतिम निर्णय घेतला जाईल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

त्रिभाषा सूत्रासंदर्भात साहित्यिक, भाषा तज्ञ, राजकीय नेते आणि इतरही सर्व संबंधितांशी चर्चा करुनच अंतिम निर्णय घेतला जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. याबाबतीत काल रात्री मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी काल रात्री बैठक झाली, त्या बैठकीत ते बोलत होते. या विषयावर सांगोपांग ...

June 24, 2025 3:36 PM June 24, 2025 3:36 PM

views 10

अंदाज समित्यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित राष्ट्रीय परिषदेचा समारोप

केंद्र आणि राज्य सरकारकडून कल्याणकारी योजनांवर होणारा खर्च वाढत असल्याने संसद आणि विधिमंडळाच्या अंदाज समित्यांची जबाबदारी वाढली असून या समित्यांनी अधिक कार्यक्षमतेने जबाबदारीचं पालन करावं असं आवाहन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज मुंबईत विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात केलं. अंदाज समित्यांच्या ...

June 23, 2025 8:39 PM June 23, 2025 8:39 PM

views 22

अंदाज समित्यांनी दिलेल्या शिफारसींमुळे प्रशासनाला योग्य दिशा मिळते – लोकसभेचे सभापती ओम बिर्ला

सरकारची धोरणं, योजना आणि कृतींवर अंदाज समित्यांनी दिलेल्या शिफारसींमुळे प्रशासनाला योग्य दिशा मिळत असल्याचं प्रतिपादन लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी केलं. ते आज मुंबईत राष्ट्रीय अंदाज समितीच्या कार्यारंभाला ७५ वर्षं पूर्ण होत असल्यानिमित्ताने विधान भवनात आयोजित दोन दिवसीय परिषदेच्या उद्घाटनावेळी बो...

June 23, 2025 7:02 PM June 23, 2025 7:02 PM

views 6

आषाढीवारी स्वच्छ आणि सुंदर करण्यावर प्रशासनानं भर

आषाढीवारी स्वच्छ आणि सुंदर करण्यावर प्रशासनानं भर दिला असून वारकऱ्यांना मुलभूत सेवा सुविधा आणि आरोग्य सेवा देण्याची तयारी प्रशासनानं केली आहे. जिल्हा प्रशासनं यंदा वारीसाठी जवळपास ११ हजार टॉयलेट उभारणार आहे. तर महिला वारकऱ्यांना स्नान करण्यासाठी जवळपास दीड हजार स्नानगृहे उभारण्यात येणार आहेत. तसंच ग...

June 23, 2025 3:41 PM June 23, 2025 3:41 PM

views 10

गोरेगाव फिल्मसिटी कॉम्प्लेक्समध्ये आग

मुंबईत गोरेगाव इथं व्हिसलिंग वुड्स इंटरनॅशनल फिल्म सिटी कॉम्प्लेक्समध्ये आज सकाळी आग लागली. अनुपमा स्टुडिओच्या ५ हजार चौरस फूट परिसरात लागलेल्या या आगीत इलेक्ट्रिक वायरिंग, इलेक्ट्रिक इन्स्टॉलेशन, कॅमेरे, स्टुडिओ उपकरणं, सजावटीचं साहित्य, पोशाख, प्रकाश व्यवस्था, आदी सामानाचं नुकसान झालं.    अग्...