राष्ट्रीय

October 16, 2025 8:36 PM October 16, 2025 8:36 PM

views 17

नैऋत्य मौसमी पावसाची संपूर्ण देशभरातून माघार

संपूर्ण देशातून नैऋत्य मौसमी पावसाचा परतीचा प्रवास आज पूर्ण झाला. भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार तामिळनाडू, पुद्दुचेरी, आंध्र प्रदेशची किनारपट्टी, रायलसीमा, दक्षिण कर्नाटक आणि  केरळ-माहे या भागांत ईशान्य मान्सून पावसाळ्याची सुरुवात झाली आहे. या प्रदेशात उद्या मुसळधार पावसाचा इशारा हवामा...

October 16, 2025 6:50 PM October 16, 2025 6:50 PM

views 9

गुजरातमध्ये उद्या मंत्रिमंडळ विस्तार

गुजरातमध्ये मंत्रिमंडळाचा उद्या विस्तार होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल वगळता इतर सर्व मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. नव्या मंत्र्यांचा शपथविधी उद्या होणार आहे. राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या उपस्थितीत गांधीनगर इथे हा शपथविधी होईल. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात समाविष्ट झ...

October 16, 2025 3:13 PM October 16, 2025 3:13 PM

views 34

देशातल्या शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी जोरदार तेजी

अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून दर कपातीची अपेक्षा, जागतिक बाजारातलं सकारात्मक वातावरण यामुळं सलग दुसऱ्या दिवशी देशातल्या शेअर बाजारात जोरदार तेजी आहे. सकाळपासून असलेली तेजी दुपारपर्यंत आणखी वाढत गेली.   बँका, माहिती तंत्रज्ञान कंपन्या, ग्राहकोपयोगी वस्तू निर्माण करणाऱ्या कंपन्यांचे समभाग आज तेजीत आ...

October 16, 2025 6:56 PM October 16, 2025 6:56 PM

views 34

सर्व गुन्हेगारांना कायद्याच्या कक्षेत आणण्यासाठी यंत्रणा विकसित करणं सुरू – केंद्रीय गृहमंत्री

भ्रष्टाचार, गुन्हेगारी आणि दहशतवादाच्या विरोधात सरकारनं शून्य सहिष्णुता धोरण स्वीकारलं आहे, असा पुनरुच्चार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे. नवी दिल्लीत ते आज प्रत्यार्पण आव्हाने आणि रणनीती संबंधीच्या परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते. सर्व गुन्हेगारांना कायद्याच्या कक्षेत आणण्यासाठी ए...

October 16, 2025 3:01 PM October 16, 2025 3:01 PM

views 64

कोकण रेल्वेत साडे चारशे पदांच्या भरतीचा प्रस्ताव

कोकण रेल्वेत साडे चारशे पदांच्या भर्तीसाठी रेल्वे मंत्रालयाला अर्ज करण्यात आला असून येत्या एक ते दोन महिन्यात त्याबद्दल अनुमोदन मिळण्याची शक्यता असल्याचं कोकण रेल्वेचे अध्यक्ष संतोष कुमार झा यांनी सांगितलं आहे. ते काल कोकण रेल्वे कॉर्पोरेशनच्या पस्तिसाव्या स्थापना दिनानिमित्त वाशी इथे आयोजित कार्यक्...

October 16, 2025 2:59 PM October 16, 2025 2:59 PM

views 9

दिल्ली आणि मुंबईच्या हवेतली प्रदूषणात वाढ

दिल्ली आणि मुंबईच्या हवेतली कार्बन डायॉक्साईड आणि मिथेन या प्रदूषणकारी वायूंची पातळी गेले अनेक वर्षं वाढत असल्याचं आयआयटी मुंबईच्या संशोधकांच्या अहवालात दिसून आलं आहे.    दिल्लीच्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक काल २११ पर्यंत अर्थात ‘वाईट’ या श्रेणीत पोचला असून येत्या शुक्रवारपर्यंत तो ३४६ पर्यंत ...

October 16, 2025 2:52 PM October 16, 2025 2:52 PM

views 9

विशाखापट्टणम इथं नौदलातर्फे सागरी सरावाचं आयोजन

विशाखापट्टणम इथं भारतीय नौदलातर्फे समुद्र शक्ति 2025 या पाचव्या इंडो-इंडोनेशियाई संयुक्त द्विपक्षीय सागरी सरावाचं आयोजन करण्यात आलं आहे.   शुक्रवार पर्यंत सुरू राहणाऱ्या या सरावादरम्यान सहभागी तुकड्यांमधील पूर्व नौदल कमांडच्या नेतृत्वाखालील ताफ्याची आयएनएस करवत्ती ही पाणबुडी रोधी युद्ध नौका आणि...

October 16, 2025 2:35 PM October 16, 2025 2:35 PM

views 18

राष्ट्रांमध्ये सहकार्य वाढविण्यावर भर द्यायला हवा- परराष्ट्र मंत्री

 दहशतवाद, आर्थिक अस्थिरता आणि हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी राष्ट्रांमध्ये सहकार्य वाढविण्यावर भर द्यायला हवा, असं परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी म्हटलं आहे.   संयुक्त राष्ट्रांच्या मोहिमेत सहकार्य करणाऱ्या सैन्यदल प्रमुखांच्या परिषदेला नवी दिल्लीत संबोधित क...

October 16, 2025 2:28 PM October 16, 2025 2:28 PM

views 18

प्रधानमंत्र्यांनी आंध्रप्रदेशातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला केलं अभिवादन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज आंध्रप्रदेशातील श्रीशैलम इथं श्री शिवाजी स्फुर्ती केंद्रम इथं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ध्यानस्थ मूर्तीला अभिवादन केलं.   यावेळी प्रधानमंत्र्यांनी श्री शिवाजी स्फुर्ती केंद्रामधल्या शिवाजी महाराज यांच्या इतिहासाची ओळख करून देणाऱ्या शिल्प, प्रतिमा आणि मूर्त...

October 16, 2025 2:36 PM October 16, 2025 2:36 PM

views 27

श्रीलंकेच्या प्रधानमंत्री हरिणी अमरसूर्या भारत दौऱ्यावर

श्रीलंकेच्या प्रधानमंत्री हरिणी अमरसूर्या आज तीन दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी नवी दिल्लीत पोहोचल्या. त्यांचा हा पहिलाच भारत दौरा असून या भेटीमुळे दोन्ही देशांमधल्या परस्पर सहकार्याची परंपरा यापुढेही सुरू राहील आणि मैत्रीचे बंध आणखी मजबूत होतील, असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आप...