प्रादेशिक बातम्या

July 7, 2025 7:42 PM July 7, 2025 7:42 PM

views 8

राज्यात लवकरच मेगा भर्ती प्रक्रिया सुरू करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

राज्यात लवकरच मेगा भर्ती प्रक्रिया सुरू करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज विधानसभेत केली. यासंदर्भातल्या एका लक्षवेधी सूचनेवर ते उत्तर देत होते. राज्य सरकारनं सत्तर हजार जागांची भर्ती जाहीर केली होती मात्र प्रत्यक्षात ती एक लाखाच्या वर पोहोचली आहे. आता १५० दिवसांच्या कार्यक्रमात सर...

July 7, 2025 3:15 PM July 7, 2025 3:15 PM

views 17

महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सहकार पॅनेलचे उमेदवार घोषित

महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या २०२५-३० या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सहकार पॅनेलनं आपले उमेदवार घोषित केले आहेत. आमदार प्रविण दरेकर, राज्य सहकारी संघाचे नेते संजय कुसाळकर आणि शिवाजीराव नलावडे या पॅनलचं नेतृत्व करत आहेत. मतदान होण्यापूर्वीच या पॅनेलचे प्रविण दरेकर, गुलाबराव मगर आणि प्रकाश दरेकर हे उमे...

July 7, 2025 3:05 PM July 7, 2025 3:05 PM

views 9

छत्रपती संभाजीनगरमध्ये शाळा आणि प्राथमिक आरोग्य केंद्र बांधकाम प्रकरणाची चौकशी होणार

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मौजे लासूर इथे शाळा बांधकाम आणि मौजे गुरुधानोरा इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्र बांधकाम प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी पुढच्या दोन महिन्यात करण्यात येईल आणि तथ्य आढळल्यास त्यावर कारवाई होईल अशी माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या त...

July 7, 2025 8:17 PM July 7, 2025 8:17 PM

views 14

तांदळाच्या खरेदी आणि वितरणात भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश

महाराष्ट्रात शिधापत्रिकेवर मिळणाऱ्या तांदळाच्या खरेदी आणि वितरणात भ्रष्टाचार होत असल्याच्या आरोपाची चौकशी करून अधिवेशन संपण्यापूर्वी तो अहवाल सादर करावा असा आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज केली. काँग्रेसच्या नाना पटोले यांनी काही दिवसांपूर्वी हा आरोप केला होता. त्यावरच्या प्रश्नादरम्या...

July 7, 2025 3:29 PM July 7, 2025 3:29 PM

views 14

राज्यात नद्यांच्या पाणीपातळीत वाढ

राज्यात अनेक भागांत जोरदार पाऊस सुरु असून, अनेक धरणांमध्ये पाणी पातळीत वाढ होत आहे. मुंबई शहराची तहान भागवणारं वैतरणा धरण ९५ टक्के भरलं असून, धरणातून विसर्ग सुरू आहे.   पालघर, कोल्हापूर, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये पाऊस होत असून त्यादृष्टीनं प्रशासन सतर्क आहे. पालघर जिल्ह्यात संततधार पा...

July 7, 2025 2:29 PM July 7, 2025 2:29 PM

views 15

CSMI विमानतळावर जप्तीच्या प्रकरणात चौघांना अटक

मुंबई सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर जप्तीच्या तीन मोठ्या प्रकरणांमध्ये चार जणांना अटक केली. जप्तीमध्ये गांजा, तस्करी केलेले जीवंत आणि मृत वन्यजीव, आणि सोने यांचा समावेश असून, याची एकत्रित किंमत ११ कोटी रुपयांहून अधिक आहे. सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी बँकॉकहून आलेल्...

July 6, 2025 8:22 PM July 6, 2025 8:22 PM

views 13

आषाढी एकादशीनिमीत्त महाराष्ट्रात सर्वत्र भक्तिमय वातावरण

आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरात विविध विठ्ठल मंदिरांमध्ये भक्तांचा महासागर लोटला आहे. सर्वत्र जय हरी विठ्ठल आणि पांडुरंग हरीचा जयघोष आणि टाळ-मृदंगाच्या गजरात मंदिर परिसर दुमदुमून गेल्याचं वातावरण आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना आषाढी एकादशीनिमित्त शुभेच्छा दिल्या. विठूमाऊली आपल्या समाज...

July 6, 2025 7:35 PM July 6, 2025 7:35 PM

views 7

येत्या दोन दिवसांत कोकण, विदर्भ, मध्य-महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता

येत्या दोन दिवसांत कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी, तर मध्य-महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. तुरळक ठिकाणी गडगडाटासह पावसाचा अंदाजही व्यक्त केला आहे. त्याचबरोबर कोकण किनारपट्टीवर सोसाट्याचे वारे वाहायची शक्यताही व्यक्त केली आहे.

July 6, 2025 7:30 PM July 6, 2025 7:30 PM

views 7

आपण ज्ञानेश्वर, शिवराय, सावित्रीमाई आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या वैचारिक वारश्याचे वाहक असल्याचं मुख्यमंत्र्यांच प्रतिपादन

आपण ज्ञानेश्वरांचे, शिवरायांचे, क्रांतीज्योती सावित्रीबाईंचे आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे थेट वंशज नसलो, तरी विचारांच्या वारश्याचे वाहक आहोत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी म्हटलं आहे. त्यांनी आजपासून ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्ट मालिकेचा प्रारंभ केला. त्यात ते बोलत होते. या सर...

July 6, 2025 7:28 PM July 6, 2025 7:28 PM

views 18

नाशिक इथं आयोजित ७ व्या चाईल्ड कप तलवारबाजी स्पर्धेत मुलांच्या सेबर प्रकारात महाराष्ट्राच्या श्रीराज पोळनं पटकावलं सुवर्ण पदक

नाशिक इथं आयोजित ७ व्या चाईल्ड कप तलवारबाजी स्पर्धेत मुलांच्या सेबर प्रकारात महाराष्ट्राच्या श्रीराज पोळ यानं आज सुवर्णपदक पटकावलं. अंतिम लढतीत त्यानं तामिळनाडूच्या ए. एस. जोसेफ याचा ११-८ असा पराभव केला. याच प्रकारात महाराष्ट्रच्याच अरोह जाधव आणि पंजाबच्या हेयांश गर्ग यांना संयुक्तपणे कांस्य पदक मिळ...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.