डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

आपण ज्ञानेश्वर, शिवराय, सावित्रीमाई आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या वैचारिक वारश्याचे वाहक असल्याचं मुख्यमंत्र्यांच प्रतिपादन

आपण ज्ञानेश्वरांचे, शिवरायांचे, क्रांतीज्योती सावित्रीबाईंचे आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे थेट वंशज नसलो, तरी विचारांच्या वारश्याचे वाहक आहोत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी म्हटलं आहे. त्यांनी आजपासून ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्ट मालिकेचा प्रारंभ केला. त्यात ते बोलत होते. या सर्वांनी आपल्या ज्ञानानं, त्यागानं आणि धैर्यानं हे राज्य घडवलं. त्याला जपणं, वाढवणं, आणि पुढं नेणं हे आपलं कर्तव्य आहे, असं ते म्हणाले. महाराष्ट्रधर्म म्हणजे स्मरणरंजन नाही. आपण कोण आहोत, हे समजून घेऊन, आपल्याला काय घडवायचं आहे, ते ठरवणं, हाच महाराष्ट्रधर्म आहे,’ असं सांगत या पहिल्याच पॉडकास्टमध्ये मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राची पायाभरणी आणि उभारणीच्या अनुषंगानं मांडणी केली. ‘महाराष्ट्रधर्म हा धर्म नाही. ती एक जीवंत मूल्य संहिता आहे, ती सांगते, विवेकाने विचार करा, सेवाभावानं वागा, आणि शौर्यानं उभे राहा. ज्ञानेश्वरांच्या ओव्यापासून शिवरायांच्या तलवारीपर्यंत, फुल्यांच्या साहसापासून, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टीकोनापर्यंत ही साखळी कधी तुटलीच नाही. ती सतत पुढं सरकत राहीली,’ असं फडनवीस म्हणाले.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा