डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

नाशिक इथं आयोजित ७ व्या चाईल्ड कप तलवारबाजी स्पर्धेत मुलांच्या सेबर प्रकारात महाराष्ट्राच्या श्रीराज पोळनं पटकावलं सुवर्ण पदक

नाशिक इथं आयोजित ७ व्या चाईल्ड कप तलवारबाजी स्पर्धेत मुलांच्या सेबर प्रकारात महाराष्ट्राच्या श्रीराज पोळ यानं आज सुवर्णपदक पटकावलं. अंतिम लढतीत त्यानं तामिळनाडूच्या ए. एस. जोसेफ याचा ११-८ असा पराभव केला. याच प्रकारात महाराष्ट्रच्याच अरोह जाधव आणि पंजाबच्या हेयांश गर्ग यांना संयुक्तपणे कांस्य पदक मिळालं. आजच्या पदकं प्राप्त केलेल्या खेळाडूंना या स्पर्धेचे प्रमुख पाहुणे असलेले आशियाई तलवारबाजी असोसिएशनचे सरचिटणीस राजीव मेहता, आणि इतर मान्यवरांच्या हस्ते पदकं आणि प्रमाणपत्रं प्रदान करून सन्मानित करण्यात आले. विविध राज्यांचे ३९० खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा